पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/320

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३२१) योजनाचे ३०ली होतात; परंतु शास्त्राच्या पुस्तकांत लिहिलेलें योजन १६ लीचे आहे. " इसवीसनाच्या ७ व्या शतकांत चिनांत चालू असणाऱ्या 'ली' ची किंमत सें. मार्टिन हा ३२९ मिटर झणजे १०८० इंग्लिश फूट मानतो.* त्या मानाने हुएन याने सांगितलेल्या निरनिराळ्या योजनांचें मान १,६१, ३१ इंग्लिश मैल होतें. ह्मणजे त्याच्या वेळी या देशांत चालू असणान्या योजनाचें मान ६ मैल होते. ज. कनिंघम यानेही हुएन याने दिलेल्या निरनिराळ्या प्रसिद्ध स्थलांच्या सांप्रतच्या अंतरांवरून हुएनचे ६ ली ह्मणजे एक मैल असें ठरविले आहे. परंतु हुएन याने दिलेली अंतरे त्याने कमिलेल्या मार्गावरून दिली आहेत, आणि रस्ते व वाटा सरळ रेत असतात असे नाही. यामुळे सरळ रेषेनें अंतर पाहिले तर हुएन याने दिलेल्या अंतरांत है कमी करावा असें कनिंघमचे मत आहे. व त्याप्रमाणे त्याने जागोजाग केले आहे. आणि त्याप्रमाणे मटलें तर हुएनचे ६ ली झणजे सरळ रेषेनें ( ६-१ = ) ५ ली होतात. आणि याप्रमाणे कनिंघम आणि सें. मादिन यांची योजनांची माने मिळतात. एकंदरीत मला वाटते की हुएनच्या वेळी ३० लीचें योजन प्रचारांत होते. आणि त्याचे मैल करितांना कनिंघमने ठरविल्याप्रमाणे ६ लीचा मैल घेतला पाहिजे. ह्मणजे त्यावेळच्या प्रचारांत असलेल्या योजनाचे सरळ रेषेनें ( ३० - ६ = ) ५ मैल होतात. आणि त्या मानानें इसवीसनाच्या ७ व्या शतकांत हुएन या देशांत येण्यापूर्वी नुकताच किंवा त्याच सुमारास होऊन गेलेला ब्रह्मगुप्त याने दिलेला भूव्यास १५८१ योजनें, यांचे मैल ७९०५ मैल होतात. आणि हा सूक्ष्मरीतीने ठरविलेल्या सांप्रतच्या व्यासाच्या फारच जवळ आहे. कसेही असले तरी भूगोलावरील एक अंश कसा मोजावा आणि त्यावरून अंश मोजणें. भूपरिधि कसा काढावा हे आमच्या ज्योतिष्यांस माहित होते, असें निरक्षदेशात् क्षितिषोडशांशे भवेदवंती गणितेन यस्मात् ॥ - तदंतरं षोडशसंगुणं स्यामान.. ॥ १५ ॥ सि. शिरोमणि, भुवनकोश. “निरक्ष देशापासून भूगोलाच्या १६ व्या अंशावर ( = २२।। अंशांवर) अवंती आहे. ह्मणून दोहोंमधील अंतराच्या १६ पद पृथ्वीचा परिधि " इत्यादि उक्तींवरून स्पष्ट दिसते. तथापि हे खरें की भूपरिधीचा एक अंश सूक्ष्म रीतीने मोजण्याविषयी जसे युरोपखंडांत प्रयत्न झाले आहेत तसे आमच्या देशांत झाल्याचे दिसत नाही. विश्वाच्या मध्यभागी पृथ्वी आहे, तिच्या भोंवतीं ग्रह फिरतात, आणि पृथ्वी आकाशांत निराधार राहिली आहे, असें आमच्या ज्योतिष्यांचे भुवनाधार. मत आहे, असें वर सांगितले. परंतु ग्रह कोणत्या आधाराने आहेत याविषयी स्पष्टपणे कांही आमच्या ग्रंथांत सांगितलेले आढळत नाही. तथापि प्रवह वायूनें ग्रहनक्षत्रांस गति प्राप्त होते असे मत आहे, यावरून प्रवहाच्या आधा* Julien's Memories de stioun thsong II. 251, बर्जेस सू. सि. भा. पृ. २८४. +कनिंघमचा प्राचीन भूगोल, आरंभीचें सामान्य वर्णन पहा. + सांप्रत उज्जनीचे अक्षांश २३।९ ठरविलेले आहेत. ४१