पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/319

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ( ३२०) शशिराशयष्ठ १२ चक्र तेशकलायोजनानिय ३० व६० ज१० गुणाः ॥ ४ ॥ दशगीतिकापाद. यांत चंद्रकक्षेच्या कलांस १० नी गुणून योजनें होतात असे सांगितले आहे. ह्मणजे एक कला १० योजनें मानली आहे. इतर सर्व सिद्धांतांत १५ योजनें मानली आहे. सरूद्दर्शनी हा इतर सिद्धांतांशी विरोध दिसतो. परंतु वस्तुतः विरोध नाहीं. इतर सिद्धांतांतलें चंद्रकक्षामान आर्यभटसंमत मानाच्या दीडपट आहे, तशीच इतर मानेही सुमारे दीडपट आहेत हे खालील संख्यांवरून दिसून येईल. प्रथमार्यसिद्धांतयोजनें सिद्धांतशिरोमणियोजनें भूव्यास १०५० १५८१ सूर्यबिंबव्यास ४४१० ६५२२ चंद्रबिंबव्यास ३१५ ४८० प्रथमार्यसिद्धांताप्रमाणे पृथ्वीपासून चंद्राचे अंतर ३४३७७ योजने येते. हे त्या सिद्धांतांतली भूत्रिज्या ५२५ हिच्या ६५.५ पट आहे. तेव्हां सापेक्षपणे पाहिले असतां आर्यसिद्धांताचा इतरांशी विरोध नाही. प्रत्यक्ष संख्यांमध्ये भेद आहे तो योजन ह्या मानाच्या भिन्नपणामुळे असे दिसते. लल्ल हा प्रथमार्यभटाचा बहुतांशी अनुयायी आहे, यामुळे लल्लाचीही मानें प्रथमार्यभटाप्रमाणे आहेत. द्वितीयार्यभटाची इतर सिद्धांतांप्रमाणे आहेत. वरील विवेचनांत भूत्रिज्येचा संबंध आला आहे. त्याबद्दल एथेच थोडासा भूविज्या. विचार करूं. निरनिराळ्या ग्रंथांतले भूव्यास असे आहेत भूत्रिज्या योजनें. ग्रंथ भूविज्या योजनें. पंचसिद्धांतिका. १०१०६ ब्रह्मगुप्तसिद्धांत, ) सांप्रतचा सूर्यसिद्धांत, ) सिद्धांतशिरोमणि, १५८१ सोमसिद्धांत,शाकल्योक्त १६०० वसिष्ठसिद्धांत.) ब्रह्मसिद्धांत. ) द्वितीयार्यसिद्धांत. २१०९ प्रथमार्यसिद्धांत, लल्ल. १०५० योजन हे मान केवढे होते याविषयी काही निश्चय करितां येत नाही. यामुळे हे आमच्या ग्रंथांतले भूव्यास कितपत बरोबर आहेत हे पाहयोजन केवढे. ण्यास चांगले साधन नाही. आमच्या बहुतेक ग्रंथांप्रमाणे योजनाचे ३२००० हात होतात. आणि १९.८ इंचांचा हात धरिला ह्मणजे योजनाचे इंग्लिश मैल बरोबर १० होतात. तेव्हां सर्वात कमी पंचसिद्धांतिकेंतला व्यास घेतला तरी तो १०१८६ मैल होतो. सांप्रतच्या शोधाप्रमाणे पृथ्वीचा पूर्वपश्चिम व्यास ७९२५ मैल आहे. परंतु योजनाचे मान १० मैलांहून कमी असावे असे दिसते. वाचस्पति आणि शब्दार्णव या कोशांत योजनाचे -१६००० हात सांगितले आहेत. ह्मणजे त्यांचे ५ मैल होतात. इ.सनाच्या ७ व्या शतकाच्या मध्यभागी हुएनसंग ह्या नांवाचा चिनी प्रवासी हिंदुस्थानांत आला होता, त्याने सर्व हिंदुस्थानचें वर्णन लिहिले आहे. त्याने स्थलांची अंतरें वगैरे "ली" या चिनी मापाने दिली आहेत. तो ह्मिणतो "प्राचीन पद्धतीप्रमाणे यो. जन ४० ली इतके आहे; हिंदुस्थानांतील सांप्रतच्या राज्यांच्या व्यवहारांतील 1 Julien's Memoires de Hiouen Thsang I.59, बर्जेस सू. सि. भा. पृ. ३९, ग्रंथ