पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/318

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१९) सिद्धांताखेरीज सर्व सिद्धांतांत चंद्रकक्षेची एक कला १५ योजनें मानली आहे तिसरे असें की ग्रहांची कक्षास्थाने नियमित आहेत त्यांतून ते नेहमीं भ्रमण करतात त्यांची स्थाने बदलत नाहीत. तेव्हां सर्व ग्रह कल्पांत आकाशाचे एकदा भ्रमण करतात याचा कांहींच अर्थ नाही. भास्कराचार्य तर स्पष्ट ह्मणतो की ब्रह्मांडमेतन्मितमस्तु नो वा कल्पे ग्रहः कामति योजनानि ।। यावंति पूर्वरिह तत्प्रमाणं प्रोक्तं खकक्षाख्यमिदं मतं नः ॥३॥ सि. शि. कक्षाध्याय. "ब्रह्मांड इतकें (खकक्षामित ) असो किंवा नसो; कल्पांत ग्रह जितकी योजनें चालतो त्याचे मान खकक्षा या नांवानें पूर्वाचार्यांनी सांगितलें असें आह्मांस वाटते." यावरून चंद्रकक्षा आणि ग्रहप्रदक्षिणाकाल यांच्या साह्याने आमच्या ज्योतिषांनी ग्रहकक्षा ठरविल्या. त्या ठरवितांना घेतलेला आधार “प्रदक्षिणा काल आणि ग्रहकक्षा प्रमाणांत असतात " हा खरा नसल्यामुळे कक्षामाने चुकलीं, आणि आकाशकक्षामान केवळ काल्पनिक आहे, हे स्पष्ट दिसून येते. वर लिहिल्याप्रमाणे आमच्या ग्रंथांतील कक्षामाने आणि अर्थातच ग्रहांची ग्रहमालामध्यापासून अंतरें चुकली आहेत. तरी त्या अंतरामुळे त्यांच्या स्पष्ट स्थितीमध्ये जो एक प्रकारचा फेर पडतो, ज्यास "शीघ्र फलसंस्कार " असें नांव आहे, तो आमच्या ग्रंथांत दिला आहे, त्यावरून ग्रहांची ग्रहमालामध्यापासून अंतरें, ह्मणजे त्याचे मंदकर्ण, काढले असतां ते आधुनिक मानांशी बहुतांशी जमतात, असें खालील कोष्टकावरून दिसून येईल. टालमीचीही माने कोष्टकांत दिली आहेत.* सूर्यसिद्धांत. ग्रह. टालमी. आधुनिक. युग्मपदांती. ओजपदांती. रवि (किंवा पृथ्वी.) बुध. '३६९४ '३६६७ '३७५० '३८७१ शुक्र. '७२७८ "७१९४ '७२३३ मंगळ. १५१३९ । १५५१७ १५१९० १५२३७ गुरु. ५१४२९ ५२१७४ ५.२०२८ ९.२३०८ । ९२३०८ । ९५३८८ '७२२२ शनि. वर सूर्यसिद्धांतांतलीं माने दिली आहेत त्यांत बुधशुक्रांचे मंदकर्ण. त्यांच्या कक्षाच्या परिधीने झणजे ३६०नी त्यांच्या शीघ्रनीचोच्चवृत्तपरिधीसा भागून, आणि बहिर्वर्ती ग्रहांचे मंदकर्ण, नीचोच्चवृत्त परिधीने ३६० अंशांस भागून काढले आहेत. प्रथमार्यभटाचे चंद्रकक्षामान भिन्न आहे असें वर सांगितले. ते असें:* टालमीची मानें बर्जेसच्या सूर्यसिद्धांताच्या भाषांतरावरून व आधुनिक मानें लुमिसच्या पुस्ताकावरून घेतली आहेत. नीचोच्चवृत्त परिधि पुढे सांगितले आहेत. तसेच याविषयी जास्त विवेचन पुढे स्पष्टाधिका-- रांत केले आहे.