पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/317

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१८) पहिला आयसिद्धांत खेरीज करून सर्व सिद्धांतांतील योजनात्मक ग्रहदिनगति सारखीच आहे. तरी प्रत्येकाची कल्पदिनसंख्या किंचित् भिन्न असल्यामुळे आकाशकक्षा आणि ग्रहकक्षा सर्व सिद्धांतांच्या किंचित् भिन्न आहेत. त्या सर्व एथे दे. ण्यांत अर्थ नाहीं; कारण त्यांत वास्तवांश थोडाच आहे. बहुतेक गोष्टी काल्पनिकच आहेत. चंद्रकक्षा मात्र काल्पनिक प्रकाराने ठरविली नाही. तींत वास्तवांश पुष्कळ आहे. चंद्रकक्षेच्या प्रदेशांत त्याच्या कक्षेची एक कला पहिला आर्यभट खेरीज करून सर्वांनी १५ योजनें मानली आहे. ह्मणजे सर्व कक्षा ( ३६०४६०४१५= ) ३२४००० योजने होते. ह्मणजे त्याच्या कक्षेची त्रिज्या ५१५६६ योजने होते. हे पृथ्वीपासून चंद्राचें अंतर होय. पृथ्वीची विज्या सूर्यसिद्धांतापृथ्वीपासन चं 4. प्रमाणे ८०० योजनें आहे. तेव्हां पृथ्वीत्रिज्येच्या ६४.४६ पट द्राचे अंतर. पृथ्वीपासून चंद्राचे अंतर झालें. आधुनिक शोधाप्रमाणे भूत्रिज्येच्या ५९.९६ पट पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आहे. तेव्हां आमच्या सिद्धांतकारांनी ठरविलेलें पृथ्वीपासून चंद्राचे अंतर आणि त्याच्या कक्षेचें मान खन्याच्या फार जवळ आहे. इतकें बरोबर मान त्यांनी ठरविलें त्याजबद्दल ते स्तुतीस पात्र आहेत. सर्व ग्रहांची स्वकक्षामंडलस्थ गति सारखी मानली आहे, आणि ग्रहाच्या कल्पभ. गणसंख्यनें आकाशकक्षेस भागून कक्षामाने काढली आहेत. अर्थातच ग्रहांचे प्रदक्षिणाकाल आणि त्यांच्या कक्षाह्मणजे अर्थात् त्यांची पृथ्वीपासून अंतरें ही प्रमाणांत असतात असे मानल्यासारखे झाले. परंतु आधुनिक ज्योतिषसिद्धांताप्रमाणे हे खरे नाही. केप्लरने काढलेला आणि न्यूटन इत्यादिकांनी खरा असा ठरविलेला सांप्रतचा सिद्धांत असा आहे की ग्रहाच्या प्रदक्षिणाकालाचा वर्ग आणि सूर्यापासून ग्रहापर्यंत जें अंतर त्याचा घन ही प्रमाणात असतात. सूर्यसिद्धांताप्रमाणे सूर्याचें पृथ्वीपासून अंतर ६८९४३० योजने येते. झणजे भूत्रिज्येच्या सुमारे ८६२ पट येते. परंतु तें सांप्रतच्या शोधापपृथ्वीपासून ग्रहांची माणे भूत्रिज्येच्या सुमारे २३३०० पट आहे. याप्रमाणे सूर्याच्या अंतरें. पलिकडच्या ग्रहांची अंतरे आमच्या सिद्धांतावरून निघणारी ज्यास्त चुकली आहेत. आकाशकक्षेचें मान आणि ग्रहांची स्वकक्षामंडलस्थ योजनात्मक दिनगति ही वेधादिकांनी निश्चित करून त्यावरून कक्षामाने आणि ग्रहांचे प्रदक्षिणाकाल आमच्या ज्योतिष्यांनी ठरविले नाहीत. तर प्रदक्षिणाकाल आणि चंद्रकक्षामान वेधादिकांनी प्रथम ठरविले आणि त्यावरून ग्रहकक्षा आणि आकाशकक्षा ठरविला असें अगदी स्पष्ट दिसते. कारण एक तर पंच सिद्धांतित ग्रहकक्षा आणि आकाशकक्षा यांची योजनात्मक माने दिलेली नाहीत. चंद्रकक्षेचेही मान नाही. तेव्हां मूळ सूर्यसिद्धांतांत ती नसतील असे वाटते. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत ती आहेत. आणि सांप्रतचा सूर्यसिद्धांत पंचसिद्धांतिकेच्या पूर्वीच झाला असें मी अनुमान केले आहे, तथापि सांप्रतच्या मूर्यसिद्धांतांतली कक्षामाने मागाहून आली असा संभव नाहींसा नाही.* दुसरें असें की प्रथमार्य

  • ब्रह्मगुप्ताच्या सिद्धांतांत झणजे शके ५५० इतक्या प्राचीन ग्रंथांत कक्षामाने आहेत. तेव्हा सूर्यसिद्धांतांत कक्षामार्ने मागाहून आली असली तरी ती शके ५५० नंतर लवकरच आली अ. सलीच पाहिजेत.