पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/316

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१७) बाह्मण होता. त्याचा पिता इत्यादिकांची नांवें चंद्रभट, भट्टार्य, विठ्ठल अशी होती. याच वंशांत श्रीचंदल नामक ज्योतिषी झाला. तो सौरमताभिमानी होता. तसेंच तो विद्यापुरस्थ नृपतिप्रिय होता. त्याचा पुत्र विश्वनाथ याने गंगाधराचें चांद्रमान तंत्र फार कठिण ह्मणून तेच सुबोध पद्यांनी रचिलें. ह्याचा काल दिलेला नाही." नृसिंह-ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याचा बंधु राम याचा नृसिंह नामक पुत्र होता (पृ० २६७). राम हा गणेश दैवज्ञाचा धाकटा बंधु असावा. या नृसिंहाने शक १४८० मध्ये महादेवी ग्रहसिद्धीस अनुसरून 'मध्यग्रहसिद्धि' या नांवाचा ग्रंथ केला आहे असें सुधाकर लिहितात. त्यांत मध्यम ग्रह मात्र आहेत. स्पष्ट ग्रह महादेवाच्या ग्रंथावरून करावयाचे. कृष्णशास्त्री गोडबोले यांच्या हस्तलिखित मराठी पुस्तकांत लिहिले आहे की "केशव देवज्ञाचा नातू रामाचा पुत्र नृसिंह याने शके १५१० मध्ये 'ग्रहकौमुदी। ग्रंथ केला. नृसिंहाचा जन्मशक १४७० होय." हा शक व वरील शक १४८० या दोहोंपैकी एक चुकीचा असला पाहिजे. शकांत १४८० वजा करून बाकीला वर्षगतीने गुणून ग्रह करावे असें नृसिंहाने सांगितले आहे. यावरून तो शक चुकीचा असण्याचा संभव नाही. कदाचित शक १४८० नंतर काही वर्षांनी नृसिंहानें तो ग्रंथ केला असेल. प्रकरण २. भुवनसंस्था. भुवनसंस्थेचें सामान्यतः थोडेसें विवेचन उपोद्घातांत (पृ० ८) केले. आणखी विवेचन आतां करितों. सर्व ग्रहांची गति कक्षामंडळांत सारखीच मानली आहे असे मागे सांगितले (पृ०९). ती एका दिवसांत सुमारे ११८५८३ योजनें आहे. आणखी कल्पांत प्रत्येक ग्रह आकाशाचे एकदा भ्रमण करतो असे मानले आहे. ह्मणजे कल्पांत ग्रहांचें जितकें भ्रमण होते तितकी आकाशाची कक्षा* होय. अर्थात कल्पांत कोणत्याही ग्रहाचे जितके भगण होतात त्यांच्या संख्येने आकाश कक्षेस भागितले असतां ग्रहाच्या कक्षेचें मान निघेल. सूर्यसिद्धांतांत कक्षामाने अशी आहेतःकक्षामान योजनें. कक्षामान योजनें. चंद्र ३२४००० गुरु ५१३७५७६४ बुधशीघ्र १०४३२०९ १२७६६८२५५ शुक्रशीघ २६६४६३७ नक्षत्रमंडल २५९८९००१२ ४३३१५०० आकाश १८७१२०८०८६४०००००० मंगळ ८१४६९०९ * कक्षा झणजे ग्रहाचा पृथ्वीभोवती फिरण्याचा मार्ग. आकाशकक्षा यांत मात्र तो अर्थ नाही. वस्तुतः आकाशकक्षा हा स्वतंत्र पदार्थ नाही. ग्रहकक्षा इत्यादि काढण्याकरितां आकाश. कक्षा कल्पिली आहे. शनि रवि