पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/315

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१६) 'चार्याने ज्याचापावांचून युतिसाधन केले आहे; गणेश दैवज्ञानें ग्रहलाघवांत ज्या चापावांचून सर्व गणित साधलें आहे; (पृ. २६१,२ पहा.) हे श्रीपतीच्या रीतीवरूनच त्यास सुचलें असावे असें सुधाकर ह्मणतात. मागे लिहिलेल्या ग्रंथांखेरीज रत्नावलि आणि रत्नसार हे आणखी मुहूर्तग्रंथ श्रीपतीचे आहेत असें सुधाकर ह्मणतात. आफ्रेचमूचीत रत्नसार आहे. तो ग्रंथ रत्नमालेचा संक्षेप असावा. हे दोन ग्रंथ मुहूर्ताचे असतां आणखी रत्नावलि ग्रंथ असणे संभवत नाही. रत्नमाला ग्रंथासच रत्नावलि असे कोणी ह्मणत असतील. केशव-विवाहवृंदावनकार केशव (पृ. २५७) याने विवाहवृंदावनांत 'त्रिभागशेष ध्रुवनाम्नि" इत्यादि श्लोकांत ध्रुव योगाचा तिसरा अंश राहिला ह्मणजे व्यतिपात हा महापात होतो असें सांगितले आहे. अयनांश सुमारे १२। होते तेव्हां अशी स्थिति होती. आणि या श्लोकाच्या टीकेंत गणेश दैवज्ञ लिहितो की. "ग्रंथनिर्माण काली १२ अयनांश होते, त्यावरून हे झटले आहे." यावरून सुमारे १२ अयनांश होते तेव्हां ह्मणजे शक ११६५च्या सुमारास विवाहवृंदावनकार केशव झाला. त्या ग्रंथांत लग्मशुद्धि प्रकरणांत नार्मदी पलभा ४।४८ सांगितली आहे. या पलभेवरून अक्षांश २१।१८ येतात. नर्मदेच्या मुखावरचे शहर भडोच याचे अक्षांश २११४१ आहेत. यावरून त्या सुमारास नर्मदेच्या काठी याचे स्थळ असावें. महादेवकृत ग्रहसिद्धि-(पृ. २५४ पहा.) गणकतरंगिणीकारांनी या ग्रंथांतले कुलवृत्तांताचे श्लोक दिले आहेत ते शुद्ध आहेत. यावरून याचा पिता इत्यादिकांची नांवें अनुक्रमें परशुराम, पद्मनाभ, माधव, जोजदेव अशी होती; आणि तो गोदावरी जवळ रासिण येथे राहणारा होता. तेथील पलभा ४॥ होती. अहमदनगरच्या दक्षिणेस एक रासिन गांव आहे पण तेथील पलभा सुमारे ४ आहे. व तो गोदेजवळ नाहीं, भीमेजवळ महाराष्ट्र देशांत आहे. वंशवृत्तांत आरंभी असें आहे: ईश्वरकौबेरजजौदाससमस्तज्जजोग्रजन्मासीत् । श्रीजोजदेवनामा गौतमगोत्रः सदैवज्ञः ।। यावरून व मागें (पृ. २५५) दिलेल्या काही गोष्टींवरून हा गुजराथी दिसतो. मूळचा गुजराथेतला असून पुढे तो किंवा त्याचा कोणी पूर्वज महाराष्ट्र देशांत येऊन राहिला असेल. महादेवकृत कामधेनु करण, शक १२७९-गोदेच्या कांठचे व्यंबक येथील राजसभेत मान्य असा कौंडिन्य गोत्री बोपदेवाचा पुत्र महादेव याणे ब्रह्मपक्ष आणि आर्यपक्ष यांस अनुसरून कामधेनु ग्रंथ केला. यांत ३५ श्लोक आहेत व सारण्या आहेत; आणि वर्षगति व क्षेपक दिले आहेत. २२ कोष्टकांच्या पटांत तिथिसिद्धि होते असें मटले आहे. गंगाधर, शक १३५६-याणे कलिवर्ष ४५३५ (शक १३५६) यावर्षी 'चांद्रमान ' या नांवाचे तंत्र केले आहे. तें वर्तमानसूर्यसिद्धांतानुसारी आहे. काशिक राजकीय पुस्तकसंग्रहांत हे पुस्तक आहे. त्यांत मध्यम आणि स्पष्ट ग्रह यांचें साधन मात्र आहे असे दिसते. त्याचे सुमारे २०० श्लोक आहेत. त्यांत चांद्रमासौघावरून मध्यम ग्रह केले आहेत. सौरमानाचेही वर्णन आहे असे दिसते. मध्य रेषेवरील श्रीशैलाच्या पश्चिमेस एकीकडे कृष्णावेणी आणि दुसरीकडे भीमरथी ह्यांच्यामधील सगर नांवाचें नगर हे गंगाधराचे स्थान होते. तो जामदस्य गोत्री