पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/314

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१५) असें तो ह्मणतो. त्यांतील विषयांचे स्वरूप थोडेसें त्याणे सांगितले आहे त्यावरून ते शकुनग्रंथ अथवा प्रश्नग्रंथ असावे असे दिसते. विजयनंदित करणतिलक, शक ८८८-टीकाकार विजयनंदी काशी येथील राहणारा याने करणतिलक केला असें बेरुणी लिहितो. त्यांतील अहर्गण करण्याची रीति, अहगणावरून मध्यम ग्रह करण्याची रीति, ग्रहणाकरितां रविचंद्रबिंबसाधन, महापाताचे गणित, इत्यादि गोष्टी बेरुणीने दिल्या आहेत. त्यांवरून त्यांत ग्रहलाघवासारखे सर्व विषय होते. त्यांत शक ८८८ चैत्र शुक्ल १ चे क्षेपक होते. अहर्गणसाधन पुलिशसिद्धांतानुसार आहे असे टिपांत डा. स्काम लिहितो. धनिष्ठा, उत्तराभाद्रपदा, इत्यादि तारा सूर्यसान्निध्याने अस्त पावत नाहीत असें विजयनंदी ह्मणतो. (भा. २ पृ. ९०). आफेचमूचीत या करणाचें नांव नाही. यावरून सांप्रत हे बहुधा कोठे उपलब्ध नाही असे दिसते. वराहमिहिराने लिहिलेला विजयनंदी या विजयनंदीहून पुष्कळ प्राचीन होय. भानुभ-भानर्जु याचा 'रसायनतंत्र ' नांवाचा तंत्रग्रंथ आणि 'करणपरतिलक' नांवाचा करणग्रंथ आहे अमें बेरुणी लिहितो. ग्रंथकाराच्या नांवाचा उच्चार भानुरज अथवा भानुयश असाही असण्याचा संभव आहे असें प्रो. साचो लिहितो. खंडखायाच्या वरुणहत टीकेंत (शक ९६२) भानुभह याच्या ग्रंथांतले आणि 'तंबरसायन ' ग्रंथांतले काहीं अनुष्टुप् श्लोक घेतले आहेत. तंवरसायनग्रंथ भानुभट्टाचाच असें तेथे स्पष्ट नाही; तरी पूर्वापरसंदर्भावरून मला तसे दिसते. आणि यावरून बेरुणीने लिहिलेला भानुरज (भानुरज्जु ?) आणि वरुणाने लिहिलेला भानुभट्ट एकच असे दिसते. त्याचा काल सुमारे शक ९०० असावा. आफ्रेचमूचीत याचे अथवा याच्या ग्रंथाचें नांव नाही. यावरून सांप्रत तो ग्रंथ बहुधा कोठे उपलब्ध नाही. तंत्ररसायनांत युगारंभापासून ग्रहसाधन होतें असें तंत्र या संज्ञेवरून होते. आणखी करणग्रंथ-करणचूडामाणि, लोकानंदकृत लोकानंदकरण, भडिलरुत भहिलकरण, हे आणखी करणग्रंथ आहेत असे सांगून शेवटी बेरुणी ह्मणतो की अशा प्रकारचे ग्रंथ असंख्य आहेत. ( भा. १ पृ. १५७ ). मागें (पृ. २५०) मी केलेले अनुमान बेरुणीच्या लिहिण्यावरून खरे ठरतें. देशकालभेदाने करणग्रंथ अनेक झाले हे साहजिक आहे. सांप्रत ते सर्व उपलब्ध नाहीत. उपलब्ध झाले तरी प्रत्यक्ष त्यांचा उपयोग नाही. तथापि ज्योतिषशास्त्राचा व सामान्यतः आपल्या देशाचा इतिहास समजण्यास त्यांचा फार उपयोग होईल. शक ९५० नंतरचे आणखी ग्रंथ आणि ग्रंथकार.* श्रीपति-याचे पाटीगणित आणि बीजगणित यांवर ग्रंथ होते, असें मुनीश्वररुत लीलावती टीकेंत याच्या ग्रंथांतले उतारे आहेत त्यांवरून दिसते. त्या उतान्यांत एक वाक्य असें आहे: दो कोटि भागरहिताभिहताः खनागचन्द्रा २८० स्तदीयचरणोनशराकदिग्भिः २०१२५ ।। ते व्यासखंडगुणिता विहताः फलं तु ज्याभिविनापि भवतो भुजकोटिजीवे ॥ यांत ज्याखंडांवांचून केवळ चापावरूनच ज्यासाधन सांगितले आहे. भास्कराही माहिती मुख्यतः गणकतरंगिणीच्या आधारे लिहिली आहे.