पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/312

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१३) काश्मीरचे अक्षांश (३४।९) दिलेले होते, व काश्मीरांत चालणारा लौकिक काल ज्या सप्तर्षीच्या गतीवर अवलंबून आहे ती गति दिलेली होती, यावरून तो काश्मीरांतला असावा असे मला वाटते. करणसारांत मध्यममेषींचे ग्रहक्षेपक देऊन त्यांवरून ग्रहमध्यमभोग काढण्याची पद्धति होती. त्यांतली मध्यममेषींची तिथि (तिथिशुद्धि ) अंशात्मक काढण्याची रीति बेरुणीने दिली आहे, तिची उपपत्ति महायुगांत चंद्रभगण ५७७५३३३६ धरून बसते. ही संख्या सूर्यसिद्धांत, उत्पलोद्धृतपुलिशसिद्धांत, पहिला आर्यसिद्धांत, यांतली आहे. या करणाचें आरबी भाषांतर बेरुणीच्या पूर्वी कोणी केलेले बेरुणीपाशी होतें (भा. २ पृ. ५५). आफ्रेचसूचीत या करणाचें नांव मुळीच नाही. यावरून सांप्रत बहुधा कोठे तें उपलब्ध नाही. वटेश्वर नांवाचा एक ज्योतिषग्रंथकार होता. बेरुणीचा वित्तेश्वर हा वटेश्वर असावा. मुजालकत लघुमानस, शक ८५४-मुंजाल हा दाक्षिणात्य होता; त्याने बृहन्मानसाचा संक्षेप करून लघुमानस केलें; त्यांत शक ८५४ मध्ये अयनांश ६५० आणि अयनगति वर्षास एक कला आहे; असें बेरुणी लिहितो. यावरून मुंजालाच्या मते शून्यायनांशवर्ष शकगत ४४४ येते. बेरुणीनें ग्रंथकाराचें नांव पुंचाल अशा प्रकारचे काही लिहिले आहे. गणकतरंगिणीकार लिहितात की "अनुष्टुप् छंदाच्या ६० श्लोकांचे लघुमानस माझ्या पाहण्यांत आले आहे. ते शक ८५४ चे आहे. त्यांत ग्रंथांत मुंजाल हे नांव नाही, परंतु शेवटी 'इति मुंजालभदृविरचित ? असें आहे. कोलक याने उजनीच्या ज्योतिष्यांनी सांगितलेले कांहीं ज्योतिष्यांचे काल लिहिले आहेत, त्यांत मुंजालाचा काल शक ८५४ आहे. भास्कराचार्यान मुंजालोक्त अयनगति सांगितली आहे. यावरून बेरुणीने लिहिलेला लघुमानसकार मुंजालच होय. मुनीश्वराने मरीचिटीकेंत मुंजालाची वचनें अशी दिली आहेतः उत्तरतो याम्यदिशं याम्यांताचदन सौम्यदिग्भागं । परिसरतां गगनसदां चलनं किंचिद्भवेदपमे ।। विषु वदपक्रममंडलसंपाते प्राचि मेषादिः । पश्चात्तुलादिरनयोरपक्रमासंभवः प्रोक्तः ॥ राशित्रयांतरेस्मात्कादिरनुक्रमान्मृगादिश्च । तत्र च परमा क्रांतिर्जिनभागमिताथ तत्रैव ।। निर्दिष्टोयनसंधिश्चलनं तत्रैव संभवति । तद्भगणाः कल्पे स्यौरसरसगोंकचंद्र १९९६६९ मिताः ॥ ही आर्याछंदाची आहेत. व यांत कल्पांतील अयनभगण दिले आहेत, ते करणग्रंथांत देण्याचे कारण नाही. आणि ही वचनें अनुष्टुप् छंदाच्या लघुमानसांत नाहीत असें तरंगिणीकार लिहितात. या लघुमानसाच्या आरंभी असें मटले आहे. - प्रकाशादित्यवत्ख्यातो भारद्वाजो द्विजोत्तमः ॥ लघुपूर्व स्फुटोपायं वक्ष्येन्यल्लघुमानसं ॥ यावरून दुसरे एक मानसकरण मुंजालाने केले होते असे दिसते. परंतु बेरुणी * Essays, II. 461. +यापुढील लघुमानसवर्णन गणकतरंगिणीच्या आधारे लिहिले आहे. लघुमानसाचा काल तरंगिणीकारांनी काही वेळा शक ८५४ व कांहीं वेला ५८४ दिला आहे. यांत ५८४ ही नजरचूक आहे असें ग्रंथांत ‘कृतेष्विभ (८५४)' असा शक दोन ठिकाणी आहे, त्यावरून व इतर प्रमाणांवरून उघड आहे.