पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/311

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

( ३१२) नत्वा शिवं स्वविरचितपाट्या गणितस्य सारमुद्धत्य । लोकव्यवहाराय प्रवक्ष्यति श्रीधराचार्यः । असें झटले आहे. यावरून त्रिशतिकेहून मोठा असाश्रीधराचा दुसरा एक पाटीगणितग्रंथ होता. त्रिशतिकेंत इष्टकर्मास स्तंभोद्देश, गुणाकारास* प्रत्युत्पन्न अशा लीलावतींतल्यांहून निराळ्या बन्याच संज्ञा आहेत. अंकगणित आणि क्षेत्रगणित हे दोन्ही विषय त्यांत आहेत. 'न्यायकंदली म्हणून न्यायशास्त्राचा एक ग्रंथ आहे. त्याचा कर्ता श्रीधर नांवाचाच आहे. तो ग्रंथ शक ९१३ चा आहे. ज्योतिषी लोकांखेरीज इतर ग्रंथकार आपला काळ बहुधा सांगत नाहीत. यावरून त्रिशती आणि च्यायकंदली यांचा कर्ता एकच असें सुधाकर ह्मणतात. न्यायकंदलीकाराचा पिता बलदेव आणि माता अब्बोका होती. दक्षिणराढा देशांत भूरिसृष्टि नांवाचा गांव हे त्याचे स्थान होय. पांडुदासाच्या प्रार्थनेवरून भट्ट श्रीधराने न्यायकंदली रचिली. हा वृत्तांत त्रिशतिकेंत नाही. आणि केवळ नामसादृश्यावरून ठरविलेल्या कालापेक्षा वर (पृ. २३०) महावीराच्या कालावरून ठरविलेला पाटीगणितकार श्रीधर याचा काल अधिक विश्वसनीय होय. महावीराने दिलेले श्रीधराचे वचन ऋणं धनर्णयोर्व! मूले स्वर्ण तयोः क्रमात् ॥ असे आहे. हे अनुष्टुप् छंदाचे असल्यामुळे आर्यात्मक त्रिशतीमध्ये असण्याचा संभव नाही हे खरे. तरी तें श्रीधराच्या पाटीगणिताच्या मोठ्या ग्रंथांतलें असेल अथवा त्याच्या वीजगणितांतलें असेल. आफ्रेचमूचीत श्रीधराचा 'त्रिशती गणितसार ' या नांवाचा ग्रंथ सांगितला आहे. यावरून कोलबूकला मिळालेला श्रीधरा चा गणितसार ग्रंथ आणि सुधाकरांनी लिहिलेला त्रिशती ग्रंथ हे एकच होत. श्रीधराची एक जातकपद्धति आहे, ती पाटीगणितकार श्रीधर याचीच असावी. बृहन्मानस करण-याचा कर्ता मनु नांवाचा आहे, यावर उत्पलकृत टीका आहे, आणि याचा संक्षेप करून मुंजालाने लघुमानस केलें असें बेरुणी लिहितो. लघुमानस शक ८५४ चे आहे. यावरून बृहन्मानस सुमारे शक ८०० चे असावें. बलभद्र-बेरुणीनं याच्या ग्रंथांतले किंवा टीकेतले अनेक उतारे दिले आहेत. गणित, संहिता आणि जातक यांवर याचा एकेक ग्रंथ होता, आणि खंडखाय व बृहज्जातक यांवर याच्या टीका होत्या, असें बेरुणी लिहितो. गणितग्रंथास बेरुणीने तंत्र म्हटले आहे; यावरून त्यांत युगारंभापासून गणित होते. ब्रह्मगुप्ताच्या सिद्धांतावरही बलभद्राची टीका होती असें बेरुणीने दिलेल्या उतान्यांवरून दिसते. पतंजलीच्या योगशास्त्राच्या ग्रंथावरील टीकेतले उतारे बेरुणीने दिले आहेत. ती टीका बलभद्राचीच असावी असें पूर्वापरसंदर्भावरून प्रो. साचो ह्मणतो. व त्यांत ज्योतिष विषयच पुष्कळ आहे यावरून ते खरे दिसते. बलभद्राच्या ग्रंथांत कनोज आणि स्थानेश्वर यांचे अक्षांश होते; यावरून तो त्या प्रांतांतला असावा. याचा काल सुमारे शक ८०० असावा. वित्तेश्वरकृत करणसार, शक ८२१-भदत्त (अथवा मिधत्त) याचा पुत्र वित्तेश्वर याने करणसार ग्रंथ केलेला होता. त्यांत आरंभवर्ष शक ८२) होते. विचेश्वर हा नागरपुर एथील राहणारा होता, असें बेरुणी लिहितो. त्याच्या ग्रंथांत

  • प्रत्युत्पन्न ही संज्ञा ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथांत आहे.