पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/310

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१५) रुणीने दिल्या आहेत, ( भाग २ पृ० १९). त्यांतल्या बहुतेक पहिल्या आर्यभटाच्या ग्रंथाशी मिळतात काही मिळत नाहीत, त्या लेखक प्रमादादिकांमुळे मिळत नसाव्या. बेरुणी याजपाशी आर्यभटीय ग्रंथाचा काही तरी भाग व त्याचे आरबी भाषांतर होते (भा. १ पृ. २४६ व आर्यभटीय, चतुर्थ पाद, आर्या पहा). हे भाषांतर खलीफ मनसूर याच्या कारकीर्दीत झाले असावें. वराहमिहिर-याचा काल बेरुणीने शक ४२७ हाच दिला आहे. ह्याच्या बृहसंहिता आणि लघुजातक या ग्रंथांचे आरबी भाषांतर बेरुणीने केले होते. बृहज्जातकावरील बलभद्रकृत टीकेचा उल्लेख वेरुणीने केला आहे. योगयात्रा आणि विवाहपटल हे वराहाचे ग्रंथ काशी एथे आहेत असें सुधाकर लिहितात. समाससंहिता नांवाचा वराहाचा ग्रंथ होता असें उत्पल लिहितो. तो बृहत्संहितेचा संक्षेप असावा. ब्रह्मगुप्त-बेरुणीच्या ग्रंथाच्या आधारें प्रो. साचो ह्मणतो की, "प्राच्य सुधारणेच्या इतिहासांत ब्रह्मगुप्ताला महत्वाचे स्थान आहे. आरब लोकांस तालमीच्या ग्रंथाची माहिती होण्यापूर्वी त्यांस ज्योतिषशास्त्र ब्रह्मगुप्ताने शिकविलें. कारण सिंधिंद आणि अल अरकंद ह्या ग्रंथांचा उल्लेख अरबी भाषेतील वाङ्मयांत वारंवार येतो. आणि ते ग्रंथ ब्रह्मगुप्ताच्या ब्रह्मासिद्धांत आणि खंडखाय या ग्रंथांची भाषांतरें आहेत." (भा. २ पृ. ३०४). ही भाषांतरें खलीफ मनसूर याच्या कारकीदीत झाली असावी. आणि यावरून सिंध प्रांतांत ब्रह्मगुप्ताचे ग्रंथ फार पसरले होते, असे दिसते. खंडखाद्याच्या बलभद्रटीकेचा उल्लेख बेरुणीने वारंवार केला आहे. ब्रह्मसिद्धांत आणि खंडखाय यांचें आरबी भाषांतर बेरुणीने केले होतें (भा० २ पू० ३०३, ३३९). त्याच्या पूर्वी आरबींत झालेले भाषांतर चांगले नव्हते असा त्याने दोष दिला आहे. ही भाषांतरें हल्ली अद्यापि उपलब्ध झाली नाहीत. बेरुणी हा मुख्यतः सिंध प्रांतांत बरीच वर्षे होता. त्या वेळी त्या प्रांतांत ब्रह्मगुप्ताच्या ग्रंथाचें प्राधान्य होते असे त्याच्या लिहिण्यांत अनेक स्थळी दिसून येते. लल्ल-याचा काल शक ४२१ असें गणकतरंगिणीकारही लिहितात. परंतु तें चुकीचे आहे असें मागे ( पृ० २२८) सिद्ध केलेच आहे. भास्कराचार्यानं गोलाध्यायांत लल्लाच्या वृत्तपृष्ठ फलानयनाचा एक श्लोक देऊन त्याचे खंडन कले आहे, यावरून लल्लाचा पाटीगणितग्रंथ असावा असे दिसते. बीजगणितावरही त्याचा ग्रंथ असेल असें सुधाकर ह्मणतात. शक ९५० पूर्वीच्या प्रसिद्ध ज्योतिष्यांचे काहींना कांहीं वर्णन बेरुणीच्या ग्रंथांत असून त्यांत लल्लाचें नांवही नाही. यावरून लल्लाचे ग्रंथ सिंध, पंजाब, काश्मीर, किंबहुना उत्तर हिंदुस्थानचा बराच भाग, यांत शक ९५० पर्यंत तरी प्रसिद्ध नव्हते. यावरून व लल्लबीजसंस्कृत प्रथमार्यसिद्धांत दक्षिणेत प्रचारांत आहे, यावरून तो दाक्षिणात्य असावा. श्रीधर-याचा त्रिशतिका या नांवाचा ३०० आर्यांचा पाटीगणिताचा एक ग्रंथ काशीराजकीयपुस्तकालयांत आहे.* त्याच्या आरंभी मुख्यतः गणकतरंगिणीच्या आधारे हे लिहिले आहे.