पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/309

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३१०) २ पृ. ३१०-१३). अल फझारी, याकूब बिन तारिक, अबअल हसन हे आरब ज्योतिषग्रंथकार इ. स. च्या ८ व्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. वर लिहिलेल्या हिंदु ज्योतिष्यांच्या साह्याने त्यांनी आरबीत ज्योतिषाचे ग्रंथ केले आहेत. प्रस्तुत हे ग्रंथ अद्यापि उपलब्ध झाले नाहीत; तरी तिघांचे ग्रंथ बेरुणी याजपाशी होते. पहिल्या दोघांच्या ग्रंथांचा त्याणे वारंवार उल्लेख केला आहे. त्या ग्रंथांत कालमानें, महायुगांतील किंवा कल्पांतील 'ग्रहभगणसंख्या, ग्रहकक्षायोजनें, मध्यमग्रहसाधनाकरितां अहर्गण करण्याचा प्रकार, भुजज्या, ग्रहांचे अस्तोदय, चंद्रदर्शन, इत्यादि संस्कृत ग्रंथांतले अनेक प्रकार होते. आरबलोक ज्योतिषशास्त्र प्रथम हिंदुज्योतिष्यांपासून शिकले व मग त्यांस टालमीच्या ग्रंथाची माहिती झाली. मुसलमानलोकांस हिंदुज्योतिष्याचे ज्ञान प्रथम करून देणारा अलफझारी होय. याकूब याणे ग्रंथ केला तेव्हां खंडखायाचें आरबी भाषांतर झाले होते.तें अलफझारीने केले असावें. पुलिशसिद्धांत-बेरुणीपाशी या सिद्धांताचें सटीक पुस्तक होते. त्याचे आरबी भाषांतर तो करीत होता (भा. २ पृ ३०५). महायुगांतले ग्रहभगण, सावन दिवस, इत्यादिकांची पुलिशोक्त माने याने दिली आहेत, ती उत्पलोद्भुत पुलिशमानांशी अगदी मिळतात. हीं माने मी मागें (पृ. १६३) दिली आहेत, त्यांत चंद्रोच्च पाणि राहु यांचे भगण नाहीत, ते बेरुणीने अनुक्रमें ४८८२१९ आणि २३२२२६ आहेत. सूर्योच्चभोग ८० अंश सांगितला आहे. पुलिशांत युगपद्धति स्मृत्युआहे, परंतु कल्पांत महायुगें १००८ आणि ७२ युगांचा एकेक असे १४ मनु, त संधि आणि संध्यांश हे त्यांत नाहीत, युगारंभ मध्यरात्रीस आहे, असें बेकी लिहितो. "पुलिशसिद्धांत हे नांव सैंत्र या नगरांतील ग्रीक पोलिस याच्या गावरून पडले आहे. सैंत्र हे अलेकझांडिआ असे मला वाटते" असें तो ह्मणगर (भा.१ पृ. १५३ ). परंतु ग्रीक लोकांत युगपद्धति मुळीच नव्हती असेंही तो ह्मणतो. ( भा. १ पृ ३७४). बेरुणीच्या वेळी उत्पलोद्धृत पुलिशसिद्धांत पुष्कळ प्रचारांत होता असें स्पष्ट दिसते. आर्यभट* पहिला-अबू अल हसन याच्या ग्रंथांतल्या ग्रहभगण संख्या बे

  • कुसुमपुरचा आर्यभट आणि त्याहून प्राचीन आर्यभट असे दोन आर्यभट बेरुणीने लिहिले आहेत; व त्यांतील प्राचीनाचा ग्रंथ मला मिळाला नाही, परंतु त्याचाच अनुयायी कुसुमपुरचा आर्यभट आहे असें तो ह्मणतो. या दोघांचा मिळून उल्लेख बेरुणीच्या ग्रंथांत ३० स्थली आला आहे. ती सर्व स्थले पाहतां त्यांतील वर्णन मी मागें (पृ० १९०, २३०) वणिलेल्या दोन आर्यभटांपैकी पहिल्यास पूर्णपणे लागू पडते. ग्रहभगणसंख्या इत्यादि ज्या गोष्टींत दोघांचा भेद स्पष्ट दिसेल अशा बेरुणीने लिहिलेल्या गोष्टी दुसऱ्या आर्यभटास मुळीच लागू पडत नाहींत, व तो पहिल्याचा अनुयायी नव्हता. यावरून बेरुणीने लिहिलेले दोन्ही आर्यभट वस्तुतः एकच होत. मो० साचो ह्याच्याही लक्षांत मी ह्मणतों ही गोष्ट आली नाही. मी वणिलेला दुसरा आर्यभट बेरुणीच्या पूर्वी झाला असावा; आणि त्याचा ग्रंथ बेरुणीने पाहिला नव्हता असे जरी उघड दिसत आहे तरी आर्यभट दोन झाले असें बेरुणीच्या कानी आल्यावरून त्याच्या समजुतींत वर लिहिल्याप्रमाणे चूक झाली असावी असे दिसते. आणि यावरून दुसरा आर्यभट शक ९५० पूर्वी नुकताच शेपन्नास वर्षांत झाला असावा. व मी मागे दाखविलेला त्याचा काल खरा आहे, असे अनुमान होते.