पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/308

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०९) तरंगिणींत “ आर्यभटाने कोणा परदेशीय यवन पंडितास देवता मानून त्याच्या रुपालवाने संपादिलेल्या भगणादिकांच्या संख्या गुप्त ठेवाव्या अशा बुद्धीने नवीन संकेताने सांगितल्या " (गणकतरंगिणी पृ. ३,५)"भास्कराचार्यानें ग्रंथसमाप्तीनंतर ज्योत्पत्ति उपपत्तीवांचून वर्णिली, यावरून परदेशांतून आलेल्या कोणा यवनापासून तो त्यासंबंधी रीति मात्र शिकला, उपपत्ति शिकला नाही, असे अनुमान होते. (गण. त., पृ. ३७), अशा प्रकारचे निराधार कल्पनातरंग कोठे कोठे उसळले आहेत. इंग्रजी नाटिकल आल्मनाक ज्या फ्रेंच ग्रंथांवरून करितात त्यांच्या आधारें संस्कृत ग्रंथ करण्याची यांची योग्यता आहे. तो ते करतील तर चांगले. शक ९५० पूर्वीचे ग्रंथ आणि ग्रंथकार यांची आणखी माहिती. या ग्रंथाची सुमारे २५० पृष्ठे छापून झाल्यावर पूर्वी न पाहिलेली अशी ज्योतिष ग्रंथांच्या माहितीची दोन तीन पुस्तकें मिळाली. त्यांवरून मिळालेली जास्त माहिती एथे देतो. अबू अल रेहान मुहम्मद बिन अहंमद अल बेरुणी या नांवाचा मुसलमान विद्वान् महंमद गजनवी याण हिंदुस्थानांत आणिला होता. तो इ० स० ९७३ मध्ये खीवा एथे जन्मला. तेथील संस्थानिकाचा तो मंत्री झाला. पुढे महंमुदानें तो प्रांत घेतला आणि बेरुणी यास नजरकैदेसारख्या स्थितीत हिंदस्थानांत आणिलें. बेरुणी हा इसवी सन १०१७ पासून सुमारे १०३१ पर्यंत हिदुस्थानांत होता. इ. स. १०३३।३२ (शक ९५३) च्या सुमारे त्याणे "डिका" या नांवाचा ग्रंथ आरबी भाषेत लिहिला आहे. त्यांत भरतखंडांतल्या अनेक शास्त्रादिकांचे वर्णन आहे. बेरुणी हा संस्कृत भाषा शिकला होता. तीतले अनेक ग्रंथ त्याने पाहिले होते. ज्योतिःशास्त्रावर त्याचा फार भर होना. कांहीं ज्योतिष ग्रंथांचे त्याणे आरबी भाषांतर केले आहे. इंडिका ग्रंथाचे इंग्रजा भाषांतर बर्लिन येथील प्रोफेसर एडवर्ड सी. साचो याणे केले आहे. त्याचे दोन भाग आहेत. मुख्यतः याच ग्रंथावरून शक ९५० च्या पूर्वीच्या ग्रंथकारांची जास्त माहिती देतो. मुसलमानलोकांत हिंदु ज्योतिषशास्त्राचा प्रसार--बगदाद एथील खलिफांच्या ताब्यांत सिंधप्रांत कांही वर्षे होता. त्यांत खलीफ मनसूर ह्याच्या कारकीर्दीत (इ. स. ७५३ पासून ७७४ पर्यंत ) त्याजकडे इ. स. ७७१ मध्ये सिंधप्रांतांतल्या एका संस्थानिकाकडून वकील गेले होते. त्यांजबरोबर काहीं ज्योतिषी होते. त्यांच्याद्वारे काही संस्कृत ज्योतिष ग्रंथांचे भाषांतर आरबीत झालें ( भाग २ पृ. १५).* इ. स. ७७८ मध्ये एक हिंदु ज्योतिषी बगदाद एथे होता. (भाग २ पृ. ६७). खलीफ हरून याच्या कारकीर्दीतही (इ. स. ७८६-८०६) वैद्यक आणि ज्योतिष या विषयांवरील कांहीं हिंदु ग्रंथांचे भाषांतर आरबींत झाले. त्यावेळी ब्रह्मगुप्ताचा ब्रह्मसिद्धांत आणि खंडखाद्य यांचे भाषांतर झाले होते, आणि निरनिराळ्या संस्कृत ज्योतिषसिद्धांतांच्या आधारें स्वतंत्र ग्रंथ आरबीत झाले होते असे दिसते. (भाग

  • याप्रमाणे भाग व पृष्ठं दिली आहेत ती बेरुणीच्या ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतराची समजावी.