पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सुधाकर द्विवेदी (जन्म शक १७८२ चैत्र शुक्ल ४ सोमवार) हे सांप्रत काशी एथे संस्कृत पाठशाळेत गणित आणि ज्योतिष यांचे मुख्य अध्यापक आहेत. शक १८११ मध्ये बापूदेव यांनी पेनशन घेतल्यावर त्यांच्या जागी यांची नेमणूक झाली. पूर्वी हे त्याच पाठशाळेत पुस्तकालयाचे अध्यक्ष होते. ह्यांस महामहोपाध्याय असें पद इंग्लिशसरकाराकडून मिळाले आहे. यांणी केलेले संस्कृत ग्रंथ येणेप्रमाणे:-(१) दीर्घवृत्तलक्षण, शक १८००, ह्यांत दीर्घवर्तुलाचे धर्म सविस्तर सोपपत्तिक सांगितले आहेत. (२) विचित्रप्रश्न, सभंग, शक १८०१, ह्यांत गणिताचे कठिण २० प्रश्न सोत्तर आहेत. (३) वास्तवचंद्रशृंगान्नतिसाधन, शक १८०२, यांत लल्ल, भास्कर, ज्ञानराज, गणेश, कमलाकर, बापूदेव, यांच्या शृंगोन्नतिसाधनांतले दोष दाखवून युरोपीय ज्योतिःशास्त्रास अनुसरून वास्तवशृंगोन्नतिसाधन सूक्ष्म सांगितले आहे. याची ९२ पर्ये आहेत. (४) द्युचरचार, शक १८०४, यांत ग्रहकक्षामार्गाचे विवेचन युरोपीय आधुनिक ज्योतिःशास्वास अनुसरून आहे. (५) पिंडप्रभाकर, शक १८०७, हा वास्तुप्रकरणी आहे. (६) भाभ्रमरेखानिरूपण, यांत छायेस अनुलक्षून सूचीछेदविचार आहे.(७) धराभ्रम, यांत पृथ्वीच्या दैनंदिनभ्रमणाचा विचार आहे. (८) ग्रहणकरण, ह्यांत ग्रहणाचें गणित करण्याची रीति आहे. (९) गोलीय रेखागणित. (१०) युक्लिडच्या ६, ११, १२ ह्या पुस्तकांचा संस्कृत श्लोकबद्ध अनुवाद. (११) गणकतरांगणी, शक १८१२, यांत भारतीय गणकांचा इतिहास आहे. प्रथम तो काशी एथील पंडितनामक मासिक पुस्तकांत छापला होता. शक १८१४ मध्ये तो निराळा छापला आहे. त्याची अष्टपत्री सांचाची १२४ पृष्ठे आहेत. बाकीच्यांपैकी बहुतेक ग्रंथ छापले आहेत. सुधाकररूत टीकाग्रंथ असे:--यंत्रराज ग्रंथावर 'प्रतिभाबोधक । नांवाची यांची टीका शक १७९५ ची आहे. ती व मलयेंदुमूरीची टीका यांसह यंत्रराज ग्रंथ शक १८०४ मध्ये यांनी शोधून छापविला आहे. भास्कररूत लीलावती नवीनोपपत्ति आणि बहुत विशेष प्रकार यांसह शक १८०० मध्ये छापविली आहे. तसेंच भास्करीय बीजही नवीन टीकेसह छापविलें आहे. करणकुतूहलावर यांची 'वासनाविभूषण' नांवाची टीका आहे. ती शक १८०३ मध्ये छापली आहे. वराहमिहिराच्या पंचसिद्धांतिकेवर 'पंचसिद्धांतिकाप्रकाश' नांवाची टीका शक १८१० मध्ये यांणी केली. ती व डाक्टर जी. थीबो बनारस संस्कृत कालेजचे त्या वेळचे प्रिन्सिपाल यांनी केलेले इंग्रजी भाषांतर यांसह तो ग्रंथ इ. स. १८८९ मध्ये छापला आहे. ह्या सर्व टीका संस्कृत आहेत. यांशिवाय रुष्णकत छादकनिर्णय, कमलाकरकृत सिद्धांततत्त्वविवेक, लल्लकृत धीवृद्धिदतंत्र, हे ग्रंथ यांनी यथाक्रम शक १८०६, ७, ८, मध्ये शोधून छापविले आहेत. हल्ली ते उत्पलटीकेसह बृहत्संहिता शोधून छापवित आहेत. त्यांनी भाषाबोधक या नांवाचा संस्कृत ग्रंथ भाषेविषयी केला आहे. हिंदीभाषेत गणिताची चलनकलन ( Calculas ) नांवाची दोन पुस्तकें केली आहेत आणि हिंदीभाषेचें व्याकरण रचिलें आहे. द्विवेदी यांचा गणकतरंगिणी ग्रंथ एकंदरीत उपयुक्त आहे. व त्यावरून आणि त्यांच्या इतर ग्रंथांवरून त्यांचें भारतीय आणि युरोपीय गणित आणि ज्योतिष यांचें उत्कृष्ट ज्योतिषज्ञान दिसून येत आहे. तरी गणक