पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/306

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०७ ) मार५०.२ विकला घेतली आहे. झीटापीशियम ही रेवती योगतारा घेऊन हिचा भोगहे, भणजे शक १८००मध्ये १८।१०।२५ अयनांश घेतले आहेत. ग्रहलाघवावरून जितके नयनांश येतात, त्यांच्या जवळ जवळ अयनांश घ्यावे अशी सूचना मी यांस केली हाता. तितकाच भोग जिचा आहे अशी एखादी रेवतीतारा आरंभस्थानी मानतां आली असती; किंवा चित्रातारेचा भोग १८० अंश मानून ग्रहलाघवाच्या जवळ जवळ अयनांश येतात, असें केतकरांच्याही ध्यानांत आले आहे. सारांश शके १८०० मध्ये सुमारे २२ अयनांश मानिले असते तर केतकरांचा ग्रंथ सहज प्रचारांत आला असता असे मला वाटते. ग्रंथाचे मुख्य चार भाग आहेत. पहिल्यांत पंचांगगणित आहे. क्षेपक सर्वत्र स्पष्टमेषींचे आहेत. दुसन्यांत ग्रहस्थानगणित आहे. त्यांत ग्रहांचे मध्यम व स्पष्ट भोग, विषुवांश, नक्षत्रतारांचे भोग इत्यादि, खस्थांचे उदयास्त, इत्यादि विषय आहेत. तिसन्यांत ग्रहणे, युति, शृंगोन्नति, इत्यादि चमत्कारांचे गणित आहे. चवथ्यांत त्रिप्रश्नाधिकारांतील लग्नमाने इत्यादि विषय आहेत. ग्रंथांत बहुधा सर्वत्र राति, उदाहरण, कोष्टके आणि उपपत्ति असा क्रम आहे. ग्रंथांत बहुधा सर्व गणितास काष्टके तयार केलेली आहेत, यामुळे त्रिकोणमिति, लाग्रथम, यांची ज्यांस माहिती नाही अशा गणकासही यावरून गणित करितां येईल. केरोपंती पंचांग या ग्रंथावरून करितां येईल. हा ग्रंथ अद्यापि छापला नाही. बाळ गंगाधर टिळक (जन्मशक १७७८ आषाढ कृष्ण ६ बुधवार, कर्क लग्न)हे ह्या देशांत तर काय, पण परदेशांतही प्रसिद्ध आहेत. हे बरीच वर्षे फर्ग्युसन कालेजांत गणित, ज्योतिष, इत्यादि विषयांचे मुख्य गुरु होते. Orion ह्या नांवांचा एक इंग्रजी ग्रंथ यांनी इ. स. १८९३ (शके १८१५). मध्ये केला आहे. त्यांत ऋग्वेदांतील सूक्तांवरून व इतर श्रुत्यादि ग्रंथांतील प्रमाणांवरून Orion (मृग) नक्षत्रपुंजांत वसंतसंपात होता तेव्हां ह्मणजे शकापूर्वी सुमारे ४००० वर्षे, कांहीं ऋग्वेद सूक्तांची रचना झाली आहे, असे सूक्ष्म आणि सविस्तर विवेचन करून दाखविले आहे. विनायक पांडुरंग खानापूरकर (जन्म शके १७८०)-हे जामदम्य गोत्री ऋग्वेदी देशस्थ ब्राह्मण सातारा जिल्ह्यांतील खानापूर एथे रहाणारे आहेत. यांचें संस्कृत भाषा, ज्योतिष इत्यादिकांचे अध्ययन जुन्या पद्धतीने झाले असून शिवाय युरोपियन गणित आणि ज्योतिष यांचेही अध्ययन केरोपंतनाना छत्रे, रावजी मोरेश्वर देवकुळे, यांजपाशी यांनी केले आहे. शक १७९६ पासून पुणे एथे “वेदशास्त्रोत्तेजक सभा " सुरू झाली आहे. तिजपुढे यांची भारतीय ज्योतिष आणि संस्कृत व्याकरण यांची परीक्षा झाली आहे. वैनाकीय द्वादशाध्यायी या नांवाचा ताजक ग्रंथ वर्षफल करण्यास फार सोयीचा असा यांनी केला आहे. तसेच कुंडसार, अर्घकांड, युक्लिडच्या दोन पुस्तकांतील सिद्धांताच्या प्रतिज्ञांचा वृत्तबद्ध संस्कृत अनुवाद, सिद्धांतसार, हे संस्कृत ग्रंथ यांनी केले आहेत. सिद्धांतसार ग्रंथांत पृथ्वीच्या गति इत्यादिकांचे विवेचन आधुनिक मताप्रमाणे केले आहे. भास्करीय लीलावती, बीज, गोलाध्याय, यांचे मराठीत भापांतर यांनी सोपपत्तिक केलें आहे व हल्ली गणिताध्यायाचें करीत आहेत. हे ग्रंथ अयापि छापले नाहीत.