पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/305

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०६) या नांवाचे मराठी पुस्तक इंग्रजीतील चेंबर्सच्या पुस्तकावरून लिहून छापले आहे. ते आतां प्रचारांत नाही. हडनच्या बीजगणिताचे मराठी भाषांतर पूर्वी झाल होते, तें इ० स०१ ८५४ मध्ये दुरुस्त करून यांनी छापविलें. ते बरीच वर्षे शाळा खात्यांत चालत असे. इ० स० १८७४ मध्ये ते व गोविंद विहल करकरे दोघाना मिळून मराठीत युक्लिडच्या भूमितीच्या पहिल्या चार पुस्तकांचे भाषांतर कल. त्यापूर्वी नानाशास्त्री आपटे यांणी केलेलें युक्लिडच्या पुस्तकाचे भाषांतर मराठी शाळात चालत असे, पुढे १८८५ पासून कै. वा० रा० मो० देवकुळे यांचे पुस्तक चालू लागले. इ. स. १८८२ मध्ये वेदांचे प्राचीनत्व या नांवाचा एक निबंध कृष्णशास्त्रा यांणी थिआसफिस्ट मासिकपुस्तकांत इंग्रजीत लिहिला, तो निराळा छापला आहे. शकापूर्वी १२०० याहून वेदांचा काल प्राचीन आहे असें निर्विवाद ज्यावरून सिद्ध होईल असें यांत कांही आहे असे मला वाटत नाही. 'मासानां मार्गशीर्षोहं' या गीतावाक्यावरून मार्गशीर्षांत वसंत असे असें घेऊन वेदकाल शकापूर्वी ३० हजार वर्षांहून प्राचीन, असे सिद्ध करण्याचा त्यांत प्रयत्न केला आहे. सिंधीभाषेत त्यांनी एक अंकगणिताचे पुस्तक इ. स. १८६९ मध्ये केलें व मराठी भाषेचें एक चांगले व्याकरण इ० स० १८६७ मध्ये केलें. इ० स० १८९५ मध्ये त्याची तिसरी आवृत्ति छापली आहे, यावरून त्याची लोकप्रियता सिद्ध होते. सिंधी भाषेविषयीही एक पुस्तक त्यांणी इ. स. १८६८ मध्ये केलें. पंचांग मध्यम रविचंद्रांवरून करावे असे त्यांचे मत एकदा प्रसिद्ध झाले होते. पूर्वोक्त वामन कृष्ण गद्रे यांनी पंचांगसाधनसार ह्मणून पुस्तक शक १७९१ मध्ये छापले. त्यांत लघुचिंतामणीचे मराठी भाषांतर सोदाहरण आहे. सारण्यांत बन्याच चुका आहेत. विद्यमान ज्योतिषगणितग्रंथकार. वेंकटेश बापूजी केतकर (जन्मशक १७७५ पौष शुद्ध १४ शुक्रवार )-हे गार्ग्य गोत्री ऋग्वेदी चित्तपावन ब्राह्मण. हे या प्रांतांतील शाळाखात्यांत इ.स १८७४ पासून शिक्षक आहेत. हल्ली ते बरीच वर्षे बागलकोट एथे इंग्रजी शाळेचे हेडमास्तर आहेत. यांचे अध्ययन मुख्यत्वें बेळगांव एथे झाले. यांचे वडीलही चांगले ज्योतिषी होते. त्यांनी केरोपंती ग्रह साधन कोष्टक हा ग्रंथ संस्कृतांत उतरला आहे. तो छापला नाही. ह्यांचे पूर्वज पांच सहा पिढ्या पैठण एथे रहात असत. तेथून बापू हे नरगुंदास व पुढें रामदुर्गास गेले. तेथील संस्थानिकांचा यांस आश्रय होता. वेंकटेश यांनी ज्योतिर्गणित या नांवाचा एक फार उपयोगी संस्कृत ग्रंथ शक १८१२ च्या सुमारास केला आहे. त्यांत आरंभवर्ष शक १८०० आहे. नाटिकल आल्मनाक ज्या फ्रेंच ग्रंथांच्या आधारें करितात त्यांच्या आधारे हा केला आहे, व त्यावरून ग्रह फार सूक्ष्म-ना० आ० च्या ग्रहांशी फार तर एक कलेच्या फरकानेंयेतात. आजपर्यंत ह्या प्रांतांत किंबहुना आपल्या देशांत असा ग्रंथ झाला नाही. ह्या ग्रंथांत वर्षमान शुद्ध नाक्षत्र (३६५।१५।२२।५३)आणि अयनगतिवास्तव ह्मणजे सु

  • ही शास्त्रीबोवांचे चिरंजीव अनंत कृष्ण यांनी छापविली आहे. तीत त्यांनी कृष्णशाल्यांचं चरित्र दिले आहे. त्यावरून व स्वतः मिळविलेल्या माहितीवरून वरील वृत्त दिले आहे.