पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/304

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०५) व ग्रंथाची पृष्ठे अष्टपत्री सांच्याची सुमारे ८०० होतील असा अजमास होता. हा ग्रंथ छापला नाही.* रघुनाथाचार्य हे शक १७९१ पासून दृग्गणितपंचांग या नांवाचें पंचांग नाटिकल आल्मनाकच्या आधारे करीत असत. त्यांच्यामागे त्यांच्या दोन पुत्रांनी छापलेलें शक १८०८ चे पंचांग मी पाहिले, त्यांत अयनांश २२। ५ व वर्षमान सूर्यसिद्धांताचे आहे असे दिसते. वडील पुत्र सी. राघवाचार्य शक १८११ च्या सुमारे निवर्तले. धाकटे पुत्र आणि त्यांचे मेहुणे पी. राघवाचार्य, हल्लीचे मद्रास वेधशाळेतले फर्स्ट असिस्टंट, हे हल्ली ते पंचांग करितात. कृष्णशास्त्री गोडबोले, जन्मशक १७५३. हे कौशिकगोत्री हिरण्यकेशी शाखेचे चित्तपावन ब्राह्मण. ह्यांचे जन्म शक .१७५३ श्रावण कृ० १० तारीख १ सप्तंबर रोजी वाई येथे झालें. वृत्त. ह्यांचा विद्याभ्यास पुणे एथे प्रथम एका मराठी शाळेत व पुढे संस्कृत पाठशाळेत व पूना कॉलेजांत झाला. ह्यांस लहानपणापासून गणिताचा नाद असे. पाठशाळेंत शंकर जोशी ह्यांजपाशीं त्यांनी ज्योतिषशास्त्राचे अध्ययन केलें. तारीख १९ माहे आक्टोवर सन १८५५ रोजी त्यांस पूना कॉलेजच्या नामलस्कूल ह्या भागांत शिक्षक नेमिलें. त्यांत ते मुख्यतः गणित शिकवीत. १८६४-१८६५ मध्ये काही दिवस त्यांस मुंबई एथें कुलाबा वेधशाळेत नमिलें होते. १८६५ मध्ये पुनः पूना ट्रेनिंग कॉलेजांत त्यांची नेमणूक झाली. १८६६ मध्ये सिंत हैद्राबाद हायस्कुलांत व १८६७ मध्ये कराची हायस्कुलांत त्यांची नेमणूक झाली. १८७२ साली काही दिवस पुणे हायस्कुलांत व पुढे काही दिवस मुंबई एल्फिन्स्टन हायस्कुलांत ते असिस्टंट मास्तर होते. व पुढे त्याच वर्षापासून १८८२ मार्चपर्यंत मुंबईत फणसवाडी आंग्लो-मराठी शाळेचे हेडमास्तर होते. पुढे पेन्शन घेऊन आपल्या घरी पुणे एथे रहात असत. १८८६ ता० २२ नोवेंबर रोजी ते निवर्तले. सिंध प्रांतांत असतां त्यांनी सिंधी भाषेचे चांगले अध्ययन केले व काहीं फारसीचेही केलें. इ० स० १८७१ पासून १८७९ पर्यंत मुंबई विश्वविद्यालयपरीक्षांत ते सिंधी भाषेचे परीक्षक असत. शक १७७८ मध्ये त्यांणी व वामन कृष्ण जोशी गद्रे यांणी मिळून ग्रहलाघ वाचे मराठी भाषांतर सोदाहरण करून छापले. ते बहुतेक विश्व नाथी टीकेचे भाषांतर आहे. या पुस्तकाची दुसरी आवृत्ति छापली आहे. कृष्णशास्त्री यांणी ग्रहलाघवाची उपपत्तिही मराठीत लिहिली आहे; तीत मल्लारी टीकेंतले दोष दुरुस्त केले आहेत असे समजतें. ही छापण्याजोगी आहे. याशिवाय त्यांणी शक १८०७ च्या सुमारे लिहिलेला ज्योतिःशास्त्राच्या इतिहासाचा लहानसा लेख माझ्या पाहण्यांत आला होता. इ० स० १८६२ साली ज्योतिःशास्त्र' ग्रंथ.

  • इ.स.१८७१ मध्ये शनाग्रस्त सूर्यग्रहण झाले, त्याचे गणित रघुनाथाचार्यानी केलेलें अनेक भाषांत त्यांणी प्रसिद्ध करविले होते. त्यांच्या इंग्रजी पुस्तकांत ह्या खटपटीची हकीकत आहे. मुख्यतः निज वरून व मद्रास एथील प्रसिद्ध एस्. एम्. नटेशशास्त्री यांणी वर्तमानपत्रादिकांत छापलेली माहिती पाठविली तिजवरून रघुनाथाचार्याचे वृत्त वर दिले आहे.