पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/303

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

परंतु ते प्रसिद्ध करण्याचा योग काही वर्षे आला नाही. इंग्रजी नाटिकल आल्मनाकवरून गणित वगैरे करण्यास कामापुरतें इंग्रजी ते स्वतःच शिकले होते. शक १७८७ (इ. स.१८६५)पासून केरोपंत हे शुद्ध निरयन पंचांग काढू लागले. तेव्हांपासून केरोपंतांनी सायनमान स्वीकारावे याबद्दल लेले यांणी 'स्फुटवक्ता अभियोगी' या नांवाने वर्तमानपत्रांतून पुष्कळ वर्षे वाद केला. केरोपंतांनी तिकडे लक्ष दिले नाही, व अमुक प्रकारचे पंचांग पाहिजे तें धर्मशास्त्रानुसार पाहिजे या गोष्टीकडे यांचे लक्ष दिसलें नाहीं, ह्मणून त्यांशी वाद करणे सोडून लेले हे इतर काही मंडळीसह शक १८०६ पासून स्वतंत्र सायन पंचांग काढू लागले. त्याचें वर्णन पुढे पंचांगप्रकरणांत आहे. सायन पंचांग ज्यावरून करितां येईल असा ग्रंथ लेले यांणी केला नाही. यामुळे तें प्रचारांत येणें पराधीन होय. चिंतामणि रघुनाथ आचार्य, जन्मशक १७५०. हे मद्रास एथील ज्योतिषवेधशाळेत १७ वर्षे फर्स्ट असिस्टंट होते. आपल्या प्रांतांत जसे केरोपंत, काशीकडे बापूदेव, तसे मद्रास इलावृत्त. ख्यांत चिंतामणि रघुनाथाचार्य हे होते. यांचे जन्म सौरमानाने शक १७४९ सर्वजित् संवत्सर पंगुणी मासाचा ६ वा दिवस ह्मणजे चांदसौरमानाने शक १७५० चैत्र शुक्ल २ ता० १७ मार्च इ. स. १८२८ या दिवशी झाले. यांची जन्मभाषा व जन्मदेश तामिळ (द्राविड) असे दिसते. ह्यांस संस्कृतभाषा यंत नव्हती असें त्यांणींच लिहिले आहे. तरी युरोपीय गणिताचे आणि ज्योतिषाचे ज्ञान यांस उत्तम होते. व त्यामुळे भारतीय ज्योतिषाचें साहजिक झाले होते. व पुष्कळ वर्षे ते प्रत्यक्ष वेध घेत असत. त्या कामी त्यांची फार प्रसिद्धि आहे. इ.स. १८७२ पासून विलायतेंतील रायल आस्ट्रानामिकल सोसायटीचे ते फेलो होते. हे प्रथम इ. स. १८४७ मध्ये मद्रास वेधशाळेत नोकरीस लागले. तेव्हांपासून शेवटपर्यंत तेथेच होते. शक १८०१ पौष, ता० ५ फेब्रुआरी रोजी वयाच्या ५२ व्या वर्षी ते निवर्तले. यांचे घराणे ज्योतिष्यांचे आहे. यांचे वडीलही मद्रास वेधशाळेंत असिस्टंट होते. मद्रास वेधशाळेंत तारास्थितिपत्रक (क्याटलाग) तयार झाले आहे, त्यांतले पुष्कळ वेध चिंतामणि यांणी घेतले आहेत. त्यांणी नवीन दोन रूपविकारी तारा इ. स. १८६७ व १८७८ मध्ये शोधून काढिल्या. अशा प्रकारच्या शोधासंबंधाच्या यादीत हिंदु मनुष्याचें नांव पहिले यांचंच आहे. 'ज्योतिषचिंतामणि' या नांवाचा ग्रंथ रघुनाथाचार्यानी केला आहे. त्याचे ३ भाग आहेत. पहिल्यांत मध्यम गति, पृथ्व्यादि ग्रहांचा आकार, महत्व इत्यादिकांचे विवेचन आहे. दुसन्यांत स्फुटगतिस्थिति इत्यादि आहे. तिसन्याचें नांव करणपद्धति आहे, त्यांत ग्रहगणित करण्याकरिता कोष्टके आहेत. हा ग्रंथ मूळचा द्राविडी (तामिल) भाषेत आहे असे दिसते. त्याचे संस्कृत भाषांतर करून ते तामिल, तेलंगी आणि देवनागरी लिपीत छापण्याची तजवीज करण्याकरितां इ. स. १८७४ साली मधास एथे सभा होऊन तीह काही विचार झाला होता. ५०० प्रती छापण्यास खर्च समारे ७००० रुपये येईल अथ इत्यादि महत्व इत्यादिकाच