पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/302

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

च्या ग्रंथावरून ग्रहस्थिति पुष्कळ शुद्ध येते; परंतु तो ग्रंथ आणि पटवर्धनी पंचांग प्रचारांत नाही. व त्या पंचांगाप्रमाणे कोणी वागत नाहीत म्हटले तरी चालेल. या पंचांगाचे अधिक वर्णन पुढे येईल. तिथिसाधनाचा तिथिचिंतामणीसारखा ग्रंथ नानांनी केला आहे. तो काशी एथे छापला आहे. तो छापणारा इकडे कोणी मिळाला नाहीं ! इकडे कोणास बहुधा तो ठाऊकही नाही, व हल्ली तो व ग्रहसाधनाची कोष्टके हे दोन्ही ग्रंथ मिळत नाहीत. ग्रहसाधन पुस्तकांत वर्ष शुद्ध निरयन नाही आणि ग्रह सायन आहेत. यामुळे ग्रहलाघवीय निरयन, शुद्धनिरयन, आणि सायन यांपैकी कोणतेच पंचांग करण्यास प्रत्यक्ष तो ग्रंथ उपयोगी नाही. शिवाय त्यांत लाग्रथम आणि त्रिकोपामिति यांचे साह्य लागते यामुळे जुन्या जोशांस त्यावरून गणित करितां येत नाही. नवीन शिकलेल्यांत तरी त्यावरून ज्यांस गणित करितां येते असे दहापांच इसम मिळतील की नाही नकळे. नानांनी मराठी शाळांत उपयोगी अशी पदार्थविज्ञानशास्त्र आणि अंकगणित ही दोन पुस्तकें केली आहेत. महाराष्ट्रांत त्यांचे प्रत्यक्ष किंवा परंपरया शिष्य हजारों आहेत. विसाजी रघुनाथ लेले, जन्मशक १७४९. हा एक विलक्षण बुद्धिमान् आणि कल्पक असा पुरुष ह्या देशांत होऊन गेला. वृत्त. ग्रहलाघवीय मानानें शक १७४९ (इ० स०१८२७) श्रावण कृष्ण १० शुक्रवारी मकरलमी नाशिक एथे लेले यांचे जन्म झाले. हे काश्यपगोत्री हिरण्यकेशी शाखेचे चितपावन ब्राह्मण होत. लहानपणी नाशिक एथे मराठी शाकैत ११ वर्षांच्या वयापर्यंत यांचा पूर्णाक अपूर्णांकाचा अभ्यास झाला व मातुलगृहीं थोडासा संस्कृताचा अभ्यास झाला. यांचें गुरुमुख अध्ययन कायतें इतकेंच. परंतु यांचा स्वतःचा प्रयत्न व बुद्धि यांणी ते इंग्रजीतील विश्वविद्यालयपदधरांसही असाध्य असें गणित करीत.* नाशिक एथे किरकोळ नोकरीवर काही वर्षे निबहि करून पुढे शक १७८२ च्या सुमारास ते ग्वालेर एथे गेले. पुढे शिंदेसरकारच्या राज्यांत पैमाषखात्यांत व हिशेबीखात्यांत त्यांस नौकरी होती. त्यांचे बालबोध मोडी अक्षर फारच सुरेख होतें. नकाशे उत्तम काढीत. त्यांच्या हिशेबांत चूक तर सांपडावयाचीच नाही. ३३ वर्षे नोकरी करून शक १८१६ च्या सुमारे त्यांणीं पेन्शन घेतले व शक १८१७ कार्तिक क० ६ शुक्रवारी वयाच्या ६९ व्या वर्षी ते बालेर एथे निवर्तले. पंचांग सायन मानाचे असावे हा विचार पुष्कळांच्या मनात येतो. लेले यांच्या माय पंचांग. पूर्वी पुष्कळांच्या मनांत तो आला असेल व आला होता. लेले यांच्याही मनांत स्वभावतःच तो आला व ते पंचांग मात्र धर्मशास्त्रानुसार आहे अशी त्यांची खात्री झाली. ते ग्रहलाघवाच्या साह्यानेच कांहीं दिवस कामापुरतें सायनपंचांग करीत व पुढें नाटिकल आल्मनाकवरून करूं लागले.

  • लेले यांचा माझा प्रत्यक्ष आणि पत्रद्वारा परिचय होता; त्यावरून त्यांचे बहुतेक वृत्त लिहि. आहे. आक्टोबर १८८८ च्या बालबोध मासिकपुस्तकांत त्यांचं चरित्र प्रसिद्ध झाले आहे.