पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/301

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रोफेसर आर्लिबारसाहेबांचे हे प्रिय शिष्य होते. इ.स. १८४० मध्ये मुंबई एथे कु. लाबदांडीवर अंतरिक्षचमत्कार आणि लोहचुंबक यांचे अनुभव घेण्याकरितां वेधशाला झाली; तिची सुरुवात आर्लिबारसाहेबांनी केली, तेव्हां तेथे केरोपंतांची नेमणूक असिस्टंटच्या जागी केली. इ. स. १८५१ जूनच्या ७ व्या तारखेस पुणे संस्कृत पाठशाळेच्या जागी 'पूना कालेज' झाले, त्यानंतर काही महिन्यांनी तेथे त्याच्या मराठी व नार्मलस्कूल या भागांत सृष्टिशास्त्र आणि गणित शिकविण्याकरितां असिस्टंट प्रोफेसरच्या जागी त्यांची नेमणूक झाली. त्या कालेजांत हे विषय मराठीत व इंग्रजीतही ते शिकवीत असत. पुढे त्या कालेजाचा नार्मल स्कूल हा भाग निराळा झाला, त्यांत ते अध्यापक होते. व पुढे काही वर्षे त्याचे मुख्य (सुपरिंटेंडेंट) होते. त्या वेळेस त्या विद्यालयास व्हयाक्युलर कालेज असेंही ह्मणत. (हल्ली ट्रेनिंग कालेज ह्मणतात.) यावेळी काही दिवस ते इंजिनिअरिंग कालेजांतही सृष्टिशास्त्रावर व्याख्याने देत. मध्ये काही दिवस ते अहमदनगर इंग्लिश स्कुलाचे हेडमास्तर होते. इ. स. १८६५ मध्ये त्यांस पूना कालेजांत गणित आणि सृष्टिशास्त्र यांचे प्रोफेसर नेमले. तेथे हे विषय ते इंग्रजीत शिकवीत. त्या कालेजास पुढे डेक्कन कालेज ह्मणूं लागले. इ. स. १८७९ मध्ये त्यांणी पेनशन घेतले. त्या वेळी त्यांस १००० रुपये दरमहा होता. नेटिव लोकांस मिळणारे अति मोठे पेनशन, वर्षाचे ५००० रुपये त्यांस मिळाले. इ० स० १८७७ मध्ये दिल्ली दरबाराच्या वेळी त्यांस रावबहादूर असा किताब इंग्रजसरकाराकडून मिळाला. इ.स. १८८४ च्या मार्चच्या १९ व्या तारखेस वयाच्या ६० व्या वर्षी ते निवर्तले. त्यांचे लोकप्रिय नांव नाना असे होते. यांच्या अंगच्या अनेक सद्गुणांत सततविद्याव्यासंगिता आणि स्वभावसौजन्य हे गुण विशेष वाखाणण्यासारखे होते. नानांनी फ्रेंच आणि इंग्लिश ज्योतिष ग्रंथांच्या आधारे ग्रहसाधनाची कोष्टकें ग्रंथ. या नांवाचा मराठी ग्रंथ शक १७७२ च्या सुमारे तयार केला व तो शक १७८२ (इ. स. १८६० ) मध्ये छापिला.* याच्या पूर्वी मराठीत व संस्कृतांत असा ग्रंथ नव्हता, ह्मणून याची योग्यता मोठी आहे. ह्या ग्रंथांत वर्षमान सूर्यसिद्धांतांतलें घेतले आहे आणि ग्रहगतिस्थिति सायन घेतल्या आहेत. यामुळे ग्रंथावरून ग्रह सायन येतात. रेवतीयोगतारा झिटापिशियम मानिली आहे. ती शक ४९६ मध्ये मेषसंपाती होती. त्या वर्षी अयनांश शून्य मा नावे आणि अयनगति वर्षाची ५०.१ विकला घेऊन त्याप्रमाणे अयनांशसंस्कार सायन ग्रहांस करून निरयन ग्रह करावे असे सांगितले आहे. यांत निरयन वर्षमान शुद्ध ह्मणजे ३६५।१५।२३ घेतल्यासारखे होते. हे वर्षमान व ५०.२ अयनमति घेऊन केरोपंत नाना हे शके १७८७ पासून नाटिकल आल्मनाकवरून निराळे पंचांग प्रास द्ध करूं लागले. कै. वा० आबासाहेब पटवर्धन ह्यांचें केरोपंतांस मोठे साह्य होत. त्यांच्या उत्तेजनाने सदरील ग्रंथ झाला, आणि पंचांग प्रसिद्ध होऊ लागले. त्या पंचांगास नानांनी पटवर्धनी पंचांग असेंच नांव दिले आहे. नाना- *तो R. S. Vince ने इ. स. १८०८ मध्ये केलेल्या ग्रंथाच्या आधारे केला असें कृष्णश' मी गोडबोले लिहितात.