पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/300

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३०१) सायनवाद, प्राचीन ज्योतिषाचायशियवर्णन, अष्टादशविचित्रप्रश्नसंग्रह सोचर, तत्त्वविवेकपरीक्षा, मानमंदिरस्थ यंत्रवर्णन, अंकगणित, हे संस्कृत भाषेत केलेले लहानमोठे ग्रंथ आहेत. हे सर्व छापलेले आहेत. शिवाय चलनकलनसिद्धांतबोधक वीस श्लोक, चापीयत्रिकोणमितिसंबंधी काही सूत्रे, सिद्धांतग्रंथोपयोगी टिपणे, यंत्रराजोपयोगी छेद्यक, लघुशंकुछिन्नक्षेत्रगुण हे त्यांचे संस्कृत लहानमोठे ग्रंथ छापलेले नाहीत. हिंदी भाषेत यांनी केलेले अंकगणित, बीजगणित, व फलितविचार हे ग्रंथ छापले आहेत. सिद्धांतशिरोमणि गोलाध्याय याचा इंग्लिश अनुवाद एल्. विलकिनसन याने केलेला यांनी तपासला व सूर्यसिद्धांताचा अनुवाद यांनी केला. हे दोन्ही आर्च डीकन प्राट याच्या देखरेखीने तयार होऊन इ. स. १८६१-६२ मध्ये छापले आहेत. आणि भास्कररुत सिद्धांतशिरोमणीचे गणित आणि गोल हे अध्याय शोधपूर्वक आणि टिपणीसहित शक १७८८ मध्ये व लीलावती शक १८०५ मध्ये यांणी छापली आहे.* शक १७९७ पासून १८१२ पर्यंत हे नाटिकल आल्मनाकच्या आधारें पंचांग करून छापवीत असत. त्या पंचांगाचे वर्णन पुढे पंचांगविचारांत आहे. हे पंचांग करण्याचा ग्रंथ त्यांनी केलेला नाही. नीलांबरशर्मा, जन्मशक १७४५. हा गंगा-गंडकी संगमापासून दोन कोशांवर पाटलीपुत्र (पाटणा) एथे राहणारा मैथिल ब्राह्मण होता. याच्या पित्याचें नांव शंभुनाथ होतें. वडील बंधु जीवनाथ याजपाशी व काही दिवस काशीच्या संस्कृत पाठशाळेत याणे अध्ययन केलें. अलवरचा राजा शिव याच्या सभेत हा मुख्य ज्योतिषी होता. हा शक १८०५ मध्ये काशी एथे निवर्तला. याणे पाश्चात्य पद्धत्यनुसारें 'गोलप्रकाश नांवाचा ग्रंथ संस्कृत भाषेत केला. तो शक १७९३ मध्ये काशी एथे बापूदेव यांणी छापला आहे. यांत पांच अध्याय आहेत. त्यांत ज्योत्पत्ति, त्रिकोणमितिसिद्धांत, चापीयरेखागणितसिद्धांत, चापीयत्रिकोणमितिसिद्धांत, प्रश्न, असे विषय आहेत. इंग्लिश भाषा न जाणणारास हा ग्रंथ फार उपयोगी आहे. भास्करीय ग्रंथाच्या काही भागांवर याणे टीका केली आहे. ह्याचा ज्येष्ठबंधु जीवनाथ ह्याणे भास्कर बीजटीका केली आहे व भावप्रकाशादि फलग्रंथ केले आहेत. विनायक ऊर्फ केरो लक्ष्मण छत्रे, जन्मशक १७४६. महाराष्ट्र देशांत इंग्रजी राज्य झाल्यावर पाश्चात्य विद्युत निपुण अशी जी मंडळी झाली तींत केरोपंत नाना हे एक नामांकित होऊन गेले. हे वृत्त. मुख्यतः गणितशास्त्र, ज्योतिषशास्त्र आणि सृष्टिशास्त्र यांत निपुण होते. मुंबईच्या दक्षिणेस १३ कोशांवर अष्टागर प्रांतांत नागांवया नांवाचा गांव समुद्रतीरी आहे. तेथे इ. स. १८२४ च्या मे महिन्यांत यांचे जन्म झाले. हे काश्यप गोत्री ऋग्वेदी चितपावन ब्राह्मण होत. त्यांचे इंग्रजी भाषेचे आणि तद्वारा तीतील शास्त्रांचे अध्ययन मुंबई रथे एलफिनस्टन इन्स्टिटयूशन नांवाच्या विद्यालयांत झाले. "मुख्यतः गणकतरांगणीवरून हे सर्व वृच लिहिले आहे.