पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/299

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(३००) नांवाचा शक १७५९ मध्ये केला. तो पुणे एथे बाबा जोशी यांजकडे पाठविला होता. त्यांनी त्याने मंडन केलें, असें यासंबंधे पत्रव्यवहार गणकतरंगिणीकारांनी यथामूल दिला आहे त्यावरून दिसून येतें. * यज्ञेश्वररुत ग्रंथ असेः-यंत्रराज ग्रंथावर यंत्रराजवासना या नांवाची टीका शक १७६४ ची आहे. चिंतामणिदीक्षितरुत गोलानंदावर अनुभाग्रंथ. विका नांवाची टीका आहे. लघुचिंतामणीवर मणिकांति या नांवाची यज्ञेश्वररुत टीका आहे, ती याचीच असावी. या ग्रंथांवरून यज्ञेश्वरास ज्योतिष-सिद्धांत ग्रंथांचे ज्ञान चांगले होते असे दिसून येते. प्रश्नोत्तरमालिका या नांवाच्या स्वरूत ग्रंथाचा उल्लेख गोलानंदटीकेंत याने केला आहे. नृसिंह ऊर्फ बापू देव, जन्मशक १७४३. ह्या देशांत इंग्रजी राज्य झाल्यावर भारतीय आणि युरोपीय दोन्ही प्रकारच्या गणितांत आणि ज्योतिषशास्त्रांत निपुण असे जे विद्वान् झाले त्यांतले बापूदेव हे होत. हे ऋग्वेदी चितपावन ब्राह्मण मूळचे अहमदनगर जिल्ह्यांत गोवृन. दातीरी टोके एथे राहणारे होत. ह्यांचे जन्म शक १७४३ कार्तिक शु०६ (ता. १ नवंबर १८२१ रोजी ) झाले. ह्यांच्या पित्याचे नांव सीताराम आणि आईचें सत्यभामा होतें. ह्यांचे प्रथमचे अध्ययन नागपूर एथील शाळेत मराठीत झाले. व तेथेच त्यांनी दुढिराज नामक कान्यकुब्ज विद्वानापाशीं भास्करीय लीलावती आणि बीज ह्यांचे अध्ययन केले. श क १७६० मध्ये सिहूरचे एजंट एल्. विलकिनसन ह्यांनी बापूदेव हे गणितनिपुण पाहून त्यांस सिहूर एथे संस्कृत पाठशाळेत अध्ययनार्थ नेले. तेथे त्यांणी सेवाराम याजपाशी रेखागणितादिकांचा अभ्यास केला. पुढें विलकिनसन ह्यांच्या द्वारे त्यांची नेमणूक काशी एथील संस्कृत पाठशाळेत रेखागणित शिकविण्याच्या कामाकडे शक १७६३ (इ. स. १८४१) मध्ये झाली. तेव्हांपासून शेवटपर्यंत ते काशी एथे होते. शक १७८१ मध्ये त्याच पाठशाळेत ते मुख्य गणिताध्यापक झाले. त्यांणी शक १८१३ मध्ये पेनशन घेतले. नंतर ते शक १८१२ वैशाख मासी वयाच्या ६९ व्या वर्षी निवर्तले. त्यांच्या हाताखाली अनेक शिष्य तयार झाले. इ. स. १८६४ मध्ये ते ग्रेट ब्रिटन व आयर्लंड एथील रायल एशिया टिक सोसायटीचे व इ.स. १८६८ मध्ये बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे आदररूत (Honorary) सभासद झाले. इ. स. १८६९ मध्ये ते कलकत्ता विश्वविद्यालयाचे परिषद ( Fellow) झाले. अलाहाबाद विश्वविद्यालयाचेही हे परिषद होते. त्यांस इ. स. १८७८ मध्ये सी. आय. ई. हा किताब व इ. स. १८८७ मध्ये महाराज्ञीच्या शता|त्सवसमयीं महामहोपाध्याय पद इंग्रज सरकाराकडून मिळाले. एकदा चंद्रग्रहण बरोबर वर्तविले ह्मणून जमूच्या राजाने ह्यांस १००० रुपये बक्षीस दिले. यांणी केलेले ग्रंथ असेः-रेखागणित प्रथमाध्याय, त्रिकोणामितीचा कांहीं भाग, * अविरोधप्रकाशखंड पर ग्रंथ सिद्धांतमंजूषा या नांवाचा काशी येथील शिवलाल पाठक यांनी केला होता; तसेंच शिवलालाच्या धाकट्या बंधूचा शिष्य बाळकृष्ण याने टुष्टमुखचपे. दिका नांवा चा केला होता. हे दोन्ही ग्रंथ शक १७५९ च्या अगोदर झाले होते.