पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/298

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सौकर्य. (२९९) रणांत शक १७४४ पलभा ४ देशांतर योजनें २८ प. आहे. (३) लमसारणी. (४) क्रांतिसारणी, उदाहरण शक १७५३. (५) चंद्रोदयांकजाल, उदाहरण शक १७५७. (६) दृकर्मसारणी, उदाहरण शक १७५८. (७)ग्रहणांकजाल, उदाहरण शक १७५५।६३. (८) गणेशरुत पातसारणी (शक १४४४) ची टीका, उदाहरण शक १७६१. (९) यंत्रचिंतामणिटीका, ही चक्रधरकत यंत्रग्रंथावर टीका आहे. दिनकर हा चांगला कल्पक गणिती होता आणि त्यास वेधाचे ज्ञान होतें असें त्याच्या ग्रंथांवरून दिसते. ग्रहलाघवावरून कोणतेही गणित करण्यास, व मुख्यतः मध्यम आणि स्पष्ट ग्रह करण्यास उपयोगी अशा दिनकररुत सारण्यांसारख्या सारण्या ग्रहलाघवगणित पुष्कळ जोशांपाशी केलेल्या आढळतात. ग्रहलाघवांतील श्लो कोक्त रीतीने जें गणित करण्यास पांच सहा घटिका लागतात तेंच अशा सारण्यांनी एका घटिकेत होते. वामन कृष्ण जोशी कन्नडकर यांणीं अशा प्रकारच्या सारण्यांचा ग्रंथ 'बृहत्पंचांगसाधनोदाहरण' नांवाचा शक १८०३ मध्ये छापला आहे. केशवीचे पुस्तक छापले आहे, त्यांतही अशा सारण्या आहेत. अशा प्रकारच्या युक्तींची ज्यांस कल्पना नाही व त्यामुळे ज्यांस गणित करण्यास फार श्रम पडतात असेही ज्योतिषी पुष्कळ आढळतात. यज्ञेश्वर ऊर्फ बाबाजोशी रोडे. याचे गोत्र शांडिल्य, याच्या पित्याचे नांव सदाशिव आणि पितामहाचें नांव राम होते. सातारकर चिंतामणि दीक्षित यांचा हा दौहित्र होता महाराष्ट्रांत इंग्लिश राज्य झाल्यावर पुणे एथे संस्कृत पाठशाला झाली होती, तींत हा इ० स० १८३८ सप्टेंबर (शक १७६० ) पर्यंत ज्योतिष शास्त्राचा गुरु होता.* कधींपासून होता हे समजले नाही. माळव्यांत सिहूर एथे संस्कृत पाठशाला होती, तींतील मुख्य पंडित आणि ज्योतिषी सुबाजी बापू याने सिद्धांतशिरोमणिप्रकाश ह्मणून लहानसा ग्रंथ केला आहे. त्यांत ज्योतिषसंबंधे पौराणिक मत, संस्कृत ज्योतिषसिद्धांतमत आणि कोपर्निकसाचे मत यांची तुलना केली आहे. या ग्रंथाचे खंडन करण्यास यज्ञेश्वराने ज्योतिःपुराणविरोधमर्दन नांवाचा ग्रंथ केला, असें भारतवर्षीय अर्वाचीन इतिहासाचे कर्ते र० भा० गोडबोले लिहितात. व तो फार बुद्धिमान् आणि विद्वान् परंतु दुराग्रहाने पौराणिक मताचा अभिमानी होता असें क्यांडीसाहेब लिहितात. परंतु नीळकंठरुत अविरोधप्रकाश म्हणून एक ग्रंथ आहे. त्यांत ज्योतिषशास्त्र व पुराणे यांच्या मतांचा विरोध नाहीं असें दाखविले आहे. सिहूरचा पोलिटिकल एजंट इलकिनसन ह्यास भारतीय ज्योतिषाचे ज्ञान चांगले होते. त्याने इ० स० १८४१ (शक १७६३ ) मध्ये सिद्धांतशिरोमणि ग्रंथ कलकत्ता एथे छापविला आहे. त्याच्या सांगण्यावरून पूर्वोक्त सुबाजी बापू यांनी अविरोधप्रकाशखंडनपर ग्रंथ अविरोधप्रकाशविवेक

  • पुणे संस्कृत पाठशाला ( Poona Sanskrit College) इ० स० १८२१ मध्ये चापलेनसाहेब दक्षिणचे कमिशनर यांनी स्थापिली. पुढे इ. स. १८५१ मध्ये तिचे अगदी रूपांतर झाले, तेव्हां ती नाहीशी झाली म्हटले असतां चालेल. (बोर्ड आफ एजुकेशनचे १८४०, ४१, ५१, ५२ चे रिपोर्ट पहा.)