पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/297

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(१९८) देऊन तिथ्यादिसाधनही यांत आणिलें आहे. तथापि एकंदरीत पाहता याची योग्यता ग्रहलाघवाहून पुष्कळच कमी आहे. राघवाचा दुसरा ग्रंथ पंचांगार्क यापेक्षां हा बरा आहे. पंचांगा शक १७३९ चा आहे. पंचागसाधन पूर्व गणकांनी केले, त्यांत अब्दपादि संज्ञांची कारणे गोपित ठविलीं, ह्मणून राघव याने पंचांगार्क ग्रंथ केला. त्यावर टीका ग्रंथकाराचीच आहे. हा ग्रंथ पुणतांबें एथे केला. केवळ या ग्रंथानें निवाह व्हावयाचा नाही. कारण यांत पराव्य संस्कार लघुचिंतामणीतलाच घेण्यास सांगितला आहे, आणि मध्यमग्रहसाधन मात्र सांगितले आहे. स्पष्टीकरण मुळीच नाही. मग मध्यम ग्रह कशास सांगितले न कळे. वर्षमान ३६५।१५।३१।३१ घेतले आहे, आणि मध्यमग्रहसाधन वर्षगणावरून केले आहे; त्यांत ग्रहवर्षगति दिल्या आहेत, त्या सूर्यसिद्धांताशी ताडून पाहिल्या असतां बयाच स्थूल आहेत. गति फिरविल्या आहेत त्या कांहीं हेतूने फिरविल्या आहेत असेंही नाही. दुसऱ्या अध्यायांत लग्नसाधन आणि तिसन्यांत व चवथ्यांत नक्षत्रावरुनच चंद्रसूर्यग्रहणसाधन केलें आहे! चार अध्यायांमिळून १०३ पये आहेत. पद्धतिचंद्रिका जातकग्रंथ शक १७४० चा आहे. तो पूर्णस्तंभ एथे पूर्ण झालेला आहे. त्याजवर शक १७४१ची ललिता नामक टीका कृष्णानीरांतर्गत रेवडाग्रामस्थ खिरे इत्युपनायक रामात्मज आपा गोस्वामि याणे केलेली आहे. शिवकृत तिथिपारिजात. शिव हा विश्वामित्र गोत्री महादेवाचा पुत्र लक्ष्मेश्वर एथील राहणारा होता. यानं तिथिपारिजात नांवाचा ग्रंथ शक १७३७ मध्ये केला आहे. तो ग्रहलाघवानुसारी आहे. त्यांत तिथिसाधनार्थ तिथिचिंतामणीसारख्या सारण्या आहेत. (गणक तरंगिणीवरून हे लिहिले आहे.) सदहूं लक्ष्मेश्वर हे धारवाड जिह्यांतले की काय न कळे. दिनकर. दिनकर याने केलेले व पुणे एथील माधवराव पेंडसे यांणी लिहिलेले बरेच ग्रंथ पुणे आनंदाश्रमांत आहेत. एका ग्रंथात उदाहरणांत पलभा ४ आणि देशांतर योजनें २८ पश्चिम घेतले आहे. ही पुण्याची आहेत. यावरून दिनकर हा पुणे एथे राहणारा होता असे दिसते. दिनकर कृत यंचिंतामणिटीकेंतील वर्णनांत दिनकराच्या पित्याचें नांव अनंत आणि गोत्र शांडिल्य आहे. याचे सगळे गणितग्रंथ ग्रहलाघवानुसार ग्रहगणित सुलभ रीतीन करता यावे ह्मणून केलेले आहेत. ते बहुतेक सारणीरूप आहेत. आणि ग्रंथ. त्यांत उदाहरण करून दाखविले आहे, यामुळे अध्ययन करणारास उपयोगाचे आहेत. ते ग्रंथ असेः--(१) ग्रहविज्ञानसारणी, ह्यांत मध्यम आणि स्पष्ट ग्रह करण्यास उपयोगी सारण्या आहेत. उदाहरणांत शक १७३४.३९. आहेत. (२) मासप्रवेशसारणी, यांत ताजकासंबंधे वर्षप्रवेश, मासप्रवेश, दिनप्रवेश, यांच्या उपयोगाकरितां स्पष्ट रवि रोजचा आयता केलेला आहे. उदाह वृत्त.