पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/296

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मथुरानाथकृत यंत्रराजघटना, शक १७०४. मथुरानाथ हा मालवीय ब्राह्मण काशी एथील संस्कृतपाठशाळेत पुस्तकालयाच्या कामाकडे इ. स. १८१३ पासून १८१८ पर्यंत (शक १७३५-४०) होता. हा चांगला ज्योतिषसिद्धांतज्ञ होता, व त्यास फारशी भाषा येत होती. यंत्रराजघटना ग्रंथ याणे शक १७०४ मध्ये केला आहे. त्याची ग्रंथसंख्या सुमारे १००० आहे. काशी एथील प्रसिद्ध राजा शिवप्रसाद याचा आजा दयालुचंद्र (डालचंद) याचा याला आश्रय होता. या ग्रंथांत कांहीं तारांचे शरभोग शक १७०४ चे वेधाने काढून दिले आहेत. (गणक तरंगिणी, पृ. ११४-६) यंत्रराज या नांवाचे वेधोपयोगी यंत्र आहे. त्याविषयीं 'यंत्रराज' नांवाचा शक १२९२ चा ग्रंथ आहे. त्याचे वर्णन पुढे वेधप्रकरणांत आहे. त्या यंत्राची रचना, त्याणे वेध घेणे, इत्यादिकांसंबंधे मथुरानाथाचा ग्रंथ असावा. चिंतामणि दीक्षित. हा ज्योतिषी पेशवाईत झाला. त्याचा जन्मकाल सुमारे शक १६५८ आणि मृत्युकाल शक १७३३ आहे. त्यास पेशवाईत सवाशें रुपये दक्षिणा होती. याचे वसतिस्थान सातारा होय. याने सूर्यसिद्धांताची सारणी केली आहे. आणि गोलानंद नांवाचा वेधयंत्राचा ग्रंथ शक १७१३ मध्ये केला आहे. त्याचे वर्णन वेधप्रकरणांत येईल. त्यावर यज्ञेश्वर ऊर्फ बाबाजोशी रोडे यांची टीका आहे. चिंतामणीचे वंशज सांप्रत सातारा एथे आहेत. चिंतामणि दीक्षिताचे नातू भाऊ दीक्षित चिपळूणकर हे शके १८०९ मध्ये मला पुण्यास भेटले होते. त्यांनी समक्ष सांगितल्यावरून व ग्रंथावरून वरील माहिती लिहिली आहे. त्यांजकडे गोलानंदहे यंत्र पितळेचें केलेले आहे, आणि वेधाकरितां दिशासाधन वगैरे सातारा एथे केलेले आहे असे त्यांनी सांगितले. चिंतामणीचे गोत्र वत्स, पित्याचें नांव विनायक आणि पूर्वजांचे वसतिस्थान चिपळूण होते, असें गोलानंदग्रंथांत सांगितले आहे. राघव. हा तापीच्या दक्षिणेस दोन योजनांवर खानदेशांत पारोळे एथे राहणारा होता. तो नगर जिल्ह्यांत गोदातीरीं पुण्यस्तंभ ( पुणतांबे) एथेही राहत असे. त्याचे काही ग्रंथ तेथे झालेले आहेत. याचे उपनांव खांडेकर आणि पित्याचे नांव आपापंत होते. खेटकृति, पंचांगार्क हे गणितग्रंथ आणि पद्धतिचंद्रिका नांवाचा जातकग्रंथ असे याचे ग्रंथ आहेत. खेटलति हा शक १७३२ चा आहे. तो ग्रहलाघवानुयायीच आहे मटलें असतां चालेल. त्यांत ग्रहलाघवांतले कामापुरते विषय घेतले आहेत. गति इत्यादि कांहीं माने ग्रहलाघवाहून स्थल आहेत. मध्यम ग्रह इत्यादि करण्याच्या निरनिराळ्या युक्ति योजिल्या आहेत. यावरून गणित करण्यास क्वचित् ग्रहलाघवाहून कांहीं सोईचे आहे. तिथिचिंतामणींतले श्लोक देऊन क्षेपक मात्र स्वकालीन

  • काशी एथील संस्कृत पाठशाला इ स. १७९१ (शक १७१३) आक्टोबरच्या २८ व्या तारखेस जोनाथन डंकन साहेब काशीचे रेसिडेंट यांणी स्थापिली. ती अद्यापि चालली आहे.' तीत आपल्या प्राचीन शास्त्रांचे आणि आधुनिक गणितादि शास्त्रांचे अध्ययन संस्कृत भाषेत होते.