पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/295

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ग्रहलाघांत अहर्गण वाढू न देण्याची युक्ति आहे, तीच यांत आहे. झणजे ११ वर्षांचे चक्र करून त्या काळाची ग्रहगति चक्रशुद्ध करून तिला ध्रुव अशी संज्ञा दिली आहे. ध्रुवांक ग्रहलाववाहून सूक्ष्म आहेत. ग्रंथकार सूर्यसिद्धांतानुयायी आहे. तथापि त्याणे ग्रह सर्वस्वी सूर्यसिद्धांतावरून येणारे घेतले नाहीत. तसेंच या ग्रंथाची पद्धति बहुतेक अंशी ग्रहलाघवासारखी आहे, तरी ग्रहलाघवावरून येणारेही ग्रह घेतले नाहीत. यावरून, व याणे उपसंहारांत मटले आहे की'वेध घेण्याची जी रीति विद्वानांनी लिहिली आहे तिणें मीं वेध घेऊन ग्रंथ केला आहे. सुज्ञांनी यंत्रांनीं अनुभव पहावा." यावरून ग्रंथकाराने स्वतः वेध घेऊन ग्रहक्षेपक तयार केले असे दिसते. या ग्रंथांत मध्यम ग्रहांस रेखांतरसंस्कार सांगितला आहे. तसेंच भुजांतर आणि चर यांचा संस्कार सर्व ग्रहांस सांगितला आहे. अयनांश सूर्यसिद्धांताप्रमाणे सांगि तले आहेत. ग्रहस्पष्टीकरण ग्रहलाघवाच्या पद्धतीचेच आहे. मात्र मान्दांक आणि शीघ्रांक कांही भिन्न आहेत. मध्यम, रविचंद्रस्पष्टीकरण, ग्रहस्पष्टीकरण, लग्नादिसाधन, चंद्रग्रहण, सूर्यग्रहण, परिलेख, चंद्रदर्शन, नलिकाबंधादि, शृंगोन्नति, उदयास्त, पात, असे १२ अधिकार ग्रंथाचे आहेत. त्यांत अनुक्रमें १९, ११,१४,७, ५,३,७,३, २६,४,६, १५ मिळून एकंदर १२० श्लोक आहेत. पुणे आनंदाश्रमांत याची एक प्रत आहे. (ग्रंथांक ३१०३) ग्रहलाघवानंतर त्यासारखा ग्रंथ करण्याविषयी बरेच प्रयत्न झालेले आढळतात. परंतु त्यांत या ग्रंथासारखा चांगला ग्रंथ दुसरा मला आढग्रहलाघव मागें पण. - ळला नाही. ग्रहलाघवकारासारखी या ग्रंथाच्या कर्त्यांची स्वतंत्र योग्यता नाही. तरी त्याणे ग्रह आपल्या मते वेधतुल्य दिले आहेत. व केवळ करणग्रंथ या दृष्टीने पाहिले तर हा ग्रंथ ग्रहलाघवाहून कमी योग्यतेचा नाही. तथापि ग्रहलाघव ग्रंथ जिकडे तिकडे पसरलेला आहे आणि तो पुष्कळ वर्षांचा झाला तरी त्यावरून गणित करण्याची गैरसोय झाली आहे असे नाही. शिवाय त्यावरून करावयाचे गणित सोपे करण्याकरितां अनेक सारण्या ज्योतिष्यांनी केलेल्या आहेत. यामुळे ग्रहलावव ग्रंथ त्याच्या मागाहून झालेल्या ग्रंथांनी मागे पडला नाही. ब्रह्मसिद्धांतसार, शक १७०३. या नांवाचा ब्रह्मपक्षाचा एक ग्रंथ आहे. त्यांत १२ अधिकार आहेत. त्यांत आरंभशक १७०३ आहे. पहिल्या अधिकारांत १२४ श्लोकांत सिद्धांत शिरोमणिमध्यमाधिकाराचा संक्षेप आहे. पुढे मूळ ग्रंथ आहे. यांत अहर्गणावरुन ग्रह साधन केले आहे. यांतील कांहीं पद्धति ग्रहलाघवासारखी आहे. ग्रंथकार नारायणात्मज देवीभक्त भुला नांवाचा हा गार्ग्य गोत्री बाह्मण नर्मदासंगमाच्या पूर्वेस ३ कोशांवर दधीचि एथे राहणारा होता.