पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/294

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९५) (किंवा २२), १४ झणजे एकंदर ५८ किंवा ५९ क्षेत्रे (सिद्धांत) आहेत. पहिल्या दोन अध्यायांत गोलावरील वृत्तांसंबंधी सिद्धांत आहेत. हा ग्रंथ मूळ चा युनानी (ग्रीक) भाषेत सावजूसयूस याण केला; त्यावरून अबुल अच्चास अहमद याच्या आज्ञेवरून आरबी भाषेत झाला; त्यावर नसीर याची टीका आहे; आबीवरून संस्कृतांत केला; असे लिहिले आहे. जयसिंहाचे उद्योग पुढे चालू राहिले नाहीत. त्याच्या वेधशालांचा उपयोग कोणी करीत नाहीत व त्या बहुतेक नादुरुस्त झाल्या आहेत. आणि जयसिंहाचा ग्रंथ प्रचारांत आल्याचे व त्याप्रमाणे पंचांगांत शुद्धि झाल्याचे दिसत नाही. वर्षमान पूर्वीचे आहे तेच आहे. जयसिंहापूर्वी ज्या ग्रंथांवरून पंचांगें होत असत त्याच ग्रंथांवरून सांप्रतही बहुधा सर्वत्र पंचांगें होतात. रजपुतस्थानांतही जयसिंहाच्या ग्रंथाचा उपयोग झाल्याचे दिसत नाही. ही गोष्ट मोठी शोचनीय आणि विचारणीय आहे. शंकररूत वैष्णवकरण, शक १६८८. शंकर हा वासिष्ठगोत्री रैवतकाचलवासी होता. याच्या पित्रादिकांची नांवें शुक, धनेश्वर, राम आणि हरिहर ही होती. याणे शक १६८८ मध्ये वैष्णवकरण या नांवाचा करणग्रंथ केला. विष्णुगुप्तमतानुसार ग्रंथ करितों असें याणे प्रथम मटलें आहे, तरी तो भास्कराचार्याच्या मतानुसार आहे. कदाचित् विष्णुगुप्त या ठिकाणी जिष्णुसुत ब्रह्मगुप्त असें झणण्याचा याचा उद्देश असेल. यांत शक ४४५ मध्ये अयनांश शून्य आहेत. ग्रंथाचे श्लोक सुमारे ३०० आहेत. या करणांतील ग्रह दृक्तुल्य येतील असें मटले आहे. परंतु पूर्व ग्रंथांपेक्षा यांत विशेष काही नाही. ( गणकतरंगिणी पृ. ११०।१.) मणिरामत ग्रहगाणवचिंतामणि, शक १६९६. मणिराम हा भारद्वाजगोत्री यजुर्वेदी ब्राह्मण होता. त्याच्या पित्रादिक त्रयी ची नांवें लालमणि, देवीदास, लीलाधर ही होती. काश्यप वृत. गोत्री वत्सराज नांवाचा ह्याचा गुरु होता. मणिराम हा गुजराथी होता, असे त्या सर्व नांवांवरून वाटते. याचें नांव नुसतें राम असेंही कदाचित् असेल असें याणे दिलेल्या कुलवृत्तांतील श्लोकांवरून दिसते. ग्रहगणितचिंतामाणि ग्रंथांत शक १६९६ चैत्र शुक्ल १ रविवार (ता. १३ मार्च ग्रंथस्वरूप. इ. स. १७७४ ) प्रातःकालचे क्षेपक आहेत. ते असे:र. चं. चं. ड. रा. मं. बु.शी. गु. शु. शी. श. १७१११ ५ १ १ १४४ ०४ . २९ १ १३ १७ २९ २३ २७ ६ २१, ५५ ५१ १२ . ५४ १२ ग्रहलाघवामतांहून अधिकउणें अंशादि (म.ला. चक्र २३ अहर्गण ३८८ ) + + + - + + - त + or ०. १७ २४५१८२२ ३७३३३३ ३४१७