पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/293

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९४) जयसिंहाच्या वेधशाला, वेध आणि ग्रंथ आणि त्यांतल्या अपूर्वदृष्ट गोष्टी ह्यांचे सविस्तर वर्णन केले तर एक लहानसा ग्रंथ होईल. एथे इतकें सांगणे पुरे की युरोपखंडांत ग्रहगतिस्थिति त्यावेळी जितकी सूक्ष्म काढिता येत होती तिजपेक्षाही अ. धिक सूक्ष्मता जयसिंहानें साधिली. हे त्यास व या देशास मोठं भूषण होय. ह्या ग्रंथांत वर्षमान सायन बेतले आहे, व अयनगति वर्षाची मुमारे ५१.४ मानिली आहे. ग्रंथावरून ग्रह सायन येतात असे दिसते. सायन ग्रहांस अयनांशसंस्कार देऊन निरयन ग्रह करून ते घ्यावे असें सामितले आहे. सूर्यसिद्धांताप्रमाणेही भमणादि मार्ने देऊन स्यांस बीजसंस्कार सांमितला आहे असे दिसते, आरवी ग्रंथ समळा जयसिंहाने केला असेल असे नाही. त्याने आपल्या पदरीं पुष्कळ विद्वान् ठेविले होते त्यांकडून तो करविला असेल. आणि त्यांतल्याच बहुतेक प्रकरणांचा अनुवाद सिद्धांतसम्राट् ग्रंपोत आहे व तो जमनाथा कडून करविला. तरी जयसिंह स्वतः वेधकुशल, गणितज्ञ आणि ज्योतिष ज्ञ होता. काही गोटींची उपपत्ति नवीन प्रकाराने स्वतः त्याने बसविली असें ग्रंथांत आहे. आणि वेध घेऊन दृक्नुन्य नवीन ग्रंथ करणे ही कल्पना मूळची त्याचीच होय. चांगले कारागीर व आरबी आणि संस्कृत यांतील एक किंवा दोन्ही भाषा जाणणारे विद्वान् त्याणे बाळमिले होते. वेध घेण्यास परदेशीही ज्योतिषी पाठविले होते. वेधादिकांचे काम अनेक ठिकाणी चालणारे अनेकांमिळूनच होणारे आहे हें उघड आहे. जयसिंहाने योजिलेल्या नवीन यंत्रांचे वर्णन सिद्धांत सम्राट् ग्रंथांत आहे. त्याच्या वेधशाळांचे आणि यंत्राचे वर्णन पुढे वेधप्रकरणांत केले आहे. सिद्धांतसम्राट् ग्रंथांत प्राचीन संस्कृत ग्रंथांचा उल्लेख आहेच. शिवाय तैमुरलंगाचा नातू उलु गबेग ह्याच्या हिजरी सन ८४१ (शक १३५९) च्या ग्रंथाचा उल्लेख आहे. तसेंच बुसनस्तर याच्या ग्रंथाचा उल्लेख आहे. तो जयसिंहाच्या यंथापूर्वी ६१९ वर्षे झाला होता असे दिसते. ही वर्षे हिजरीसनाची असावी. रोनकसिद्धांत, आणि बतल मजूष व अवर खस नांवाचे यवनाचार्य यांचा उल्लेख आहे. युक्किडच्या भूमितीच्या १५ पुस्तकांचा संस्कृत ग्रंथ जयसिंहाच्या आज्ञेने जगनाथाने शक १६४१ मध्ये केला आहे. त्यास 'रेखागणित ' असें नांव आहे. तो जयपूरप्रांती प्रसिद्ध आहे. पुणे आनंदाश्रमात त्याची एक प्रत आहे (ग्रंथांक ३६९३). ह्यांत युक्लिडचें नांव नाही, ऋषिप्रणीत ग्रंथावरून हा केला असे लिहिले आहे; तरी तो युक्किडच्या ग्रंथाच्या आधारे केला यांत संशय नाही. एखाद्या आरबी ग्रंथावरून तो केला असावा.व मळांत. काविषयी काहींच नसेल किंवा तो अपौरुष अशा अर्थाचा काहीं मजकूर असेल, यामुळे संस्छत ग्रंथातही तसे लिहिले असेल. जयसिंहाने जगन्नाथास गांव इनाम दिले, ते अद्यापि त्याच्या वंशाकडे चालत आहेत असें सुधाकर लिहितात. 'कटर' या नांवाचा आणखी एक ग्रंथ जयसिंहाने नयनसुखोपाध्याय याकडून करविलेला आहे. तो युक्लिडच्या ग्रंथासारखाच परंतु त्याहून भिन्न असा एक स्वतंत्र ग्रंथ आहे. त्याचे ३ अध्याय आहेत, व त्यांत यथाक्रम २२, २३