पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/291

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२९२) असेल. ग्रहलाघवांतला एक श्लोक यांत आहे. मग तो ग्रहलाधवकाराने यांतला घेतला किंवा ग्रहलाववांतून या ग्रंथकाराने घेतला नफळे. यांत वर्षमान व ग्रहभगण सर्व सांप्रतच्या मूर्यसिद्धांताप्रमाणे आहेत. व त्यांस बीजसंस्कार सांगितला आहे. मकरंदांत बुधसंस्कार ऋण आहे तो यांत धन आहे. व मकरंदांत मंगळास संस्कार मुळीच नाही, परंतु ह्यांत २४ भगण धन आहे; बाकी सर्व मकरंदाप्रमाणे आहे. या संस्कारावरून हा ग्रंथ शके १४०० हून प्राचीन नसावा असे वाटतें, ग्रहणमुकुर नांवाचा एक ग्रंथ विदणकत आहे असें आनेचसूचीत आहे. जटाधरकत फत्तेशाहप्रकाश, शक १६२६ हा एक करणग्रंथ आहे. बदरीकेदार, श्रीनगर येथील चंद्रवंशी राजा फत्तेशहा याच्या राज्याचे १८ वें वर्ष झणजे शक १६२६ हे करणाचे आरंभव र्प आहे. याचा कर्ता जटाधर नामक आहे. त्याच्या पित्याचे नांव वनमालि, आजाचे नांव दुर्गमिश्र आणि पणजाचें नांव उद्धव होते. त्यांचे गोत्र गर्ग होते. जटाधर हा सरहिंद एथील राहणारा होता.* दादाभट. 'किरणावलि । नांवाची सूर्यसिद्धांतावरील टीका शके १६४१ मध्ये दादाभट ऊर्फ दादाभाई नांवाच्या चितपावन ब्राह्मणाने केलेली आहे. त्याच्या बापाचें नांव माधव आणि उपनांव गांवकर होते. ह्या टीकेविषयीं सूर्यसिद्धांतविचारांत सांगितलेच आहे. - माधव याने सामुद्रिकचिंतामाण नांवाचा ग्रंथ केला आहे असें आफ्रेचसूचीत आहे. दादाभटाचा पुत्र नारायण याने ताजकसुधानिधीच्या उपसंहारांत लिहिले आहे की माधव हा 'पशुपतिनगरांत श्रीशपादाब्जसेवी होवंशवृत्त. ता.' यावरून हा काशी एथे होता की काय नकळे. माध वास दोन पुत्र होते. त्यांतला दादाभट हा ज्येष्ठ होय. त्याला दोन पुत्र होते. त्यांतला नारायण हा कनिष्ठ होय. नारायणाने केलेले ग्रंथ असेः-होरासारसुधानिधि, नरजातकव्याख्या, गणकप्रिया नांवाचा प्रश्नग्रंथ, स्वरसागर नांवाचा शकुनग्रंथ, ताजकसुधानिधि. या ग्रंथांचा काल सुमारे शक १६६० असावा. जयसिंह. भारतवर्षीय ज्योतिषशास्त्रसंबंधे जयसिंह हा एक अपूर्व पुरुष होऊन गेला. आपल्याकडे केशवदैवज्ञ आणि गणेशदैवज्ञ हे शोधक ज्योतिषी झाले, त्याच सुमारास यरोपखंडांत कोपर्निकस जन्मला. तोपर्यंत दोहोंकडील ज्योतिःशास्त्र समान स्थितीत होते झटले तरी चालेल. परंतु कोपर्निकसापासून सुरोपखंडांत ज्योतिःशास्वाचे मोठे स्थित्यंतर झालें. ग्रहगतिस्थितीसंबंधे तर ते तिकडे पूर्णावस्थेस पोहोचलें मो. भांडारकर यांचा पु, सं. रिपोर्ट स. १८८३।८४ पृ. ८५.