पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/290

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यावरून वरील दोन ग्रंथ व स्वतःचे वेध यांच्या आधारानें ग्रंथ केला असें दि. सत. ह्या ग्रंथकाराने लिहिलेला शिव हा मराठी राज्याची स्थापना करणारा शिवाजी होय शके १५७५ (इ. स. १६५३) या वर्षी ग्रंथ लिहिण्याच्या व वेधादिकांच्या तयारीस ग्रंथकार लागला होता यांत संशय नाही. तेव्हां शिवाजी २६ वर्षांचा होता, व राज्य स्थापण्याच्या भानगडीतच होता. त्यांतही त्याने दृक्प्रत्ययास येणारा ग्रंथ करण्याविषयीं ग्रंथकारास सांमितले ही गोष्ट फार महत्वाची आहे. कृष्णः कोकणसत्तटाकनगरे देशस्थवयों वसन् ।। असें ग्रंथकाराने लिहिले आहे, यावरून हा सह्याद्री सन्निध मावळांत राहणारा देशस्थ ब्राह्मण होता असे दिसते. ह्या करणांत वर्षगणावरून मध्यमग्रहसावन केले आहे. शक ४५० मध्ये अयनांश शून्य आहेत आणि वर्षगति ६० विकला आहे. ग्रहलाववकारानें ज्याचापांचे साह्य घेतले नाही; परंतु ह्या ग्रंथांत तें वेतले आहे. ह्याच ग्रंथकाराचा तंत्ररत्न नांवाचा दुसरा मोठा ग्रंथ आहे. त्याचा हा भाग असें ग्रंथकाराने लिहिले आहे. तंत्ररत्न माझ्या पाहण्यांत माहीं. रत्नकंठकृत पंचांगकौतुक, शक १५८०. पंचांग सुलभ रीतीने करण्याचा हा एक सारणीग्रंथ आहे. यांत आरंभशक १५०० आहे. हा खंडखाद्यानुसारी आहे. याचा कर्ता रत्वकंठ नामक आहे. त्याचें जन्म शक १५४६ मध्ये झाले. त्याच्या पित्याचें नांव शंकर होते. शिवकंठ नामक पुत्राकरतां हा ग्रंथ केला. यावरून दोन दिवसांत सर्व पंचांग होईल असें ग्रंथकार ह्मणतो. हा काश्मीरांतला राहणारा असावा असें पूर्वी सांगितलेच आहे. (पृ.२२४). या ग्रंथांत रविचंद्रांच्या गति आणि तिथ्यादि मोग्यमाने यांवरूम तिथ्यादिघटिपळे काढण्याची कोष्ट के दिली आहेत. स्पष्ट रविचंद्र आणि त्यांच्या गति ही प्रथम करावी तेव्हां या ग्रंथाचा उपयोग तिथ्यादि करण्यास होईल. मणजे तिथिचिंतामणीहून खटपट पुष्कळ पडेल. विद्दणकत वार्षिक तंत्र. या नांवाचा एक ग्रंथ प्रथम मला सोलापूर एथे आढळला. त्यांत ग्रहगणितास आरंम कलियुगारंभ घेतला आहे. व यामुळेच ह्यास तंत्र झटले आहे. कौंडिण्य गोत्री मल्लग याचा पुत्र विद्दण याणे हे तंत्र केले आहे. ग्रंथकाराचा काल किंवा स्थान काही दिलेले नाही. त्यावर शक १६३४ च्या सुमारे केलेली एक टीका आहे. (उदाहरणांत हा शक आहे). टीकाकाराने आपले नांव सांगितलें नाहीं. परंतु त्याचे स्थान बंकापूर होते असे टीकेवरून दिसतें. बंकापुरची पलभा ३।१८ (अक्षांश सुमारे १५ २५) व देशांतर कार्तिक पर्वतापासून पश्चिम १३ योजनें (सुमारे एक अंश ) सांगितले आहे. यावरून हे घारवाड जिल्ह्यांतले होय. यावरून व ग्रंथकर्त्यांच्या नांवावरून हा ग्रंथ कनाटकांत प्रचारांत होता असे दिसते. व त्याचा रचनाकाल शक १६०० पेक्षां प्राचीन आहे. कदाचित् तो बराच प्राचीन