पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/284

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८५) गणित ग्रंथ आहे; त्यांत सर्व सूत्रे आर्याबद्ध आहेत. हा ग्रंथ या नारायणाचा असावा, असें गणकतरंगिणीकार म्हणतात. नारायण ह्मणून मुनीश्वराचा गुरु होता तो हाच असावा. या कुलांतील काही पुरुषांचे वर्णन पुढे निराळे केले आहे. रंगनाथ. याचे वंशवृत्त कृष्णाच्या वर्णनांत आलेच आहे. याची सूर्यसिद्धांतावर गूढार्थप्रकाशिका नांवाची टीका आहे. तिजविपयीं बरेंच विवेचन पूर्वी झालेच आहे. टीकत त्याण टीकारचनाकाल असा दिला आहे: शके तत्वतिथ्युन्मिते १५२५ चैत्रमासे सिते शंभुतिथ्यां बुधेकर्कोदयान्मे । दलाढयद्विनाराचनाडीषु ५२।६० जाती मुनीशार्कसिद्धांतगूढप्रकाशौ ।। शक १५२५ चैत्र सित (किंवा असित ) पक्षांत शिवतिथीस बुधवारी सूयोर्दयापामुन ५२।। घटिकांनी मुनीश्वर नामक पुत्र आणि गूढप्रकाशटीका ही झाली असें रंगनाथ ह्मणतो. व याच टीकेंत कृष्ण हा जहांगिरास मान्य होता असें लिहिलं आहे. जहांगीर हा शक १५२७ पासून गादीवर होता, अगोदर नव्हता. यामळे या शकाविषयी शंका येते. परंतु मुनीश्वराचे ग्रंथ शक १५५७, १५६८. १५७२ या वर्षांचे आहेत यावरून हा शक असंभवनीय नाही. शक १५२५ मध्ये रंगनाथाने टीकेस आरंभ केला असावा. शक १५२५ गत या वर्षी चैत्र शुक्ल किंवा कृष्ण एकादशीस बुधवाराचा मुळींच संभव नाही. शुक्ल चतुर्दशी बुधवारी १० घटिका होती. शिवतिथि ह्मणजे चतुर्दशी घेतली तर जुळतें. किंवा शक १५२४ चैत्र कृष्ण दशमी बुधवारी ८ घटिका असून पुढे एकादशी होती. तेव्हां १५२५ हा वर्तमान शक (ह्मणजे गत १५२४), असित पक्ष आणि शिवतिथि ह्मणजे एकादशी असे घेऊन मेळ बसतो. सारांश शक १५२५ मध्ये रंगनाथ होता, तो शक १५५७ मध्ये विद्यमान नव्हता असें मरीचिटीकेतील वर्णनावरून दिसते. सूर्यसिद्धांतटीकेवरून दिसून येते की, रंगनाथास ज्योत्तिःसिद्धांतांचे, त्यांत भास्करसिद्धांताचें ज्ञान चांगले होतें. टीकेंत सर्वत्र त्याने उपपत्ति दिली आहे. तसेच त्याने गोलादि यंत्रे स्वतः करून त्यांवरून शिष्याध्यापन इत्यादि केले होते असें टीकेवरून दिसून येते. त्याने टीका काशी एथे केलेली आहे. ग्रहप्रबोध, शक १५४१. हा एक करणग्रंथ आहे. यांत आरंभ शक १५४१ आहे. याचे एकंदर श्लोक ३८ आहेत. त्यांत ग्रहस्पष्टीकरण मात्र आहे. ते सर्व व अहर्गण साधनरीति ११ वर्षांचें चक्र, वगैरे सर्व ग्रहलाघवाप्रमाणेच यांत आहे. शेवटी ग्रंथकार मणतो: आसीत् गार्य ( ? ये ) कुलैकभूषणमणिविद्वज्जनानंदकृत् शिष्याज्ञानतमोनिवारणरविर्भूमीपतिप्रार्थितः ॥ ज्योति शास्त्रमहाभिमानमहिमास्पष्टीकृतब्रह्मधीधेर्योदार्यनिधिस्तुकेश्वर इति ख्यातो महीमंडले ॥ ३६॥ तदात्मजस्तचरणकभक्तिस्तद्वत्प्रसिद्धः शिवनामधेयः ।। तदंगजो दृग्गणितानुसारं ग्रहप्रबोधं व्यतनोच नागः ॥ ३७ ।।