पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/283

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८४) एलिचपुरसमदेशे तटे पयोधण्याः हाभे दधिरामे ।। गोविंदपुत्र नारायण याच्या जातककेशवीच्या टीकेवरून दधिग्रामाची पलभा ४.३० झणजे अक्षांश २०१५ आहेत असे निष्पन्न होते. एलिचपूरचे अक्षांश इतकेच आहेत. यावरून याच अक्षवृत्तावर एलिचपूरच्या पूर्वेस किंवा पश्चिमेस दहिगांव असावा. बल्लाळ हा काशी एथे राहण्यास गेला. पुढे त्याचे वंशज काशी एथेच राहत असत, असे त्यांच्या ग्रंथांवरून दिसते. तथापि नारायण याणे केशवी जातकपद्धतीची टीका दधिग्राम एथे रचिली असे त्या टीकेवरून वाटते. चिंतामणिपुत्र राम ह्यास भविष्यज्ञान इतके उत्तम असे की विदर्भ देशचा राजा त्याच्या आज्ञेत वागत असे असे रुष्ण आणि मुनीश्वर पूर्व जवृत्त. यांणी लिहिले आहे. कृष्ण, रंगनाथ इत्यादिकांच्या कालावरून रामाचा काल सुमारे शक १४४० असावा. इ. स. १५०० (शक १४२२) च्या सुमारास ब्राह्मणी राज्याचे ५ भाग झाले, त्यांत वन्हाडांत (विदर्भदेशांत) एक राज्य झाले. त्याची राजधानी एलिचपूर होती. विदर्भ राजा रामाचा निदेशवर्ती होता, तो एलिचपुरचाच असावा. बल्लाळ हा मोठा रुद्रभक्त होता. बल्लाळाचा ज्येष्ट पुत्र राम ह्याने अनंतसुधाकर ग्रंथाची उपपत्ति रचिली असें रंगनाथ हा सूर्यसिद्धांतटीकेंत ह्मणतो. हा अनंतसुधाकर ग्रंथ पृ. २७२ मध्ये वर्णिलेल्या अनंताचा सुधारसच असावा. हा रामही मोठा शिवभक्त होता व तो शक १५५७ मध्ये विद्यमान होता असें मरीचिटीकेवरून दिसते. कृष्ण हा बल्लाळाचा दुसरा पुत्र होय. ह्याने भास्कराचार्याच्या बीजावर बीज नवांकुर नांवाची टीका केली आहे. त्या टीकेलाच बीजपल्लव, स्ववृत्त. कल्पलतावतार, अशी नावे आहेत. तीत कृष्णाने स्वबुद्धीने काही नवीन युक्ति सांगितल्या आहेत. एकंदरीत ही टीका प्रा चीन टीकांत उत्कृष्ट आणि विद्वन्मान्य आहे. ह्या टीकेंत तो आपल्याला ग्रहलाघवकार गणेश ह्याचा पुतण्या नृसिंह याचा शिष्य विष्णु ह्याचा शिष्य ह्मणवितो. हा विष्णु गोलग्रामस्थ (पृष्ठ २८० वंशावळ पहा.) की काय न कळे. त्या दोघांचा काल अगदी जवळ जवळ दिसतो. कृष्णाने श्रीपतिहत जातकपद्धतीवर उदाहरणरूप टीका केली आहे. तींत खानखान नामक प्रधानाचा जन्मकाल शक १४७८ हे उदाहरण घेतले आहे. खानखान हा शक १५०० च्या पूर्वी प्रधान होण्याचा संभव नाही. रंगनाथाने शक १५२५ च्या सूर्यसिद्धांतटीकेंत कृष्णकृत दोन्ही टीकांचा उल्लेख केला आहे. व तेथेच तो लिहितो की कृष्ण हा दिल्लीचा बादशहा जहांगीर ह्याच्या दरबारी मोठी प्रतिष्ठा पावलेला होता. जहांगीर हा शक १५२७ पासून शक १५४९ पर्यंत गादीवर होता. यावरून सुमारे शक १५०० पासून १५३० पर्यंत केव्हां तरी कृष्णाने पूर्वोक्त दोन टीका केल्या. याचा छादकनिर्णय म्हणून आणखी ग्रंथ आहे. तो सुधाकर द्विवेदी यांणी छापविला आहे. नूरदिन नामक यवन अधिकाऱ्यास तो प्रिय होता, शक १५५७ मध्ये विद्यमान नव्हता, असें मरीचि टीकेवरून दिसते. गोविंदाचा पुत्र नारायण ह्यानें केशवी जातकपद्धतीवर टीका केली आहे. त्या टीकेंत उदाहरणांत शक १५०९ घेतला आहे. कदाचित् हा त्यावंशज. चा जन्मशक असेल. नारायणीय बीज या नांवाचा एक बीज