पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/282

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२८३) नृसिंह, जन्म शक १५०८. गोलग्रामस्थ दिवाकराचा ज्येष्ट पुत्र कृष्ण याचा हा पुत्र होय. (पृ० २८० पहा ). याचें जन्म शक १५०८ मध्ये झालें. विष्णु आणि मल्लारि या चुलत्यांपाशी त्याणे अध्ययन केले. शक १५३३ मध्ये याणे सूर्यसिद्धांतावर सौरभाष्य नांवाची टीका केली. तीत उपपत्ति आहे. तिची ग्रंथसंख्या ४२०० आहे. सिद्धांतशिरोमणीवर याची वासनावातिक नांवाची टीका शक १५४३ ची आहे. तिला वासनाकल्पलता असेंही नांव आहे. तिची ग्रंथसंख्या ५५०० आहे. या दोन्ही टीकांवरून याला ज्योतिषसिद्धांतज्ञान चांगले होते असे दिसते. हा मोठा मीमांसक होता असें याचा पुत्र दिवाकर याणे लिहिले आहे. शिव. हा विष्णूच्या वर्णनांत (पृ.२८०) दिलेल्या वंशांतील कृष्णाचा पुत्र, वरील नृसिंहाचा बंधु होय. याचा जन्मशक १५१० असावा. याणे अनंतसुधारस ग्रंथावर टीका केली आहे असें सुधाकर लिहितात. याणे मुहूर्तचूडामणि नांवाचा मुहूर्तग्रंथ केला आहे. हा जगताचा गुरु होता असे याचा शिष्य पुतण्या दिवाकर याने आपल्या जातक पद्धतींत लिहिले आहे. याचा दुसरा पुतण्या रंगनाथ याणेही सिद्धांतचूडामणींत याची फार स्तुति केली आहे. दुसरा एक शिव राम दैवज्ञाचा पुत्र याणे जन्मचिंतामणि ग्रंथ केला आहे असे सुधाकर लिहितात. कृष्ण. हा एका प्रसिद्ध विद्वत्कुलांत झाला. त्या कुलांतील ग्रंथकारांनी केलेल्या वंशवर्णनावरून खालचा वंशवृक्ष दिला आहे. चिंतामणि (देवरात गोत्र ) राम (पत्नी सीता) आणखी चार पुत्र. त्रिमल्ल गोपीराज बल्लाळ ( पत्नी गोजि) राम कृष्ण गोविंद रंगनाथ महादेव नारायण मुनीश्वर वासुदेव चिंतामणि हा यजुर्वेदी ब्राह्मण विदर्भ देशांत पयोष्णीतीरीं दधिग्रामीं रहात स्थल, असे. या गांवाचे स्थान मुनीश्वराने मरीचि टीकेच्या अंती असे लिहिले आहे: