पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/281

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वंशात् शंक १५३०१३।१२।५५ हेही घेतले आहेत. पातसारणीटीकेत उदाहरणांत शक १५५३ आहे. केशवी जातकपद्धतींत त्याने उदाहरणार्थ शक १५०८ घेतला आहे. जातकपद्धति ग्रंथावरून जन्मपत्रिका करितात. यावरून १५०८ हा विश्वनाथाचा जन्मशक असावा असे अनुमान होते. तसेंच सुमारे शक १५३४ पासून १५५६ पर्यंत त्यानें ग्रंथरचना केली असे दिसते. ग्रहलाघवटीकेंतलें त्याचे एक वाक्य वर दिले आहे (पृ. २५९) त्यांत तो गणेशदैवज्ञास गुरु ह्मणतो, ते केवळ औपरिचारिक होय. महादेवीसारिणीग्रंथ शके १२३८ मधील आहे, आणि त्या महादेवास त्याचा टीकाकार धनराज याने शके १५५७ मध्ये केलेल्या टीकेंत गुरु मटले आहे, त्यासारखेच हे होय. कृष्णशास्त्री गोडबोले यांनी ग्रहलाघवपुस्तकांत शेवटी ३ श्लोक दिले आहेत, त्यांत ग्रहलाघव ग्रंथ झाल्यावर २११ वर्षांनी दृक्प्रत्ययाकरितां त्यास विश्वनाथाने बीजसंस्कार दिला असें झटले आहे. ह्मणजे या विश्वनाथाचा काल शके १६५३ होतो. परंतु ग्रहलाघवटीकाकार विश्वनाथ याचा काल शकाचे १६ वें शतक होय, १७ वें नव्हे, हे त्याचे वंशवृत्त आणि ग्रंथ यांवरून निर्विवाद आहे. विश्वनाथाच्या यहलाघवटीकेची अनेक पुस्तकें मी पाहिली, त्यांत सदरहू तीन श्लोक नाहीत. त्यांतील विश्वनाथ हा कोणीतरी निराळा असला पाहिजे. गोपालात्मज विश्वनाथ दैवज्ञ संगमेश्वरकर याणे काशी एथे शक १६५८ मध्ये व्रतराज नांवाचा ग्रंथ केला. त्या विश्वनाथाचे पूर्वोक्त तीन लोक असावे. विश्वनाथाचे उदाहरणरूप टीकाग्रंथ येणेप्रमाणे:-(१)सूर्यसिद्धांतावर गहनार्थप्र काशिका टीका आहे. हीत विश्वनाथ लिहितो की, मी सूर्यसिग्रंथ. द्धांताचे उदाहरण करितों; त्याची उपपत्ति नृसिंहदैवज्ञकृत पहावी. नृसिंहाची सौरभाष्य टीका शक १५३३ ची आहे. यावरून त्यानंतर विश्वनाथाने सूर्यसिद्धांतोदाहरण केले. याची ग्रंथसंख्या ५००० आहे. ( २) सिद्धांतशिरोमणिटीका", (३) करणकुतूहलटीका, (४) मकरंदटीका, (५) ग्रहलाववटीका, (६) गणेशदैवज्ञरूत पातसारणीटीका, (७)अनंतसुधारसटीका*, (८) रामविनोदकरण टीका, (९) ह्याचा भाऊ विष्णु ह्याच्या करणावर टीका.* ही शक १५४५ ची आहे. (१०) केशवी जातकपद्धतीची टीका, (११) नीलकंठी ताजकग्रंथावर समातंत्रप्रकाशिका टीका. ही शक १५५१ ची आहे. ह्यांशिवाय आप्रेचसूचीत आणखी विश्वनाथी टीका सांगितल्या आहेत त्या अशाः-(१२) सोमसिद्धांत टीका, (१३) तिथिचिंतामणिटीका, (१४) चंद्रमानतंत्रटीका, (?) (१५) बृहज्जातकटीका, (१६) श्रीपतिपद्धतिटीका, (१७) वसिष्ठसंहिताटीका, (१८) बृहत्संहिताटीका. टीकांत विश्वनाथाने उदाहरणे करून दाखविली आहेत. यामुळे त्या टीका अभ्यास करणारास फार उपयोगी आहेत. कृष्णशास्त्री गोडबोले यांनी मराठीत ग्रहलाघव सोदाहरण छापला आहे, तो बहुतेक विश्वनाथी टीकेचे भाषांतर आहे. विश्वनाथाने टीकांत उपपत्ति दिली नाही, तरी त्यास सिद्धांतज्ञान चांगले होते असें त्याच्या ग्रंथावरून दिसून येते. हे सर्व ग्रंथ त्याने काशी एथे केलेले आहेत. * ह्या चार टीका मी पाहिल्या नाहीत. गणकतरंगिणीवरून एथे लिहिल्या आहेत.