पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/280

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांचे कुलदैवत मल्लारि होतें असें मल्लारीने लिहिले आहे. शक १५४३ मध्ये केलेल्या शिरोमणिरीत नृसिंह लिहितो की दिवाकर हा काशी एथे निवर्तला. तो गणेशदैवज्ञाचा साक्षात् शिष्य होता, यावरून सुमारे शक १५०० पर्यंत दक्षिणेतच असला पाहिजे. या कुलांतील ग्रंथकारांचे शक 1५३३ च्या पुढचे ग्रंथ काशी एथे झालेले आहेत. यावरून शक १५०० नंतर २५।३० वपांत हे विहत्कुल काशी एथे गेले असे दिसते. यांतील कोणास दिल्ली दरबारचा प्रत्यक्ष आश्रय होता असें दिसत नाही. तथापि यांतील विद्वान् राजमान्य होते असें वर्णन आहे. मल्लारि. वरील विष्णूच्या वर्णनांत लिहिलेल्या प्रसिद्ध वंशांत मल्लारि झाला. याणे ग्रहलाघवावर टीका केली आहे. तीत त्याने टीकाकाल मोठ्या चमत्कारिक रीतीने सांगितला आहे. तो असाः-- वाणो ५ नाच्छकतः कुराम ३१ विहृतान्मूलं हि मासः स युक् बाणै ५ में च दशोनितं १० दिनमितिस्तस्या दलं स्यातिथिः ॥ पक्षः स्यातिथिसंमितोऽखिल युतिः सताब्धितिथ्युन्मिता २५४७ बालाख्यो गणको लिलेख च तदा टीका परार्थं त्विमां ॥ यावरून असे निष्पन्न होते की शक १५२४ आश्विन (७ वा मास ) शुक्लपक्ष (पहिला), प्रतिपदा (१), इंदुवार ( २ रा), उत्तरा नक्षत्र (१२ वें) या दिवशी बालनामक गणकानें ही टीका लिहिली. टीकेचा कालही हाच असावा. कारण तो याचा भाऊ जो विश्वनाथ त्याच्या काळाशी मिळतो. मल्लारीने टोकेंन ग्रहलाघवाची उपपत्ति लिहिली आहे. ग्रहलाघवासारख्या ग्रंथाची उपपत्ति लावणे हे सिद्धांताच्या उपपत्तीपेक्षां कठीण आहे असें मटले तरी चालेल. ते काम त्याने चांगले सिद्धीस नेलें आहे. विश्वनाथ. हा एक भटोत्पलासारखा टीकाकार होऊन गेला. हा गोलग्राम येथील दिवाकराचा पुत्र होय. याचा कुलवृत्तांत विष्णूच्या वृत्तांतावरून समजून येईलच. ताजकनीलकंठीवरील टीकेंत याने टीकाकाल असा दिला आहे: चंद्रवाण शरचंद्र १५५१ संमिते हायने नृपतिशालिवाहने ।। मार्गशीर्षसितपंचमीतिथौ विश्वनाथविदुषा समापितं ॥ नीलकंठी टीकेची अनेक पुस्तके माझ्या दृष्टीस पडली, त्यांपैकी पुष्कळांत हा श्लोक नाहीं; काहींत मात्र आहे. आमचे लोक ग्रंथरचनाकालज्ञानाविषयी उदासीन असतात याचे हे एक उदाहरण आहे. या शकाविषयी काहीएक संशय नाही. त्याच टीकेंतील दुसन्या दोन चार स्थलींच्या उल्लेखांवरून त्याचा खरेपणा स्पष्ट होतो. विश्वनाथाने सूर्यसिद्धांतादि अनेक ग्रंथांवर उदाहरणरूप टीका केल्या आहेत, त्यांत मुख्य उदाहरणांत शक १५३४ घेतला आहे. आणि कारण* १५२४ + ७ +१+१+२+२२ %3D १५४७,