पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/276

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिनकर. याचे खेटकसिद्धि आणि चंद्राकी असे दोन करणग्रंथ डेक्कन कालेजसंग्रहांतलनबर ३०३ आणि ३०८ सन १८८२।८३) मी पाहिले. खेटकसिद्धीत तो ह्मणतो विना युवदाशुमृदुक्रियायैः श्रीब्रह्मसिद्धांतसमाश्च खेटाः ॥ करोम्यहं तां गगनेचराणां सिद्धिं ॥ २॥ क्षपक शक १५०० मध्यममेषींचे आहेत. ते व गति राजमृगांकबीजसंस्कृतब्रह्मतुल्य अात. गंथांत ग्रहांचं स्पष्टीकरण मात्र आहे. एकंदर श्लोक ४६ आहेत. अथासमवेत सारण्या असाव्या असे दिसते. मी पाहिलेल्या पुस्तकाबरोबर त्या नव्हत्या. परंतु त्यांवाचून गणित करितां येत नाही. या ग्रंथास लघुखेटकसिद्धि असें ग्रंथकार ह्मणतो. यावरून त्याची दुसरी बृहत्वेटकसिद्धि असावी. महादेवीसारणीटीकत दिनकराचे काही श्लोक दिले आहेत ते हीत नाहीत, यावरूनही तसें दिसते. याने आपलें वृत्त असे दिले आहे: श्रीमगोत्रे कौशिके साग्निकोभूदंदाक्षोयं ज्ञातिमोढप्रसूतः ॥ जातो ग्राम साभ्रमत्याः समीपे वारेजाख्य विप्रवर्याश्रिते च ॥३१॥ तत्पुत्रजो दिनकरः सकलानि खेटकर्माणि वीक्ष्य सततं हि सवासनानि ॥ चक्रे शके खखतिथि १५०० प्रमिते च संवत् पंचाग्निभूपति १६३५ मिते लखेटसिद्धि॥३२॥ चंद्राी ग्रंथाचे एकंदर श्लोक ३३ आहेत. तीत फक्त चंद्रसूर्यस्पष्टीकरण आहे. ह्यांतही आरंभवर्ष शके १५०० आहे. चंद्रसूर्यस्पष्टीकरणार्थ फलसारण्या ग्रंथासमवेत असाव्या असे दिसते. त्यांवरून स्पष्ट रविचंद्र करून त्यांवरून तिथ्यादि साधन करण्यास सांगितले आहे. यावरून गणेशदैवज्ञकृत लघुचिंतामणिसारण्या त्या वेळी गुजराथेत प्रचारांत नव्हत्या असे दिसते. "गुर्जर प्रदेशे बीजं असें ह्मणून एक बीजसंस्कार दोन्ही ग्रंथांत दिला आहे. पुढे (पृ.२७८)वर्णिलेल्या ग्रहचिंतामणि ग्रंथांतही ते बीज आहे व महादेवीसारणीटीकेंतही आहे. त्यास कोठे कोठे रामबीज असें मटलें आहे. गंगाधर, शक १५०८. अनंत याची ग्रहलाघवावर शक १५०८ या वर्षी केलेली मनोरमा नां वाची टीका आहे. मुहूर्तमार्तडकार नारायण ह्याचा हा पुत्र रुष्ण होय. दोघांनी दिलेल्या माहितीवरून बाजूचा वंशवृक्ष दिला आहे. मुहूर्तमार्तड ग्रंथ शके १४९३ मध्ये झालेला आहे. हरि त्यांत ग्रंथकारानें आपलें वृत्त दिले आहे. त्यावरून समजतें कीं, तो कौशिक गोत्री वाजसनेयी ब्राह्मण होता तो देवगिरी (दौलताबाद) अनंत च्या उत्तरेस शिवालय (घृष्णेश्वर) प्रसिद्ध आहे, त्याच्या उत्तरेस टापर ह्मणून गांव आहे तेथला राहणारा होता, व त्याचे पूर्वज नारायण मूळचे सासमार एथले राहणारे होते. दौलताबादेजवळ दोन कोशांवर वेरुळ गांव आहे, तेथल्या देवास हल्ली घृष्णेश्वर ह्मणतात. गंगाधर जनार्दन हरि आठल्ये यांणी मुहूर्तमार्तड ग्रंथ मराठी भाषांतरासह शके १७७९ मध्ये छापला आहे. त्याच्या प्रस्तावनेत ते लिहितात की, टापर गांवीं व आसपास शोध करविला त्यावरून समजलें की ग्रंथकाराचा मातुलवंश मात्र आतां राहिला आहे.