पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/277

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामभट, शक १५१२. याचा रामविनोद ह्मणून एक करणग्रंथ आहे. त्यांत आरंभवर्ष शक १५१२ आहे, आणि वर्षमान, क्षेपक आणि ग्रहगति सांप्रतच्या मूर्यसिद्धांतांतल्या आहेत. ग्रहगतींस बीजसंस्कार दिला आहे तो पूर्वी सांगितला आहे (पृ.१८४५). अकबराचा प्रधान श्रीमहाराज रामदास यांच्या आज्ञेवरून अकबर शक ३५ (शालि. शक १५१२) या वर्षी रामभटानें रामविनोद ग्रंथ केला.* त्याचे ११ अधिकार आणि २८० श्लोक आहेत. त्यावर विश्वनाथकृत उदाहरण आहे. या ग्रंथाच्या अंगभूत १७ श्लोकांचा तिथ्यादि साधनाचा सारणी ग्रंथ रामाने केलेला आहे, आणि त्यावरून जयपुराकडे पंचांग करितात असें सुधाकर द्विवेदी ह्मणतात. ह्याचा मुहूर्तचिंतामणि ह्मणून प्रसिद्ध ग्रंथ आहे. तो शके १५२२ या वर्षीचा आहे. तो काशी क्षेत्रांत केलेला आहे. त्यावर स्वतः ग्रंथकाराचीच प्रमिताक्षरा ह्मणून टीका आहे. शिवाय त्यावर त्याचा पुतण्या गोविंद ह्याची पीयूषधारा झणून प्रसिद्ध टीका आहे. ह्या दोनही टीका छापल्या आहेत. वर अनंताच्या वर्णनांत ह्याचे वंशवृत्त दिलेच आहे. (पृ. २७४।७५). श्रीनाथ, शक १५१२. याचा शके १५१२ मधील ग्रहचिंतामणि म्हणून करणग्रंथ आहे. त्यांत वर्षमणावरून ग्रहसाधन सांगितले आहे. ग्रंथासोबत सारण्या असाव्या असे दिसते मी पाहिलेल्या (डे. का. सं. नंबर ३०४ सन १८८२।८३) ग्रंथासमवेत त्या नव्हत्या. त्यांवांचून ग्रंथाचा काही उपयोग नाही. ग्रंथांत क्षेपकही नाहींत व दुसरेही कांहीं साधन हा ग्रंथ कोणत्या पक्षाचा हे समजण्यास नाही. ग्रंथाचे अध्याय दोन आहेत. त्यांत श्लोक ८० आहेत. ग्रहस्पष्टीकरण मात्र आहे. लग्नसाधन आहे व द्वादशभाव साधन (होरास्कंध) ही यांतच आहे ! श्रीनाथाच्या पित्याचें नांव रामा आणि वडील भावाचें नांव रघुनाथ होते. विष्णु. विदर्भ देशांत पाथरी ह्मणून प्रसिद्ध गांव आहे. त्याचे वर्णन वर (पृ. २६९) आलेच आहे. त्याच्या पश्चिमेस २॥ योजनावर गोदा नदीच्या उत्तर तीराजवळच गोलग्राम ह्मणून गांव आहे. तेथे एक फार प्रसिद्ध विद्वत्कुल होऊन गेले. ते पुढे काशी एथे गेले. त्यांत पुष्कळ ग्रंथकार झाले. त्यांतच विष्णु झाला. ह्याने एक करणग्रंथ केला आहे. त्यांत आरंभवर्ष शक १५३० आहे. तो सौरपक्षीय आहे तसेच ह्याने ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ याच्या बृहच्चिंतामणीवर सुबोधिनी नांवाची टीका केली आहे. तींत उपपत्ति आहे. ज्योतिःशास्त्रावर नवीन ग्रंथ

  • तो शके १५३५ मा वर्षी केला असें डा० भांडारकर ह्मणतात ( सन १८८३।८४ चा पुस्तक संग्रहाचा रिपोर्ट पृ. ८४). परंतु ती चूक आहे.

जहा राम आणि मुहूर्तचितामणिकार राम बहुधा एकच असें प्रो. भांडारकर म्हणतात (१८८।८३ पु. सं. रिपोर्ट पृ. २८). परंतु हे असंभवनीय आहे, असें मुहूर्तचिंतामणिकार रामाचे वर्णन बर दिले आहे त्यावरून दिसून येईल.