पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/275

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामाचे वर्णन पुढे निराळे केले आहे. नीलकंठाचा पुत्र गोविंद याने मुहूर्तचिंतामणीवर पीयूषधारा नामक टीका कला आहे. ती फार विस्तृत व प्रसिद्ध आहे ती त्याने काशीक्षेत्री रचिली. तींत तो लि हितो की विदर्भ देशांत मातृपुर हे त्यांचे निवासस्थान होतें. कदाचित् धर्मपुरासन मातापुर असें दुसरे नांव असेल. गोविंदाचें जन्म शक १४९१ मध्ये झाले. त्याच्या आईचें नांव चंद्रिका असें होतें. त्याने पीयूषधारा टीका शक १५२५ मध्ये केला ताजिकनीलकंठीवरही त्याची रसाला नामक टीका आहे, ती शक १५४४ मध आहे. पीयूषधाराटीकेंत गोविंदाची मोठी शोधकता दिसून येते. परंतु संक्रांतिप्रकरणाच्या नवव्या श्लोकाच्या टीकेंत तो ह्मणतो की, “सायनगणनेनें ग्रहणविसंवाद होतो. शक १५१६ वैशाख शुक्ल पौर्णिमेस चंद्रग्रहण पडले होतें तें सायनगणनन येत नाही." यावरून गणिताचं मार्मिकज्ञान त्यास होते असे दिसत नाही. यान चंद्र मात्र सायन करून ग्रहण येत नाही असे दाखविले आहे. परंतु राहुही सायन केला पाहिजे ह्मणजे ग्रहण येते हे त्यास समजलें नाहीं.. गोविंदाचा पुत्र माधव याची नीलकंठीवर शिशुबोधिनी समाविवेकविवृत्ति या नांवाची टीका आहे. तींत उदाहरणही आहे. ती शक १५५५ ची आहे व ता काशी एथे केलेली आहे. माधवाचा पिता पीयूषधाराटीकाकार गोविंद हा जहांगीर बादशहास मान्य होता असें माधवाने लिहिले आहे. वरील वर्णनावरून दिसून येईल की ह्या कुलांत पुष्कळ चांगले विद्वान् होऊन गेले. रघुनाथ, शक १४८४. याचा सुबोधमंजरी नांवाचा एक करणग्रंथ डे. कालेजसंग्रहांत आहे (नंबर २१७ सन १८८३।४). त्यांत आरंभवर्ष शके १४८४ आहे. तो ब्रह्मपक्षाचा आहे. त्यांत ग्रहसाधन अहर्गणावरून आहे. शके ४४४ मध्ये अयनांश शून्य मानिले आहेत. रघुनाथ, शक १४८७. सोमभट्टात्मज रघुनाथ याचा मणिप्रदीप या नांवाचा करणग्रंथ शक १४८७ चा आहे. भास्करकृत सर्व ग्रंथ पाहून सूर्यमतानें ग्रह संक्षेपाने सांगतों असें ह्यानें मटलें आहे. ह्या ग्रंथांत विशेष कांहीं नाही. मी हा ग्रंथ पाहिला नाही. सुधाकररूत गणकतरंगिणीवरून हे लिहिले आहे. रूपाराम. बीजगणित, मकरंद, यंत्रचिंतामणि या ग्रंथांवर याच्या उदाहरणरूप टीका आहेत; सर्वार्थचिंतामणि, पंचपक्षी, मुहूर्ततत्त्व, यांवर याच्या टीका आहेत; आणि वास्तुचंद्रिका नांवाचा याचा एक ग्रंथ आहे. ही माहिती आफ्रेचसूचीवरून दिली आहे. केशवकृत मुहूर्ततत्वग्रंथाचा काल सुमारे शक १४२० आहे. यावरून रूपारामाचा काल शक १४२० हून अर्वाचीन असला पाहिजे.