पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/274

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(२७५) चिंतामणि. (गार्यगोत्र ) अनंत (पत्नी पद्मा) नीलकंठ ( पत्नी चंद्रिका) शक १५०९ राम शक १५१२, १५२२ गोविंद (पत्नी गोमती) जन्मशक १४९१ माधव शक १५५५ चिंतामाण हा ज्योतिषी होता आणि मोठा विद्वान होता असें नीलकंठ आणि राम यांनी केलेल्या वर्णनावरून दिसते. अनंताचे वर्णन वर घंशजवृत्त. आलेच. . नीलकंठाच्या आईचे नांव पद्मा असें होतें. त्याचा तोडरानंद ह्मणून ग्रंथ आहे व्याचे वर्णन इतर ग्रंथांत आले आहे त्यावरून त्यांत गणित, मुहूर्त आणि होरा हे तिन्ही स्कंध असावे असे दिसते; व नीलकंठाचा नातू माधव यानेही तसे लिहिले आहे. त्यांत चंद्रवारविलासप्रकरणांत ग्रहास्तोदय विचार आहे, कालशुद्धिसौरख्यप्रकरणांत न्यूनाधिमासविचार आहे, असें पीयूषधाराकाराने लिहिले आहे. व्या ग्रंथाचा काही भाग माझ्या पाहण्यांत आला (आनंदाश्रमग्रंथांक ५०८८), त्यांत महतस्कंध मात्र आहे. त्यांत पूर्वग्रंथकाराच्या वचनांचा संग्रह मोठा आहे. मी पाहिलेल्या भागाची ग्रंथसंख्या सुमारे १००० असून त्यांत यात्राप्रकरण मात्र आहे, व तेंही अपूर्ण आहे. यावरून सर्व ग्रंथ फार मोठा असावा. अकबराचा प्रधान तोडरमल्ल याच्या नांवावरूनच तोडरानंद हे नांव दिलें असावें. नीलकंठ हा मोठा मीमांसक आणि सांख्यशास्त्रज्ञही होता, आणि अकबर बादशहाच्या सभेत पंडितेंद्र होता असें त्याचा पुत्र गोविंद याने लिहिले आहे. ताजिकावर नीलकंठाचा समातंत्र (वर्षतंत्र ) ह्मणून ग्रंथ आहे. त्यास ताजिकनीलकंठी असेंही ह्मणतात. तो फार प्रसिद्ध आहे. तो निरानिराळ्या टीकांसह छापला आहे. तो नीलकंठाने शक १५०९ मध्ये रचिला. त्याजवर विश्वनाथाची सोदाहरण टोका आहे. ती शक १५५१ ची आहे. याशिवाय त्यावर द्विघटिका नांवाची टीका, लक्ष्मीपतीची टीका आणि श्रीहर्षीची श्रीफलवर्धिनी टीका अशा टीका आफ्रेचमूचीत सांगितल्या आहेत. दुसऱ्या टीकांचे वर्णन खाली आहे. नीलकंठाने एक जातकपद्धति केली आहे, तिचे ६० श्लोक आहेत, ती मिथिला त्रातांत प्रसिद्ध आहे. असें गणकतरंगिणीकार लिहितात. नीलकंठानें तिथिरत्नमाला, प्रश्नकौमुदी अथवा ज्योतिषकौमुदी या नांवाचा प्रश्नग्रंथ, आणि दैवज्ञवल्लभा, हे ज्योतिषग्रंथ केले आ. हेत, व सुबोधिनी नांवाची जैमिनिसूत्रटीका केली आहे, असें आफ्रेचसूचीत आहे ग्रहकौतुक, ग्रहलाघव, मकरंद यांवर आणि एका मुहूर्तग्रंथावर अशा आणखी दीका नीलकंठाने केल्या आहेत असेंही त्या सूचीवरून दिसते.