पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/273

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

टुढिराजाचा जातकाभरण ग्रंथ फार प्रसिद्ध आहे, व तो हल्लों छापला आहे. टुंढिराजाच्या चुलत्याने एक जातकग्रंथ केला आहे असें जातकाभरणावरून दिसते. ह्या चुलत्याचे व त्याच्या ग्रंथाचें नांव समजले नाही. गणेशाचा ताजिकभूषण ग्रंथही प्रसिद्ध आहे. ह्या गणेशाचा गणितमेजरी नामक ग्रंथ आहे असे आफेचसूचीत आहे. अनंत. कामधेनु या नांवाचा तिथ्यादिकपंचांगसाधनाचा ग्रंथ आहे. त्यावर अनंताची टीका आहे. कामधेनु ग्रंथ गोदातीरस्थ व्यंबक एथील बोपदेवतात्मज महादेव याने शक १२७९ मध्ये केला आहे. त्यांत ब्रह्मपक्ष आणि आर्यपक्ष यांस अनुसरून तिथ्यादिसाधनार्थ सारण्या आहेत. या अनंताचे पुत्र नीलकंठ आणि राम यांचे ग्रंथ अनुक्रमें शक १५०९ आणि १५१२ या वर्षांचे आहेत. यावरून अनंतकृत कामधेनुटीकाकाल सुमारे शक १४८० असावा. जातकपद्धति या नांवाचा अनंताचा एक जातकग्रंथ आहे.* अनंतपुत्र राम याने आपल्या मुहूर्तचिंतामणि नामक ग्रंथाच्या उपसंहारांत आपला कुलवृत्तांत असा दिला आहे. -- आसीद्धर्मपुरे षडंगनिगमाध्येतद्विजैर्मडिते । ज्योतिवित्तिलकः फणींद्ररचिते भाष्ये कृतातिश्रमः॥ वंशवृत्त. ततज्जातकसंहितागणितकृन्मान्यो महाभूभुजां । तर्कालंकृतिवेदवाक्यविलसदृद्धिः स चिंतामणिः ॥ ८॥ ज्योतिविद्गणवंदितांत्रिकमलस्तत्सनुरासीत् कृती । नाम्नानंत इति प्रथामधिगतो भूमंडलाहस्कर : || यो रम्यां जनिपद्धार्त समकरोदुष्टाशय वंसिनीं । टीकां चोचमकामधेनुगणितेऽकात्सितांप्रीतये। तदात्मज उदारधी विबुधनीलकंठानुजो । गणेशपदपंकजं हादि निधाय रामाभिधः ।। गिरीशनगरे वरे भुजभुजेषचंद्रमिते १५२२ । शके विनिरमादिमं खलु महूर्तचिंतामणि ॥ १० ॥ ह्यावरून व ह्याच्या वंशांतील इतर ग्रंथकारांनी आपले कुलवृत्त दिले आहे त्यावरून ह्याची वंशावळ खाली दिली आहे. ह्यांचे गोत्र गार्ग्य होते. ह्यांचे मूळ राहणे गोदाथडींत विदर्भ देशांत धर्मगुरी एथे होते. तेथून अनंत हा काशी एथे राहण्यास गेला. त्याच्या पुढील पुरुष, काशीस राहत होते. (मागील पृष्टावरून पुढे चालू.) निराळे, व नागनाथ आणि गोपाल यांच्या मध्ये, तसेंच गोपाल आणि ज्ञानराज यांच्यामध्ये एकक पुरुष असावा (अथवा यांचे शक चुकीचे असावे) असे दिसते. वर लिहिलेले शक पूर्ण विश्वसनीय आहेत अशी मला खात्री नाहीं; तथापि तशांच्या अभावी मिळाले ते दिले आहेत. नागनाथास रणार हे पद अकबर अथवा जहांगिर यांच्या कारकीर्दीत मिळाले असले पाहिज. नरपतिजय चर्या' या नांवाचा प्राचीन ग्रंथ शक १०९७ चा आहे, ह्मणून नागनाथानं नरपतिजयचर्या टीका केली असें मी झटले आहे. परंतु नागनाथाचा त्याच नांवाचा दुसरा स्वतंत्र ग्रंथ असल्यास न कळे.

  • अनंताचे ग्रंथ माझ्या पाहण्यांत नाहीत. त्याच्या वंशजांनी केलेले वर्णन आणि सुधाकरकृत गणकतरंगिणी यांच्या आधारे त्याचे वर्णन केले आहे.