पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/272

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आहे, असे आचसूचीत आहे. यावरून हा करणत्रंथ असून त्यात पंचांगोपयोगी सारण्याही आहेत असे दिसते. मुहूर्तमातडकार नारायण आणि त्याचा पुत्र गंगाधर (पुढे पृ. २७७) यांच्या ग्रंथांत वंशवर्णन दोन तीन स्थली आहे. त्यांत अनंताच्या पित्याचे नांव सर्वत्र हरि असेंच आहे, श्रीकांत असें नाहीं; आणि अनंताचे इतर वर्णन बरेच असून त्याच्या ग्रंथाचे वर्णन मुळीच नाही. यामुळे हा मुहूर्तमार्तडकाराचा पिताच की काय याविषयी संशय आहे. ढुंढिराज. याणे आपल्या जातकाभरण ग्रंथांत आणि याचा पुत्र गणेश याणे ताजिकभूषण ग्रंथांत वंशवर्णन केले आहे त्यावरून हा देवगिरी (दौलताबाद) च्या जवळ गोदावरीच्या उत्तरेस असणारें पार्थपुर (पाथरी) एथला राहणारा होय असे सिद्ध होते. ह्याच्या पित्याचे नांव नृसिंह असें याणे लिहिले आहे. ज्ञानराजाच्या वर्णनांत वंशवृक्ष दिला आहे (पृ.२६८), त्यांत त्यांतल्याच नृसिंहाचा हा पुत्र असें काशीनाथशास्त्री यांणी पाठविलेल्या वंशवृक्षानुसारें मी लिहिले आहे. त्यावरून ढुंढिराज हा सुंदरसिद्धांतकार ज्ञानराज याचा चुलता होतो. परंतु आपल्या जातकाभरण ग्रंथांत ह्याने आरंभी ज्ञानराज गुरूचे वंदन केले आहे. यावरून हा ज्ञानराज गुरु सिद्धांतसुंदरकाराहून निराळा असावा किंवा टुंढिराज हा याच वंशांतल्या दुसन्या एकाद्या नृसिंहाचा पुत्र असावा अशी शंका येते. हुंढिराजाने अनंतकृत सुधारस या (नांवाच्या करणावर सुधारसकरणचषक नामक टीका केली आहे; तसेच ग्रहलाघवोदाहरण, ग्रहफलोपपत्ति, पंचांगफल, कुंडकल्पलता, हे ग्रंथ केले आहेत, असें आनेचमूचीत आहे. हा टुंढिराज आणि जातकाभरणकार टुंढिराज हे एकच असतील तर ह्याचा काल शक १४४७ हून अर्वाचीन असला पाहिजे. जातकाभरणकाराचा पुत्र गणेश याच्या ताजकभूषण ग्रंथाचा उल्लेख विश्वनाथ (शक १५५१) याने केला आहे. यावरून जातकाभरणकाराचा काल शक १५०० हून प्राचीन असला पाहिजे.

  • 'जन्मकालनलिनीविलासिना नैव याति तुलनां कलासु चेत् ॥ वर्षकालनलिनी पतिः..." या शोकांतील ताजिकभूषणकाराचे सांगणे चुकीचे आहे, असे विश्वनाथ हा ताजिकनीलकंठी टीकेंत ह्मणतो; व ते झणणे बरोबर आहे.

+२७२ पृष्ठं छापून झाल्यावर काशीनाथशास्त्री यांजकडून आणखी माहिती लिहून आली. तिचा सारांश एथे देतों:-" ढुंढिराज याणे ज्ञानराजापाशीच अध्ययन केले. सूर्यापासून पुरुषांचे जन्ममरण शक असे-सूर्य १४२९-१५१०; नागनाथ १४८०-१५३७, गोपाल १५४५-९०; ज्ञानराज जन्म १५९५, राम मरण १७३१: विज्ञानेश्वर १७१२-६९; पुरुषोत्तम २७४८-.९९; काशीनाथ जन्म २७६८. सूर्यपुत्र नागनाथ ह्यास 'रणशर' असें पद दिल्ली दरबारांतून मिळाले होते. त्याणे नरपतिजयचर्या ग्रंथ केला. 'सूरिचूडामाणि' हे पद ( काशीनाथशास्त्री यांस ) शक १८१३ मध्ये मिळाले." चलत्याहून पुतण्या लहान, अशी उदाहरणे आढळतात. तेव्हां ढुंढिराजाने ज्ञानराजापाशी अध्ययन करणे अशक्य नाही. व यावरून जातकाभरणकाराच्या ग्रंथांचा काल सुमारे शक १४३० पासून १४६० पर्यंत असावा, व ताजिकभूषण ग्रंथाचा काल शक १४८० असावा. वंशवृक्षांत सूर्याच्या खाली लिहिलेला नागनाथ हा सूर्याचा पुत्र होय, गोपाल आणि ज्ञानराज हे निर' (पुढे चालू.)