पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/271

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

कोलबंक लिहितो की *" मूर्यदासाची संपूर्ण सिद्धांतशिरोमणीवर टीका आहे. त्याने गणितमालती ह्मणून एक स्वतंत्र ग्रंथ गणितावर केला आहे; तसेच त्याने सिद्धांतसंहितासारसमुच्चयनामक ग्रंथ केला आहे. त्यांत शिरोमणिटीकेचा उल्लेख आहे." हे तीनही ग्रंथ वर सांगितलेल्या ग्रंथाटकश्लोकांत नाहीत; काशीनाथशास्त्री यांणी पाठविलेल्या वृत्तांत नाहीत; व माझ्याही पाहण्यांत नाहीत. आऋचसूचीत मूर्यमूरि अथवा सूर्यदास अथवा मुर्य याने केलेल्या ग्रंथांच्या नांवांत हीं तीन नांवें व वर सांगितलेली बहुतेक नांवें असून आणखी ग्रहविनोद, कविकल्पलताटीका, परमार्थप्रपा नांवाची भगवद्गीताटीका, भक्तिशत, वेदांतशतश्लोकीटीका, शृंगारतरंगिणी नांवाची अमरुशतकटीका ही नावे आहेत. एकंदरीत पाहतां सूर्य हा एक महापंडित होऊन गेला. गणितामृतकूपिकेंत त्याने आपल्याला गणिताणवतरणसत्कर्णधार, छंदोलंकृतिगीतशास्त्रनिपुण, वैदग्ध्यपारंगत ' झटले आहे तें यथार्थ आहे. अमृतकुपित तो ह्मणतोः-'अहं सूर्याभिधानः कविः स्वप्रज्ञापरिणामतः लीलावतीं व्याख्यातुं विहितादरोस्मि' आणखी निर्मथ्य बीजगणितार्णवमात्मयत्नात्सद्वासनामृतमवाप्तमिदं मया यत् ।। तत्संग्रहाय गणितावकूपिकेयं टीका विरच्यत इहावनिदेवतुष्टयै ।। बीजभाष्यांत प्रथम तो ह्मणतो की:यत्पादांबुरुहप्रसादकणिकासंजातबोधादहं पाटीकुट्टकबोजतंत्रगहनाकूपारपारंगमः ।। छंदोलंकृतिकाव्यनाटकमह (?) संगीतशास्त्रार्थवित ते वदे निजतात मुत्तमगुणं श्रीज्ञानराज गुरुं ॥२॥ तरी शेवटी ह्मणतो की:तत्सून : ( ज्ञानराजसूनः ) सूर्यदासः सुजनविधिविदां प्रीतये बीजभाष्यं । चक्रे सूर्यप्रकाशं स्वमतिपरिचयादादितः सोपपति ॥ ३ ॥ यावरून पित्यापासून याला ज्ञानप्राप्ति झाली तरी मुख्यतः ते त्याचे स्वतःचेंच बुद्धिवैभव होय. अनंत. शक १४४७. याणे अनंतसुधारस या नांवाचा पंचांगगणितग्रंथ शक १४४७ मध्ये केला आहे. तो सूर्यसिद्धांतानुसारी आहे. ग्रंथारंभी अनंत ह्मणतोःढुंढिविनायकचरणहूँ मुदमादधन नत्वा ।। सूक्कयानंतरसाख्यं तनुते श्रीकांतजोऽनंतः ॥ यावरून याच्या पित्याचें नांव श्रीकांत होते. मी हा ग्रंथ पाहिला नाही. सुधाकरकृत गणकतरंगिणीवरून हे लिहिले आहे. सुधाकर ह्मणतात की हा सारणी ग्रंथ आहे, आणि मुहूर्तमार्तडकार नारायण याचा पिता अनंत याच्या पित्याचे नांव हरि होते, (पुढें गंगाधर, शक १५०८ याचे वर्णन पहा ), आणि ह्या अनंताच्या पित्याचे नांव श्रीकांत हे हरि याच अर्थाचे आहे, आणि दोघांचा काल मिळता आहे, यावरून हा मुहूर्तमार्तडकाराचा पिता असावा. परंतु अनंतकृत सुधारस ग्रंथावर 'सुधारसकरणचषक' नांवाची टीका टुढिराजाची आहे आणि ग्रहणोदय नांवाचा या ग्रंथाचा एक भाग काशीसंस्कृतपाठशालापुस्तकसंग्रहांत

  • Miscellaneous Essays, 2nd Edi. Vol. II, p. 451. पृ.२५३ मध्ये मर्यदास याची लीलावतीटीका शक १४६० ची आहे असें मी लिहिलें तें कोलकच्या आधारे लिहिले. परंतु ती. चूक आहे. ते पृष्ठ छापून झाल्यावर सूर्यदासाबद्दल जास्त माहिती मिळाली. तो शक १४६३ पाहिजे