पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/270

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

या वंशांतील हुँदिराज, गणेश, सूर्य, यांचे वर्णन पुढे निराळे केले आहे. चिंतामवंशजवृत्तीने सुंदरसिद्धांतावर टीका केली आहे हे वर सांगितलेंच आहे. बाकी काहींचे वर्णन एथेच करितों. काशीनाथशास्त्री यांनी पाठविलेल्या माहितीवरून ते लिहितों. हे घराणे पाथरीहून बीड एथे कधी राहण्यास गेले हे समजलें नाहीं. बीड हें पाथरीच्या पश्चिम नैऋत्येस सुमारे ५० मैल, व दौलताबाद आणि पैठण यांच्या दक्षिण-आग्नेयीस सुमारे ६० आणि ५० मैल अनुक्रमें आहे. नागनाथ याने नरपतिजयचर्या टीका केली आहे. पुरुषोत्तम याने केशवीप्रकाश, आणि वर्षसंग्रह हे ज्योतिषग्रंथ केले आहेत आणि दत्तकुतूहल नामक दुसरा एक ग्रंथ केला आहे. केशवीप्रकाशांत तो लिहितो की रामचंद्र हा होराशास्त्रपारंगत होता; आणि विज्ञानेश्वर हा न्यायव्याकरणज्योतिषशास्त्रज्ञ आणि बाजीराजनृपतिसंमान्य होता. हा बाजीराव म्हणजे शेवटला बाजीराव पेशवा (शक १७१७३९) होय. काशीनाथशास्त्री सांप्रत विद्यमान आहेत. हे न्यायव्याकरणज्योतिषज्ञ आहेत. बीड एथे हे सर्वाधिकारी आहेत. हैद्राबाद संस्थानांत यांची चांगली मान्यता आहे. हंपीविरूपाक्ष एथील शंकराचार्यांनी यांस मूरिचूडामणि असें उपपद दिले आहे यांणी न्यायपोत नामक ग्रंथ केला आहे आणि श्रीदेवीभागवत चूर्णिका करीत आहेत. तिचे पांच स्कंध झाले आहेत. सर्य. जन्मशक १४३०. सिद्धांतसुंदरकार ज्ञानराज याचा हा पुत्र होय. भास्करीय बीजाचे भाष्य याने केले आहे, त्यांत त्याने आपल्याला सूर्यदास म्हटले आहे व ग्रंथाला सूर्यप्रकाश झटलें आहे. ती टीका शक १४६० या वर्षी वयाच्या एकतिसाव्या वर्षी केली असें त्याने लिहिले आहे. यावरून त्याचा जन्मशक १४२९ किंवा १४३० होय. या टीकेची संख्या २५०० आहे. कांहीं स्थली याणे आपले नांव सूर्य असेंही लिहिले आहे. भास्कराचार्यकृत लीलावतीवर याची गणितामृतकूपिका नांवाची टीका आहे. ती शक १४६३ ची आहे. हींत उपपत्ति व्यक्त संख्यांनीच सांगितली आहे. वलीलावती हैं काव्य समजून तींतील काही लोकांचे अर्थ अनेक केले आहेत. या टीकची ग्रंथसंख्या ३५०० आहे. या दोन ग्रंथांत शेवटी एक श्लोक आहे त्यांत सूर्याने अमुक अमुक ८ ग्रंथ केले असे सांगितले आहे. ते ग्रंथ असेः लीलावतीटीका, बीजीका, श्रीपतिपद्धतिगणित, बीजगणित, ताजिकग्रंथ, काव्यद्वय, आणि बोधसुधाकर नामक अध्यात्मकग्रंथ. यांतील चवथा ग्रंथ बीजगणित हा सूर्याचा स्वतंत्र ग्रंथ आहे. ताजिकग्रंथ ताजिकालंकार नांवाचा आहे. याची एक प्रत डेक्कन कालेजसंग्रहांत आहे, तींतही वर सांगितलेला श्लोक आहे. त्यांत काव्यद्वय या ठिकाणी काव्याष्टक असें झटले आहे. काशीनाथशास्त्री यांणीं माहिनी पाठविली तींतही सूर्यपंडिताने काव्याष्टक केलें असें मटले आहे, व ग्रंथाची नांवें पयामृततरंगिणी, रामकृष्णकाव्य, शंकराभरण, नृसिंहचंपु, विघ्नमोचन, भगवतीगीत इत्यादि अशी लिहिली आहेत. रामकृष्णकाव्य प्रसिद्ध आहे. तें व्यर्थी आहे. त्यांत एक अर्थ रामपर आणि दुसरा कृष्णपर आहे.