पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मकरंदपुस्तकांत शके १४०० हा दिला आहे. हा शक त्या पुस्तकांत पद्यबद्ध नाही, व तो खरा आहे असें पहाण्यास त्या ग्रंथांत दुसरें कांहीं साधन नाहीं. यामुळे त्याच्या खरेपणाविषयी किंचितू संशय वाटतो. तथापि विश्वनाथादिकांनी मकरंदाचे उल्लेख केले आहेत, त्यावरून सदई काल खरा असेल असे दिसते. आर्यभटीय टीकाकार परमादीश्वर याच्या टीकेंत सांप्रतच्या मूर्यसिद्धांतांतले निरनिराळ्या अधिकारांतले १२ श्लोक* आहेत. त्यांतही विशेष महत्वाचे असे मध्यमाधिकारांतले ४ आहेत. त्यांत सर्व ग्रहांची मंदोच्चे आणि पात यांचे भगण आहेत. या परमादीश्वराचा काल माहीत नाही. याने सूर्यसिद्धांतांतले श्लोक जेथे जेथे दिले आहेत तेथे “तथा च मयः" असें ह्मणून पुढे ते दिले आहेत. गोदानदीजवळील पार्थपूर (पाथरी) येथील राहणारा टुंडिराजात्मज गणेश दैवज्ञ याचा ताजिकभूषण ह्मणून ग्रंथ शके १४८० च्या सुमाराचा आहे. त्यांत त्यामें वर्षमान मूलसूर्यसिद्धांतांतलें घेतले आहे. मूलपंचसिद्धांतिकोक्त सूर्यसिद्धांताचें वर्षमान (३६५।१५।३१।३०) हें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतवर्षमाना (३६५।५।३१।३१।२४) पेक्षां गणित करण्यास सोईचे म्हणून ते शकाच्या १५ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत आलेले दिसते. ज्योतिषदर्पण ह्मणून शके १४७९ मधील एक मुहूर्तग्रंथ आहे. त्यांत कारणवशात् उदाहरणार्थ सृष्ट्यादीपासून कलियुगारंभापर्यंत अहर्गण दिला आहे. तसेच कल्पारंभी गुरुवार मध्यरात्रींचे मध्यम ग्रहादि सांगितले आहेत. ते सर्व सांप्रतच्या सूर्यसिद्धांताप्रमाणे आहेत. रामविनोद नामक शके १५१२ मधील एक करणग्रंथ आहे. त्यांतलें वर्षमान सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचे आहे. सिद्धांततत्वविवेककार कमलाकर (शके १५८०) हा तर सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचा अत्यंत अभिमानी आहे. वार्षिकतंत्रनामक एक ग्रंथ सांप्रतच्या सूर्यसिद्धांतानुसार आहे, तो शके १४०० व १६३४ यांच्या. मध्यंतरी झालेला आहे. सांप्रतच्या सूर्यसिद्धांतावर रंगनाथकृत गूढार्थप्रकाशिका नांवाची शके १५२५ मध्ये केलेली टीका आहे. त्या टीकेसह सूर्यसिद्धांत काशी टीका. एथे आणि कलकत्ता एथे छापला आहे. दुसरी नृसिंह दैवज्ञाची सौरभाष्य म्हणून टीका आहे. ही शक १५४२ ची आहे. तिसरी विश्वनाथ देवज्ञकत गहनार्थप्रकाशिका नामक टीका आहे. तींत उदाहरणे करून दाखविली आहेत. ती शके १५५० च्या सुमाराची आहे. चवथी दादाभाईची किरणावलिनामक टीका शके १६४१ सालची आहे. चारही टीकांत रंगनाथाची टीका जास्त विस्तृत आहे आणि तींत उपपत्तिही चांगली आहे. रंगनाथाच्या टीकेत २।३ ठिकाणी “इति सांप्रदायिकं व्याख्यानं" असे म्हटले आहे. 'केचित्तु ' असें। म्हणून २।३ स्थली इतरांची मते दिली आहेत. एके ठिकाणी "नव्यास्तु इत्यर्थं कुर्वति" असें झटले आहे. यावरून रंगनाथाच्या पूर्वीच्या कांहीं टीका त्याच्या वेळी उपलब्ध होत्या असे दिसते. पर्वत ह्मणून कोणी टीकाकाराचें नांव चार स्थली

  • मध्यमा. ४१-४४, पात. २, भूगो. ३५-४०; मानाधि. २ । काशी छापी पुस्तक १० १५६,१६३, २०१. काशी छापी पुस्तक ०४८,९५, १४७. ६ काशी छापी पुस्तक ०२०१.