पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

सा (१८१) विषुवत्क्रांतिवलययोः संपातः क्रांतिपातः स्यात् ।। तद्भगणाः सौरोक्ता व्यस्ता अयुतत्रयं कल्पे ॥ १७ ॥ या वरील भाष्यांत तोच ह्मणतो की, क्रांतिपातस्य भगणाः कल्पेऽयुतत्रयं तावत् सूर्यसिद्धांतोताः॥ हे म्हणणें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांत भचक्रभ्रमण सांगितले आहे त्यासच अनुलक्षून आहे. तसेंच सूर्यग्रहणाधिकाराच्या शेवटी भास्कराचार्य ह्मणतो "तस्मान्नेदं पूर्वैरकाशायैस्तथा कृतं कर्म" ह्यांतील "अशि" या शब्दावरून हे मणणें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतास अनुलक्षून आहे असे दिसून येते. यावरून अलबिरुणी, भास्वतीकार, आणि भास्कराचार्य, यांच्या पूर्वी ह्मण जे काशकाच्या १० व्या शतकाच्या अर्धापूर्वी सांप्रतच्या सूर्य सिद्धांतास मान्यत्व आणि पूज्यत्व आले होते असे सिद्ध होते. शके ५५० (ब्रह्मगुप्तसिद्धांतकाल) आणि ९५० यामध्ये कोणत्या काली आले हे समजण्यास सध्या कांहीं प्रमाण उपलब्ध नाही. तैलंगणांतील वाविलाल कोचनाचा शके १२२० चा करणग्रंथ सर्वांशी सांप्रतच्या सूर्यसिद्धांतानुसारें आहे. याच्या पूर्वीचें सूर्यसिवर्तमानसूर्यसिद्धांता- द्धांतानुसारी करण माझ्या पहाण्यांत नाही. शके १३३९ च्या नसारी ग्रंथ. ilion भटतुल्यकरणांत अयनगति सांप्रतच्या सूर्यसिद्धांताप्रमाणे आहे. ताजकसार ह्मणून शके १४४५ या वर्षी किंवा त्या सुमारास झालेला एक ग्रंथ माझ्या अवलोकनांत आहे. त्यांत ग्रहानयनाविषयी असे सांगितले आहे : mporter श्रीसूर्यतल्यात्करणोत्तमाद्वा स्पष्टाग्रहा राजमृगांकतो वा ॥ यावरून शके १४४५ च्या पूर्वी सूर्यतुल्य नांवाचा एक करणग्रंथ होता. अर्थात् त्यांतील ग्रह सूर्यसिद्धांतांतले घेतले होते. ते वर्तमानसूर्यसिद्धांतांतलेच असले पाहिजेत, शके १४१८ च्या ग्रहकौतुककरणांत वर्षमानादिक सूर्यसिद्धांतांतले म्हणून दिले आहे तें वर्तमानसूर्यसिद्धांतांतले आहे. ग्रहलाघवकार गणेश दैवज्ञ ह्मणतो की, सौरोर्कोपि विधूधमंककलिकोनाब्जः॥ । ___य. ला. मध्यमाधिकार. ह्मणजे सूर्यसिद्धांतांतून सूर्य, चंद्रोच्च, आणि नऊ कलांनी उणा चंद्र घेतला आहे. आणि ही मानें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतलीच घेतली आहेत. तसेंच तिथिचिंतामणीच्या सारण्या सर्वांशी सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतल्या रव्यादिकांवरून केल्या आहेत. ( याविषयी जास्त विवेचन पुढें ग्रहलाघवविचारांत येईल.) भास्वतीकरणावर माधवरूत टीका शके १४४२ मधील ह्मणजे ग्रहलाघव ज्या वर्षी झाला त्याच वर्षांची आहे. त्या टीकेंत रविचंद्रादिकांच्या आणि सर्व ग्रहांच्या भगणाचे श्लोक किंवा त्या श्लोकांतील संख्या घेतल्या आहेत. ते श्लोक व ती भगणादि मानें राहू खेरीज करून सांप्रतच्या सूर्यसिद्धांताशी पूर्णपणे मिळतात. मकरंद ह्मणून पंचांगसाधकग्रंथ आहे. सांप्रत उत्तर हिंदुस्थानांत पुष्कळ प्रदेशांत त्यावरून पंचांगें करितात. त्यांत वर्षमान आणि सर्व ग्रहांची भगणादि मानें सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतली आहेत. त्या ग्रंथाचा रचनाकाल काशी यथें छापलेल्या