पान:भारतीय ज्योतिशास्त्र.pdf/185

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

(9 ) रंगनाथाने सांगितले आहे. आणि “ नामदोक्त" असें ह्मणून एक श्लोकार्ध* दिले आहे. यावरून सांप्रतच्या सूर्यसिद्धांताचा ज्यांत उल्लेख किंवा आधार आहे असा नार्मदाचा कांहीं गणितग्रंथ असावा असे दिसते. या नार्मदाचा काल सुमारे शके १३०० असावा असें माझें मता आहे. सूर्यसिद्धांतावर भूधर याची टीका आहे असें कोलबूक ह्मणतो. तसेच त्यावरील मल्लिकार्जुन, येल्लया, आर्यभट, मम्मभट आणि तम्मया यांच्या टीका पूर्ण किंवा काही भागावर असलेल्या म्याकेंझीसंग्रहांत होत्या 'असें विलसनच्या क्याटलागाच्या आधारें प्रो० व्हिटने ह्मणतो. सिद्धांतकार दोन आर्यभटांपैकी कोणत्याचीही कोणत्याही सूर्यसिद्धांतावर टीका असणे असंभवनीय दिसते. तेव्हां तिस-या कोणा आर्यभटाची टीका असावी. बिब्लिओथिका इंडिकामध्ये सन १८६० या वर्षी पंडित बापूदेव शास्त्री यांनी केलेलें सूर्यसिद्धांताचे इंग्रजी भाषांतर छापले आहे (न्यू सिरिज नं. १). त्यांत फक्त मूलाचे भाषांतर आहे व कोठे कोठे टीपा आहेत. रेव्हरेंड बर्जेस ( Rev. Ebenezer Burgess) याचें सूर्यसिद्धांताचे इंग्रजी भाषांतर अमेरिकन ओरिएंटल सोसायटीचें पुस्तक ६ सन १८६० यांत छापलें आहे; व त्याचे स्वतंत्र पुस्तक छापलें आहे. हे भाषांतर व त्यावर काही टीपा वगैरे प्रथम बर्जेसने लिहिल्या आहेत. त्यावर प्रो० व्हिटने याच्या फार विस्तृत टीपा आहेत. या पुस्तकांतील टी पांसंबंधे वगैरे सर्व मतांची जबाबदारी प्रो. व्हिटने याने कबूल केली आहे. हिंदूंनी ज्योतिष ग्रीकलोकांपासून घेतलें असें प्रो. व्हिटनेचे मत आहे. बर्जेसचे मत हिंदुलोकांपासून ग्रीकलोकांनी ज्योतिष घेतलें असें आहे, ते त्याने शेवटी निराळे लिहिले आहे. रंगनाथानें ग्रहयुत्यधिकाराच्या २३ व्या श्लोकापुढे टीकत एक श्लोकार्थ देऊन, ते काही पुस्तकांत आढळतें, सर्वत्र आढळत नाही, यावरून प्रक्षेप. तें क्षित आहे म्हणून त्यावर टीका केली नाही, असे म्हटले आहे. तसेच शृंगोन्नत्यधिकारांत दीड श्लोक झाल्यावर पुढे दोन श्लोक देऊन त्यांवर टीका केली आहे. परंतु ते असंगत आहेत व त्यांतील रीति चुकीची आहे व त्यावरून लल्लाच्या धीवृद्धिदतंत्रावर भरंसा ठेवणान्या कोणा सुबुद्धिमन्याने ते श्लोक घातले असें मटले आहे. त्रिप्रवाधिकारांतले ५ व्या श्लोकापासून चार श्लोक क्षिप्त असें कोणी म्हणेल तर तसे नाही असे म्हटले आहे; यावरून ते श्लोक क्षिप्त म्हणणारी मंडळी किंवा टीकादिक त्याच्या वेळी होती असे दिसते. ज्योतिषदर्पण मुहर्तग्रंथांत सांप्रतच्या सूर्यसिद्धांतांतले मध्यमाधिकार आणि मानाध्याय यांतले सुमारे १९ श्लोक आहेत, ते सांप्रतच्या पुस्तकाशी मिळतात; परंतु त्यांत मागचे पुढचे श्लोक असून मध्येच सांप्रतच्या रंगनाथी टीकेच्या पुस्तकांत नाहीत असे ३ श्लोक जास्त आहेत, आणि ते पूर्वापर विरोधी नाहीत. सूर्यसिद्धांतांतील भगणादि माने इतर करणादि ग्रंथांत घेतल्याविषयी व त्यावरील भसार. टीकांविषयीं वर जे सांगितले त्यांत ग्रहलाघवकार आणि त्याचा पिता केशव हे कोंकण प्रांतांतले आहेत, भास्वतीटीकाकार माधव हा कान्यकुब्ज झणजे कनोज येथील आहे. मकरंदकार काशी

  • काशी छापी पुस्तक पृ० २१२. याच प्रकरणांत पुढे नार्मदाचे वर्णन पहा. सूर्यसिद्धांताचे बर्जेसचे भाषांतर १०२७८ पहा. व्हिटने इ. स. १८९४ मध्ये मरण पावला.