पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
९०
भारतीय चलनपद्धति.

 (३) त्या रिझर्व्हमध्ये जे सोने किंवा इतर रोखे आहेत, त्यांची रुप. यांस दोन शिलिंग ह्या भावानें पुनः किंमत ठरवावी व जें नुकसान येईल तें भरून काढणे एकदम जरी शक्य नसले तरी हुंडळावळीचा भाव वाढल्यामुळे हिंदुस्तान सरकार स जो फायदा होईल त्यांतून हे नुकसान भरून काढिता येईल.

 (४) हंग.माचे वेळी लोकांना जी नाण्याची जास्त जरूर लागते, ती भागविण्याकरितां निर्गत माळावर दिलेल्या अदलाबदल करता येणान्या हुंडीच्या तारणावर प्रेसिडेन्सी बँकांना कर्ज म्हणून नेहमींच्या नोटाहून ( ज्या नोटांच्या मोबदला ठेवलेल्या रकमेतून रोखे घेऊन टेवलेले असतात अशा नोटांहून ) ५ कोटींपर्यंत जास्त किंमतीच्या नोटा काढण्यांत याव्यात.

 (५) तात्पुरत्या कारणांशिवाय होता होईल तों या रिझव्हंमधील सोनें व चादी हिंदुस्थानांतच ठेवण्यात यावी.

 (६) परिस्थिति अनुकूल झाली म्हणजे नोटांबद्दल रुपये देण्याची व्यव स्था व्हावी व हल्लींची बंदी काढून टाकण्यांत यावी.

 (५) या नोटाबद्दल रुपये किंवा साव्हरिन द्यावयाचे, हें हिंदुस्थान सरकारच्या मर्जीवर अवलंबून रहावे.

 लढाई सुरू झाल्यापासून कांही विशिष्ट किंमतीच्या नोटांचा प्रसार जास्त झाला आहे. उदाहरणार्थ, ५,१० व १०० रुपयांच्या नोटा जास्त लोकप्रिय झालेल्या आहेत व त्या रुपयांहून जास्त किंमतीच्या नोटा, उदाहरणार्थ १०००० रुपये किंमतीच्या नोटांचा प्रचार कमी कमी होत चालला आहे.

 (५४) १९०७ चा पेपरकरन्सी अमेंडमेंट अॅक्ट:- आत एका नवीन पास झालेल्या कायद्याचा उल्लेख करून हैं 'पेपरकरन्सी रिझव्हे प्रकरण संपवूं. हा कायदा म्हणजे ' पेपरकरन्सी अमेंडमेंट ' कायदा होय. हा कायदा मागचे वर्षीच पास करण्यांत आला व या काययति बॅॉविंग्टन कमिटीन केलेल्या सूचना समाविष्ट केलेल्या आहेत. त्या ' पेपरकरन्सी रिझर्व्ह 'ची काय. मची घटना तयार करण्याकरिता त्या कायद्याने काही जुजंबी उपाय सुचविले