पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटा.

८९


नोटा येतील, त्यांबद्दल रुपये पटविलेच पाहिजेत, असा कायदा आहे. हे रुपये मुख्य करन्सी ऑफिसांत लवकर सांठविले जावेत म्हणून रेल्वेनें, पोस्टांतून व जहा जांतून रुपये पाठविण्याची बंदी करण्यांत आली. अशा तऱ्हेनें रुपयांचा प्रसार बंद होऊन नोटाचा प्रसार फार झाल्यामुळे पहिला परिणाम असा झाला की, ह्या नोटा पुष्कळ लोकांच्या हातून पुष्कळ ठिकाणी गेल्यामुळे त्यांची किंमत उतरूं लागली व १ रुपयाची नोट घेऊन बाजरांत गेलें तर त्याची किंमत १५ आणे होऊं लागली व दुसरा परिणाम असा झाला कीं, चिल्लर नण्याची फारच मागणी लोकांकडून होऊं लागली. ही चिल्लर नाणी म्हणजे एक आणेली, दोन आणेली, पावली वगैरे त्या वेळीं मुळांतच अपुरी होती व त्यांना फार मागणी आल्यामुळे ती जास्तच दुर्मिळ होऊं लागली.

 (५३) बॅबिंग्टन स्मिथ कमिटीच्या सूचना:-अशी परि- स्थिति प्राप्त झाली असतांना बॅबिंग्टन कमिटीची नेमणूक झाली. एकंदर परि- स्थितीचा विचार करून कमिटीने पेपरकरन्सीच्या बाबतीत असे ठरविले की,

 (१) एकंदर जितक्या किंमतीच्या नोटा (Gross Circulation) प्रसारांत असतील त्याच्या २/५ किंमतीवी सोन्याचांदीची नाणी किंवा सोनचांद त्यांच्या लगडी मिळून असावीत.

 (२) चरनी नोटांच्या मोबदला ठेवलेल्या रकमेतून जे रोखे विकत घेऊन ठेवलेले असतात, त्यांपैकी फक्त वीस कोटींचे रोखे हिंदुस्थान सरकारनें काढ. वे व बाकीचे रोखे ब्रिटिश साम्राज्यांतील इतर सरकारांनी काढिलेले असावे. ह्यांपैकी १० कोटींचे रोखे एका वर्षांच्या मुदतीचे असावे च बाकीच्या रोख्याबद्दल कांही ठराविक मुदतीनें पैसे मिळण्यासारखे असावेत; ह्या तसि कोटींपेक्षा जास्त किंमतांचे रोखे सुद्धां ब्रिटिश साम्राज्या- मधील सरकारांनी काढलेले व एका वर्षांचे आंत मुदतीचे असावेत व हल्लों जी रोख्यांच्या किंमतीची मर्यादा कायद्यानें १२० कोटींपर्यंत ठरविली आहे ती कांही वेळपर्यंतच राहू द्यावी.