पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
भारतीय चलनपद्धति.

८८


ह्या रकमेवर मुख्य मदार न ठेवतां 'गोल्ड स्टँडर्ड' नांवाचा जो निधि आहे, त्यावर- विशेषतः त्या निर्धीत असलेल्या सोन्यावर ठेवावी. ह्या ५० लाख पौं- पेक्षां जी जास्त रक्कम जमेल, तिचा उपयोग रुपये पाडण्याकरतां चांदीची खरेदी करण्याचे काम व्हावा. ह्याचा अर्थ असा कीं, ह्या जादा रकमेचा विनियोग हुडणा- वळीचा भाव कायम ठेवण्याचे काम करावयाचा नाहीं, तर लोकांना लागतील तेवढी नाणी पुरविण्याकडे करावयाचा.

 वरील सूचनांचा यथार्थपणा कितपत होता हैं आपण महायुद्धामुळे हिंदुस्थानांत जी परिस्थिति उत्पन्न झाली, त्या परिस्थितीवरून पाहूं.

 (५२) युद्धकालीन चलनी नोटांचा प्रसारः - महायुद्धाचा आरंभ झाल्यावर पहिली गोष्ट हा घडला कीं, व्यापार विस्खलित होऊन लोक नोटा- बद्दल रुपये मागूं लागले. पण लोकांचा विश्वास पुनः कायम राहून रुपयांची मागणी कमी कमी होत चालली. १९१५ व १९१६ साली सरकारकडून करन्स ऑफिस, जिल्ह्यांतील खजिने व प्रेसिडेन्सी बँकांच्या जेथे जेथे शाखा असतील त्या त्या ठिकाणी नोटांबद्दल रुपये देण्यांत येऊ लागले.पण पुढे पुढे चांदांचा पुरवठा कमी झाल्यामुळे रुपये पुरवणे कठीण होऊं लागलें. प्रसार १९१४ पासून १९१५ पर्यंत ६६ कोटींपासून १५३ कोटि रुपयांत वाढला व ज्या नोटा ठिकठिकाणचे खजिने व प्रेसिडेन्सी बँकांचीं मुख्य ऑफिसें यांत ठेवण्यात आलेल्या नव्हत्या, त्या नोटांचा प्रसार ५० कोटींपासून १३४ कोट रुपयांपर्यंत वाढला. १९१७ व १९१० साली एक रुपयाची व २॥ रुपयांची नोट सुरू करण्यांत आली व त्यांचा प्रसार अनुक्रमे १७ कोटि ५० लक्ष व १ कोटि ६६ लक्ष रुपयांपर्यंत होता. रुग्ये दुर्मिळ झाल्यामुळे ताग व कापूस विकत घेतांना युरोपियन व्यापाऱ्यांना, येथील शेतकरी व व्यापारी लोकांना ह्या नोटांच्या रूपाने पैसे द्यावे लागले व लोकांनी मोठ्या नाखुषीने त्या नोटा स्वीकारल्या. सरकारने सर्व कारभार नोटांवरच भागविण्याचे मुख्य कारण असें होतें कीं, रुपये अगोदरच लोकांना देण्यांत खलास झाल्यामुळे मुख्य चलनी ऑफिसांत ते शक्य त्या रीतीनें सांठवून ठेवणे अगत्याचें होतें. कारण ह्या ऑफिसांत ज्या