पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
चलनी नोटा.

८७


कमिशनचें असें मत होतें कीं, एका ठराविक जास्तीत जास्त किंम तांच्या नोटांकरितां किती रक्कम ठेवावयाची, हे अनुभवानें ठरल्यावर व तितकी रकम बाजूला काढून ठेवल्यावर ज्या जास्त नोटा आपण काढतों त्या नोटांबद्दल तितक्याच किंमतीचे सोन्यारुप्याचे नाणे बँक ऑफ इंग्लंडच्या धर्तीवर बाजूला काढून ठेवणें हें गैरसोयीचें होतें. गोस्ड नोट नांवाचा कायदा पास करून व विलायतेत हुँख्या विकून जे सोनें (टेट सेक्रेटरीस मिळतें, त्याच्या जोरावर हिंदुस्थानांत नोटांचा प्रचार करण्यात येतो. पण हें सोनें स्टेट सेक्रेटरी आपल्या- जवळ ठेवत नाही. तें एक तर बँक ऑफ इंग्लंडमध्ये राहतें किंवा सिक्यु रिटीजरूपानें तो आपल्याजवळ ठेवतो. तेव्हां एखादे वेळी जर सोनें विलायतेंस दुर्मिळ झाले व लोकांनी नोटा खजिन्यांत भाणून नाण्याची मागणी केली, तर कठीण प्रसंग ओढावयाचा. ही आपत्ति टळावी म्हणून ही वरील सूचना कमिटीनें केली होती.

 (२) हिंदुस्थानांत नोटांचा प्रसार जास्त प्रमाणात करण्यात यावा; नोटांबद्दल रुपये ज्या ठिकाणी देण्यात येतात, त्या ठिकाणाची संख्या जास्त प्रमां- गांत करण्यांत यात्री; नोटांबद्दल रुपये देण्याची अधिक व्यवस्था व्हावे; ५०० रुपयांची नोट हिंदुस्थानांत चोहोंकडे चालावी व त्या नोटांचा अनुभव आल्या- वर त्याहून जास्त रकमेच्या नेटा चोहोकडे चालविण्याचा प्रयत्न करावा.

 (३) पेपरकरन्सी रिझर्व्हमध्यें जें सोनें ठेवलेले असते, त्याचा उपयोग नेहमीच्या वेळी देशांतल्या देशांत लोकांना देण्याकरितां व्हावा; पण ज्या वेळी हुंडणावळीचा भाव १५३३ पेन्सवर येईल, त्या वेळी मात्र ज्या लोकांना सोनें ताबडतोब बाहेर पाठवावयाचे असेल त्यांनाच हें सोनें हिंदुस्थानांत देण्यांत यावें. त्या पेपरकरन्सी रिझर्व्हची विलायतेंत जी शाखा आहे, तिच्य. मध्यें सोनें किती ठेवावयाचें तें हिंदुस्थानांत नाण्यांचा किती सांठा आहे त्यावर अवलंबून राहील. हिंदुस्थानात रुपये जर भरपूर असतील व त्या मानानें सोनें तितकें विपूल बसेल, तर विलायतेंत स्टेट सेक्रेटरीनें ५० लाख पौंडांच्या किंमतीहून जास्त सोनें जवळ ठेवू नये व आणीबाणीच्या वेळी हुंडणावळीचा भाव कायम ठेवण्याकरितां