पान:भारतीय चलनपद्धती.pdf/९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८४
भारतीय चलनपद्धति.

सेक्रेटरी त्यानें विलायतेमधील व्यापाऱ्यांच्या सोयीकरतां स्वतःला जरूर नसतांनाही जास्त हुंया विकल्या. त्या हुंड्यांबद्दल येथील सरकाराला आपल्या खजिन्यांतून रुपये देणे अशक्य झाले. तेव्हां स्टेट सेक्रेटरीने येथील सरकारास चलनी नोटाप्रीत्यर्थ राखून ठेवलेल्या निर्धीींतून पैसे देण्यास परवानगी दिली व तितक्या किंमतीचे सोनें त्याच निधीच्या विलायतेमधील शार्खेत ठेवून दिले. हो व्यवस्था प्रथम दोन वर्षांकरत होती. पण १९०२ सालापासून एक कायदा पास होऊन ती कायम करण्यांत आली. त्यामुळे स्टेट सेक्रेटरीला चांदी विकत घेऊन ती हिंदुस्थानांत पाठवितां येतें व ह्या चांदीचा उपयोग फक्त चलनी नाण्याकरतांच करावयाचा असतो.

 (५०) चलनी नोटांप्रीत्यर्थ राखून ठेवलेला निधिः- (पेपर करन्सी रिझर्व्ह) हा निधि काय आहे ह्याचा जर आपण विचार केला तर आपणांस असे दिसून येईल की, त्या निधीमध्यें चांदी, सोनें व तारण रोखे ( सिक्युरिटीज ) ह्या तिघांचा समावेश होतो. त्या तिघांपैकीं चांदी ही हिंदु- स्थानांत ठेवण्यांत येते. सोनें व तारण रोखे हिंदुस्थान व इंग्लंड ह्या दोन देशांत ठेवण्यांत येतात. इंग्लंडमधल्या तारण रोख्यांत दरसाल दरशेंकडा १॥ दराचे इंग्लंडच्या राजानें हमी घेतलेले कर्ज व सरकारी खजिन्यावरील हुंड्या ( Treasury Bills ) ह्यांचा अंतर्भाव होतो व हिंदुस्थानच्या तारण रोख्यांत १८४२.४३ सालचे ३॥ टक्कयाचे कर्जरोखे, १८९६-९७ सालचे ३. टक्याचे कर्ज रोखे व सरकारी तिजोरीवरील हुंड्या यांचा समावेश होतो.

 आतां असा प्रश्न उत्पन्न होतो कीं, त्या निधीची जी शाखा विलायते- मध्ये आहे ती काय म्हणून. हिंदुस्थानांत रुपयाचे नाणें आहे तेव्हा येथें चांदीची जरूरी लागणार व ती चांदी विलायतेस विकत घ्यावयाची तर त्या- करितां सोनें पाहिजे म्हणून ह्या निधीची शाखा सोन्याच्या रूपांत विलायतेंत उघडण्यांत आली आहे असें कांहीं जण प्रतिपादन करितात. पण चांदी ही हिंदु- स्तानांतच कां खरेदी करूं नये हे समजत नाहीं. मुंबईसारख्या शहरांत मोठ्या प्रमाणांत चांदीचा बाजार आहे व ह्या बाजारांत हिंदी व्यापाऱ्यांना हाती घेऊन